ए काही बोलायचं नाही
आपण ठोकशाहित आहोत
कोणी सांगितलं लोकशाही
सरकार विषयी तर ब्र नाही काढायचा
काढलात तर, परिणाम माहितीयेत
तुम्हाला मंत्र्याचे बंगले पाहायला मिळतील
सरकार covid च्या कार्यात व्यग्र आहे
तुमचे असे 2 गेल्याने काय फरक पडतो
अन तुम्ही भगव्या चे समर्थक
मग तुमच्या मरणाला किंमत नाही
इतर कोणी विशेष असते तर बघितल असतं
इथे पोलिसांसमोर व्यायाम करणे गुन्हा
पण त्यांच्याच समोर क्रूर हत्या चालते
खबरदार व्यवस्थेविषयी बोललं तर
समोर संभाजी राजे आणि त्यांच्या मागे
औरंगजेब सारख्या क्रूरकरम्याचा फ़ोटो
तरी तुमचे हृदय पिळवटू नका
हृदयसम्राटांच्या या युवराजांचे असेच येणार फोटो
उद्या इटलीचा स्वतंत्रता दिवस ही होईल
आणि आम्ही तो ईथे साजरा करु, काय कराल?
मीडियाने कुठल्या बातम्या दाखवायच्या
आम्ही ठरवणार हीच तर आमची लोक(?)शाही
तुम्ही दिवे लावायला सांगा, आम्ही नाही लावणार
पण मग आम्ही ज्ञानाचे दिवे लावा सांगणार
लागले नाहीत डझनभर सुद्धा मग काय झालं
आम्ही करून दाखवले
पूर्ण देशाला संकटात टाकणाऱ्यांचा आदर करा
तेच तर जगतायेत देशात, त्यांच्यामुळे आम्ही
पण तुम्ही बोलायचं नाहि, येथे पाहिजे जातीचे
मदत पण आम्ही जात धर्म पाहून करणार
करून घ्या तुम्ही काय करनार ते
काढून टाका ते भगतसिंग, राजगुरू, चाफेकर
अन त्या जागी लावा कन्हैया, पटेल, गुर्जर
फेकून द्या ते आंबेडकर फुले विचार
अन जवळ करा सवडीचे बाबासाहेब न महात्मा
हवं तेंव्हा काढायचे अस्त्रा सारखे
काढून ही ठेवायचे अंगावरील वस्त्रा सारखे
बदल हवा बदल हवा तुम्हीच म्हणताय ना
मग हा बदल नाही तर काय
चूप गुमान रहा गरीब गाय जशी
हीच आमची लोकशाही
शरद पुराणिक
Comments