नमो...गुणवंत..जनहितार्थ..सर्वस्व



 नमो...गुणवंत..जनहितार्थ..सर्वस्व


प्रथमच समस्त वाचकांना हे सांगू इच्छितो की सदरील पोस्ट ही राजकीय किंवा इतर कुठल्याही धार्मिक, पक्षीय अर्थाने लिहिली नाही. हे लिहिण्या मागचा हेतू म्हणजे सरकार जनतेसाठी काय काय करते ते सर्वानाच माहीत होत नाही. अशाच एका विषयावर आज हे लिखान.


आमचे गाव वाले, गल्ली मेट ही ज्यांना कधी तरी लहानपणी भेटलो असेल, पण अनेक वर्षांनी त्याची भेट त्याच्या सुंदर, आकर्षक फेसबुक पोस्टवर झाली. सतत होणाऱ्या ऑनलाइन भेटीने आपसुकच जवळीक झाली आणि आम्ही रोज नाविन्यपूर्ण शुभेच्छा संदेशावर चर्चा, लाइक, प्रतिक्रिया देऊ लागलो. इह वेळेस माझ्या व्हास्टसॅप स्टेटस ला त्याचेच चित्र असतात. नावच "गुणवंत" आणि आडणाव "सराफ" म्हणजे उच्च दर्जाची कलाकुसर आलीच. अनेक वर्षे पैंटींग, छपाई आणि आर्ट्स असा व्यवसाय करून पुन्हा नोकरीत गेले अन बस्तान बीड  हुन औरंगाबाद ला आले. स्थिरावत असतानाच लोकडाऊन आले आणि चाकं थांबली.  


गुणवंत जी पुन्हा एकदा कलाकुसरीच्या नादी लागले अन वयाच्या 50 शीत ही नवीन तंत्रज्ञान अवगत करून पुन्हा याच क्षेत्रात स्थिरावत आहेत. याच दरम्यान त्यांना "प्रधानमंत्री कौशल विकास योजना" याची माहिती मिळाली आणि अगदी शोडषवयीन ते 25 या वयोगटाच्या समूहात हा बहाद्दर ही सामील झाला. 


आर्थिक संकटाच्या या काळात ही योजना अनेकांना आकर्षित होतीच. परवा गुणवंत ने याचे फोटो मला पाठवले आणि प्रकर्षाने लिहावे वाटले. या योजने अंतर्गत प्रत्येक कला विषयांच्या लोकांना समाविष्ट करून, त्यांना योग्य ते प्रशिक्षण देऊन एक प्रमाणपत्र देण्यात येते. हे प्रमानपत्र त्या त्या क्षेत्रातील लोकांना काही रोजगार किंवा व्यावसायिक संधी उपलब्ध करून देतात. एवढंच नाही तर प्रतिमहा 500 रुपये आर्थिक मदत ही मिळते. आजच्या काळात काँप्युटर हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे आणि ग्रामीण भागातील तरुणांसाठी असे कार्यक्रम राबवले जातात. मी तो ग्रुप फोटो सोबत जोडत आहेच. एवढंच नाही तर प्रमाणपत्राच्या खाली एक टीप आहे ज्यात त्या सोबत एक विशिष्ट रक्कम विमा म्हणुन त्या कलाकाराला मिळू शकते. किती चांगला विचार आहे हा. हे कदाचित पूर्वीच्या सरकारने केले ही असेल, आम्हाला ते कळलं नाही किंवा ते जनसामान्यांना पोचले नाही. या आणि इतर अनेक विशेष योजना सरकार राबवते ते फ़क्त आम्हाला कळत नाही. आमच्या मित्राने फ़क्त आवड आणि प्रमाणपत्र या साठी या कार्यक्रमात गेला. या वयातही त्याच्या आतला विद्यार्थी त्याला स्वस्थ बसु देत नाही. पूर्वी फ़क्त पेंटिंग आणि आर्ट्स असं क्षेत्र सीमित असलेला हा आमचा तरुण मित्र डिजिटल मीडिया मध्ये यशस्वीपणे मार्गक्रमण करु पहात आहे. त्या साठी त्याला शुभेच्छा. मी अधिकमास, नवरात्र या काळात जे सर्व स्टेटस ठेवले ते आमच्या या मित्राचेच आहेत. 


परवा संध्याकाळी त्याचा फोन आला आणि साधारण 45 मिनिटाच्या चर्चेत आम्ही आमचा हरवलेला दुरावा पुन्हा बांधुन घेतला. 


काल अजुन एक संदेश पाहिला तो म्हणजे man holes स्वच्छता आता मशिनद्वारे होईल. किती चांगला विचार आहे. तो कोणी घेतला या वर उगीच शाब्दिक दंगल करण्यापेक्षा तो समाजहिताच्या किती जवळचा आहे हे पाहावे.


पूर्वीचे सरकार किंवा हे सरकार, प्रत्येकाविषयी आगपाखड केली जाते की हे अमुक एका क्षेत्र, उद्योगांची पाठराखण करतात. आम्हाला सत्यता माहीत नसते. पण एक मात्र नक्की आज उद्योग आहेत म्हणुन माझ्यासारख्या करोडो लोकांचे जीवन सुरळीत आहे. त्यात ही आमच्या पगाराचा 20 ते 30 टक्के हिस्सा इनकम टॅक्स म्हणुन आम्ही दरमहा सरकारला देतो. ही अर्थव्यवस्था त्या मुळे अजून बळकट होत आहे.  अशा वेळी उद्योगांचे हात अजून मजबुत करणं योग्यच आहे. पण मग राजकीय किंवा वयक्तिक स्वार्थ, फायदा म्हणुन त्या कडे पाहिलं जातं. देशातले प्रत्येक मोठे व्यावसायिक हे प्रत्येक सरकारच्या बाजूने किंवा सरकार त्या बाजूने असं समिकरन आहेच कारण ते आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहेत. 


अगदी कोरोना लसी बाबत ही सरकार आपल्या देशातील उत्पादक आणि त्यांच्या कार्यप्रणाली वर पूर्ण लक्ष देऊन आहे, जिथे जागतिक काट्याची स्पर्धा सुरू आहे त्याच शर्यतीत आपल्यालाही टिकण्यासाठी पूर्ण प्रयत्न सरकार करणारच. एवढंच नाही तर विमा काय असतो हे माहीत नसलेल्या करोडो लोकांचे विमे अगदी काही शे रुपयात उपलब्ध करून दिले. जणधन, बेटी कल्याण हे आणि असे कितीतरी उपक्रम आहेत. आता हे सर्व आदरणीय मोदींजींच्या नेतृत्वाखाली सुरू आहे म्हणुन कोणाला जर पोटशूळ असेल तर चुकीचं आहे. एक मात्र खरं की मला कळतंय तसं मोदीजी एकमेव पंतप्रधान आहेत जे घरोघरी, प्रत्येकाच्या मनात आहेत. कुठे तिरस्कार आणि विरोध रूपाने ही आहेत. पण चालतंय की घरात चार जण एक मताचे नाहीत तर करोडो मध्ये अशी ही संख्या असणारच की. चांगलं ते घ्यावं ।।। 


विषय समेवर आणून  आमच्या PMKVY योजनेतल्या मित्रांना शुभेच्छा देऊन ...थांबतो. 


नमो नम:


शरद पुराणिक

301120

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती