वराती मागून घोडे
वराती मागून घोडे
तो बरसुन गेला
उसवलं आभाळ
फाटली धरणी
सगळं घेऊन गेला
इकडे वराती निघाल्या
आज विरोधी, सत्ताधारी
म्हणे गेले बांधावरी
पुसायला आसवं
अन फाटलेल्या संसाराला
शिवायला गेले कासवं
चार ही तोंड चार दिशेला
समन्वयाचा अभाव दिसला
यांनी त्यांना सांगितलं
घरूनच नियोजन करा
अशी केली होती विनंती
यांनी ही ती केली मान्य
विसरून (?) आले तोच आदेश
ते ही पोचले बांधावर
अन म्हणाले रोजच येणार
आधी एकाच घरातले चार
बांधावर गेले लगातार
आजोबा, काका, पुतण्या, आत्या
जनतेचे कैवारी सत्य की मिथ्या
दूरवरून दौरे केले दोन चार
अन परिषदा ही घेतल्या फार
याचं बोट त्याच्याकडे तर
त्याचं बोट तिसरीकडे दूर वर
बळीराजा पाहिल कोणाकडे
कुटुंब, जमीन, झालेलं नुकसान
की गाव, राज्य, केंद्र, विरोधी
या बहुरुप्या लोकां कडे
पत्रकार ही गंम्मत घेतायेत
बिहार, खडसे, पक्ष बिक्ष झुगारून
आम्हाला राजकारण नको
असं म्हणत टोमणे ही मारले
यांनी त्यांना, साटलोट जणू
पहले कोण , पहले कोण
पहले आप, पहले आप
शर्यतीत यांच्या ही आकस आहे
घाणेरडा राजकारणी वास आहे
लग्न झालं, फेरे झाले,
मुलगी सासरी ही गेली
अन आता यांचे हे
वराती मागून घोडे
शरद पुराणिक
191020
Comments