अश्रूंची अखंड मालिका
अखंड अश्रूंची मालिका
आज पर्यंत जगण्यात अनेक, सुखाचे, आनंदाचे, उल्हासित करणारे कधी हसवणारे तर कधी रडवणारे प्रसंग आले. ते आले अन गेले ही.
आज मात्र सकाळपासून ते आत्ता 10.30 पर्यंत, मी जेवढा मागची 50 वर्ष रडलो , भाऊक झालो नाही, हृदय पिळवटून गेलं कधी अभिमानाने तर कधी दुःखाने, प्रेमाने एवढं रडलो नाही त्या पेक्षा कैक पटीने आजच्या दिवशी मी अश्रू गाळले.
दिवस चालू झाला तो रामायण पाहून, तसं गेले 4 ते 5 दिवस मी रोज बघतोय. हळू हळू मी गुंतत गुंतत गेलो. आता त्या प्रत्येक प्रसंगांचे मी वर्णन करणार नाही.
पण काय ते उत्कट, निखळ, निस्वार्थ प्रेम, नीती धर्माचा तराजू. त्या तराजातून तोलून मापून वागणारे ते लोक. मर्यादा, ममता आणि कर्तव्य याच्या चौकटीतून, सीमारेषेच्या आतुन डोकावणारे ते नाते संबंध. उर भरून येतो, हृदय पिळवटून घेणारे ते प्रसंग अन आपसूक घळा घळा अश्रूंनी ओले होणारे चेहेरे. कोणी मला नाजूक हृदयाचा, भावनिक, तकलादू किंवा अजून काही म्हणा, पण मी प्रचंड भाउक होतोय हे सर्व पाहताना अन वेळ खऱ्या अर्थाने सार्थकी लागला.
नंतर 4 ते 8, संभाजी महाराजांची मालिका पाहिली. खरं तर गेली 3 वर्षे मी हैदराबाद ला असल्याने या मालिकेचे अनेक भाग मी पाहू शकलो नव्हतो. तेंव्हा आता पुनःप्रक्षेन मध्ये मी ते पाहतोय.
आऊसाहेब, आबासाहेब, दुधाई, पुतळा आईसाहेब अन दस्तुरखुद्द बाळ संभाजीराजे. काय ते प्रसंग, काय ती बुद्धिमत्ता, संभाजी राजे आणि त्यांची प्रत्येक क्षणात सिद्ध होणारी हुशारी, प्रेम, माया, तशीच चौफेर स्वराज्यविषयी च ओतप्रेत भरलेलं प्रेम. करारी नजर, त्या नजरेतच समोरच्या ला घायाळ करणारे अन त्याच चेहेऱ्याने भावनिक प्रसंगात रडवणारे संभाजीराजे. आजचा शहाजीराजेंचा मृत्यू विषयीचा एपीसोड तर बेजोड, अविस्मरणीय, तितकाच भावनिक, कर्तव्याची जाणीव. नंतर त्या औसाहेबां साठी जीव काढणारे महाराज. पुन्हा तेच, रडतो, अभिमानाने छाती फुलते तर कधी भावुक करणारे प्रसंग.
महाभारत - येथेही तेच, या विषयी नंतर सविस्तर लिहिलंच.
रात्रौ 9 वा पुन्हा रामायण. आज तर दशरथ राजांचा अंतिम संस्कार, नंतर भरत चे बंधुप्रेम, त्याच प्रेमात माते ला ही गमावण्याची तयारी, डोक्यावरचा राज मुकुट फक्त भावासाठी न घालणारा भरत राजा. तसेच नवऱ्यासाठी सर्वस्व त्यागणारी नववधू सीता, बंधू लक्ष्मण. वनवासात गेलेल्या बंधू ला परत बोलवण्यासाठी आलेला भरत, राज्यगुरु. वाटेत ला निषाद राज्याचा राजा.
अरे किती किती मोठा हा खजिना आमच्या कदे आहे. माझा मित्र सुरेंद्र कुलकर्णी जो अतिशय सुंदर लिहितो, खाली त्याचा आणि माझ्या झालेल्या संवादाचे काही वाक्य कॉपी करतोय.
आज मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या या आगळ्या जयंतीनिमित्त मी खऱ्या अर्थाने त्यांचे विचार निदान पाहू शकलो, हे ही नसे थोडके.
[01/04, 3:19 PM] Surendra Kulkarni: याच्याशिवाय पर्याय नाही...आम्ही दहा वेळा जन्म घेऊ आणि तितक्या वेळेस मरू.. एकेका प्रसंगातले सत्य,ममत्व,प्रेम,साहस,
त्याग,तेज,
कर्तव्य,कर्तृत्व,शौर्य,धैर्य,
कोमलता,वज्रता,बंधुत्व,
मित्रत्व,शिषत्व या सर्व भाव आणि गुणांचे ओज अंगी भिनवण्यासाठी...!!!!!
[01/04, 3:21 PM] Surendra Kulkarni: 👆वाचले असले तरी असू दे तुझ्याजवळ..काही जणां जवळ अशा गोष्टी सुरक्षितच नाही तर दरवळत राहतात..
[01/04, 3:22 PM] Sharad Puranik: अरे मी फार भावुक होतोय रामायण पाहताना
[01/04, 4:48 PM] Surendra Kulkarni: अरे same here, आधी TV च्या वेडापायी लोकांकडे गर्दी केलेले आपण,वाक्या वाक्याला रडतो आहोत...
काय ते एकमेकांना समजावणे रामाचे दशरथाला,कौसल्येचे रामाला,दशरथाचे सीतेला..उर्मिलेचे लक्ष्मणाला...
पुढे राम कैकयीला 'माते' म्हणून संबोधतो, तेव्हा तर सेटच वितळतो ,शरद !!!!!
चला , हे सर्व सहन करणारा सह'सही' तुझ्या रूपाने भेटला!!
[01/04, 5:17 PM] Sharad Puranik: खरंय रे ।। फार अजरामर कलाकृती ।। रामायण हे तर आपलं आयुष्य जगताना क्षणाक्षणाला संदर्भीत करणारी जीवन रेखा ।। अर्थात आपण तितकं किंवा अगदी तिळमात्र ही ते आचरणात आणत नाही तो भाग वेगळा
[01/04, 7:18 PM] Surendra Kulkarni: अगदी अगदी!
शरद पुराणिक
पुणे
रामनवमी, 2/4/20
Comments