चक्र
अन्याय अत्याचार अवमानाच्या झुंडीत
पिंगा घालतंय तुमचं माझं जीवन
दारिद्रय, महागाई, बेकारीच्या समुद्राची
भरती वाढत चाललीये
या संगम अन प्रवाहाच्या पुरात
वाहत चाललंय हेच जीवन
पूर ओसरला,
पंच वार्षिक योजना, वीस कलमी कार्यक्रम
अन गरिबी हटाव च्या विमानातून
फेकल्या जाणाऱ्या शिळ्या पावांवर आज ही आम्ही
तग धरून तसेच घट्ट पण विखुरलेले
पण कोरड पडलेल्या नरड्याला
साधं पाणी नाही दिलं तुम्ही
काल आकाशवाणी झाली म्हणे
आता निवडणुकांचा पूर येतोय
लगेच
नदीकाठी वसली आमची घरं
काही कष्टातून काही मदतीतुन
पण आलेल्या पावसात पुन्हा
पूर, पाव, दुष्काळ, अन्याय, अत्याचार, अवमान
एक न थांबणार चक्र
शरद पुराणिक
(पुनः तेच, डायरीतील एक जुनं पण नवीन पान)
Comments