आज पुन्हा एक जुना कागद हाती आला ।। ज्यात विशिष्ट विषयांवर लिहायचं होत ।। वर्ष आठवत नाहीये ।।
कवी आणि गरिबी
हे नातं अस अतूट असतं
कवितेत गरिबी असते
पण कवी गरीब नसतो
समाजानं केलेली अवस्था असते
कवींना केविलवाणे वागवण्याची
कवी आणि राजकारण
कवींच्या रचनेत राजकारणी राहतात
अन तो व्यक्त होताच ते चपापतात
उघड्या डोळ्यांनी चाललेला लपंडाव
कवीला अस्वस्थ करतो
अन त्याची लेखणी पेटून उठते
कवी आणि परमात्मा
आता परमात्मा कोण
इथं साहित्यालाही जात न धर्म लागला
तसा परमात्म्याचा अर्थ बदलला
ज्याचा त्याचा आपला आपला
सवडीचा परमात्मा
प्रेमात पडलेला कवी
इथे सारखी पडझड असते
प्रेमाची भरती ओहोटी अखंड
कवितेततच रेंगाळलेलं प्रेम
प्रेमात तरंगणारा कवी
आमची शाळा अन आम्ही
स्वच्छंद आम्ही
पाट्या न पॅंटी च्या शिवलेल्या दप्तरांनीशी
गाव गल्लीतल्या शाळेच्या दारात बसायचो
शाळेचं कुलूप उघडायच
तसा क्षणार्धात किलबिलाट गलबळाट गडबड गोंधळ
भरल्या भरल्या सारखं वाटायचं
काका काकू सारखे वाटणारे बाई न गुरुजी
आताच्या युगात इंग्रज आल्यासारखे वाटतात,
गो बँक सायमन
शरद पुराणिक
एक अति जुनी आठवण
Comments