आशेचा किरण ....उद्याची स्वस्थ शाश्वती




 आशेचा किरण ....उद्याची स्वस्थ शाश्वती


इकडे हा विषाणु जीवघेणे खेळ खेळतोय

संयम सुटत चाललाय तुमचा माझा सर्वांचा

सकारात्मकतेची शिदोरी भरत निघालोयत

नकारात्मकतेची मरगळ झटकून टाकत


निसर्ग ही मधेच देतोय हादरे अन झटके

नेस्तनाबूत करत स्वप्नं, असलं नसलं सारं

हवालदिल झालीयेत माणसं आणि जगणं

मृगा आधीच उतावीळ  पाऊस ही आलाच


हे सर्व अति होतंय म्हणून की काय !!


म्हणुन निसर्ग  दाखवतोय  विविध छटा

गेले काही दिवस अनुभुती देतोय आपल्याला

आसमंत उधळतोय विवीध रंग अन ढंग

इंद्रधनुचे अद्भुत वोलोभणीय मनोमिलन 


सूर्योदय ही घेऊन येतोय नवं रूप रोज

सूर्यास्त ही बदलतोय त्याचं रंग अन रूप

आसमंत, सूर्य, चंद्र आलेत आता धाऊन

सकारात्मक उद्याच्या शाश्वत जगण्यासाठी.. 


शरद पुराणिक 

020621

(PC- Harshal, FB, Whatsapp)

Comments

Popular posts from this blog

How do I say a Good Bye once for all Harish Sir !!

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी