अशी ही Runरागिणी ....कल्याणी

 नवरात्र - स्त्री शक्तीचा कौतुक सोहळा

अशी ही Runरागिणी ....कल्याणी 


लोक म्हणतात स्त्री अबला आहे या वर माझा अजिबातच विश्वास नाही, या उलट ती शक्तीचा स्त्रोत आहे. गेले नऊ दिवस याच्या विवीध रुपांच दर्शन मी लेख, व्हिडिओ, चित्र रुपात देण्याचा प्रयत्न केला.  त्याचा समारोप आज सौ कल्याणी शैलेश टोकेकर हिच्या विषयी लिहून करत आहे.  माझा आणि कल्याणी चा परिचय कसा ? तर ती माझ्या मित्र, सहकारी, खाजगी क्षेत्रात उच्च पदस्थ अधिकारी शैलेश याची बायको.  या दोघांच्या लग्नात ही मी नासिक ला  गेलो होतो. नंतर मी आणि शैलेश फार संपर्कात नव्हतो. तो त्याच्या हुद्द्यात व्यस्त तसा मी.  एक दिवस एका मॅरेथॉन च्या कार्यक्रमात गेलो आणि तिथे मार्गदर्शक म्हणुन  एक स्पर्धक होती ...तीच कल्याणी. मी ओळखुच शकलो नाही एवढं ते बदलेल तिचं रूप. त्या दिवशी फार चर्चा झाली नाही पण मग शैलेश च्या माध्यमातून फोन वर असा संपर्क होत गेला.  स्वतः शैलेश एक अतिशय शिस्तबद्ध, काटेकोर आणि तंदुरुस्त व्यक्तिमत्त्व. त्या मुळे आसपास ची लोकं ही तशीच असावी असं यांना वाटते ...त्यातुन कल्याणी ची सुटका कशी होणार.   घरातच एक fitness गुरु तिला लाभला, तिचा एक वर्गमित्र ही याच क्षेत्रात उंच भरारी घेत होता आणि याच प्रेरणेतून हिचा हा प्रवास सुरु झाला.


स्वतःला "couch potato" म्हनवणाऱ्या ह्या कल्याणी चा एक यशस्वी "marathon runner, cyclist, trekker"  हा प्रवास थक्क करणारा आहे.  म्हणजे तिने धावलेले किलोमीटर अगणित आहेत. त्याची ही नोंद इथे आवर्जुन  देत आहे : 


आजतागायत वेळेची बंधनं असलेल्या 45 पेक्षा जास्त  धावण्याच्या स्पर्धेत ती सहभागी झाली, यात इह स्पर्धा ती जिंकुन प्रथम क्रमांक पटकावला आहे.  देशातील विविध ठिकाणी अतीशय कठीण घाट, डोंगर दऱ्या अश्या विविध मार्गात या स्पर्धा झाल्या आहेत.


कल्याणी आजपर्यंत 15 स्पर्धांसाठी "Brand Ambassador" होती, सोबत शैलेश ही अनेक वेळा होता.

मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू अशा विविध शहरात फ़क्त धावण्यासाठी त्यांनी प्रवास केला.


प्रत्येक स्पर्धेत "Pacer" असतात, ते सर्व अंतर गटाचे मार्गदर्शन आणि त्या गटासोबत, त्याच वेळात ठरलेले अंतर पार करायचे असते 10, 15, 21, 42 km.  अशा 8 स्पर्धेची ती pacer ही होती. मी तिला pacing करताना अनेकदा पाहिलं आहे. गप्पा मारत मारत ती तुम्हाला बरोबर वेळेत पोचवते. या साठी कधी तुम्हाला तुमचा वेग कमी जास्त करून, सहस्पर्धका ना सोबत घेऊन तुमचं ध्येय पार करावं लागतं. ते ती अगदी सहज रित्या करते आणि अशक्य वाटणार अंतर तुम्ही कधी, कसं पार केलं कळत नाही.


2018 साली झालेल्या पाषाण येथे भरलेल्या LSOM, आणि Veterun Half Marathon या स्पर्धांची ती संचालक ही होती. या दोनीही स्पर्धा मी ही धावलो होतो आणि त्याचं चोख नियोजन ही अनुभवले आहे.


पुणे येथे झालेल्या असंख्य स्पर्धांसाठी तिने विविध प्रकारे मार्गदर्शन, जाहिरात, व्यवस्थापन, नेतृत्व अशा भूमिका बजावल्या आहेत. 


आता हळूहळू तीने या क्षेत्रात घट्ट पाय रोवले होते आणि तिने स्वतःची एक ओळख प्रस्थापित केली.  फक्त धावायचं नाही तर त्या विषयी सुयोग्य मार्गदर्शन, फायदे असा एक कार्यक्रम ती अनेक मोठया मोठ्या कंपन्या, कार्यालय इथे करते. ती फक्त धावतच नाही तर उत्तम सायकलस्वार ही आहे आणि त्यात ही हजारो किलोमीटर प्रवास तिने केला आहे. या सोबतच ती एक उत्तम गिर्यारोहक ही आहे आणि राज्यभर, देशभर विविध ठिकाणी तिने उच्च शिखर  गाठले आहेत. रात्रीच्या धावन्याच्या स्पर्धेत ही तिने भाग घेतला आहे.


एवढंच नाही तर कित्येक वेळा 300 सूर्यनमस्कार एकाच वेळी तिने केले आहेत.  


10 वर्षे पेक्षा जास्त काळ मार्केटिंग क्षेत्रात आणि कॉर्पोरेट क्षेत्रात काम करून ती सध्या एक  उत्तम  "content writer" आहे म्हणून माझ्या पेक्षा उत्तम लिहु शकली असती कदाचित.


तिला स्वतः ला आवडणारी ही वाक्ये : 


"Long distance running gives serenity and Me time." "Never out run the joy of running."


 "Persistence and consistency takes you to places in long distance running."


हे सर्व सांभाळत ती एक उत्तम गृहिणी आहे, विविध पदार्थ तयार करणे, त्यात पाश्चात्य, पारंपारिक असे विविध पदार्थ ती सतत करत असते.  सर्व सण वार ही अगदी थाटामाटात साजरे करणे, गरजूंना मदत करणे हा एक वेगळा पैलू. लोकडोऊन काळात असंख्य "कोरोना योध्याना" अन्न पुरवठा ही केलाय, त्यात पोलीस, डॉक्टर, नर्स अशा विविध क्षेत्रात ही मदत पोचवली आहे. हा उपक्रम अनेक महिने राबवला. 


हे सर्व स्वयंस्फूर्तीने, जिद्दीने, चिकाटीने मिळवणाऱ्या, या स्वयंसिद्ध , अष्टपैलू, सतत हसतमुख असणाऱ्या कल्याणीला आणि तिच्या सारख्या इतर सर्व "शक्ती स्वरूप" दुर्गांना ही आजची दहावी माळ...


तुम्हाला आणि परिवाराला दसऱ्याच्या शुभेच्छा !!


शरद पुराणिक

151021

Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....