सारंग भिडे अन त्याची वैश्विक प्रवास कंपनी
सारंग भिडे अन त्याची वैश्विक प्रवास कंपनी
आजचा विषय आहे एक मित्र, उद्योजक, गिर्यारोहक, तंदुरुस्ती भागीदार, उत्तम शिक्षक आणि बरंच काही असा सारंग भिडे आणि त्याची सारंग ग्लोबल टूर्स ही संस्था.
साधारण 20 वर्षांपूर्वी माझी आणि सारंग ची भेट झाली. निमित्त होतं Wockhardt ची कार्यालयीन सहल. त्या काळी आणि आज ही अशा सामूहिक सहलीचे नियोजन करणे हा त्याच्या व्यवसायाचा एक भाग होता, या क्षेत्रातील त्याची ही सुरुवात होती. सलग तीन वर्षे त्यांनी आयोजित केलेल्या त्या सहलींचा आम्ही मनमुराद आनंद घेतला. खेळणा प्रकल्प, H2O वॉटर पार्क, आसपासचे अनेक निसर्गरम्य ठिकाणी आम्ही ते ठरवले. आता याचे नियोजन हा आमच्या कामाचा एक भाग होता त्या मुळे त्याच्यासोबत जवळीक ही झाली. 300 ते 400 लोक एकत्र आणून त्यांना दिवसभर एकत्र एकसंघ ठेऊन मज्जा करून घेणे ही एक कला आहे. गोरापान, गुबगुबीत, घारे डोळे अशी भिडे आडणावाला साजेश त्याचं व्यक्तिमत्त्व. तितकाच हरहुन्नरी अवलिया.
सकाळी बस मध्ये बसण्याआधी हातात सँडविच, छोटी पाण्याची बाटली, आकर्षक टोपी ते दुपारचं जेवण, सामूहिक खेळ, मनोरंजन, रात्रीचे जेवण, संगीत रजनी आणि सुखरूप घरी. या सर्वात दर वेळी वेगळा अनुभव देणाऱ्या सारंग ची ती शैली, आपलेपणा आणि अगदी आपण आपल्या घरचेच कार्य आहे असा त्याचा वावर.
जेवणात ही विविधता - याचं छोटं उदाहरण म्हणजे 2000 साली "मुस्तफा ची बिर्यानी" ती ही भल्या मोठ्या तांब्याच्या डेचकीत आणि लाईव्ह "दम बिर्यानी" मोकळ्या जागेत शिजत होती, हे म्हणजे मांसाहारी लोकांचा कुलाचार भोजन असल्यासारखे जेवत होते. अक्खा आसमंत त्या बिर्याणीचा सुगंध (हे मुद्दाम काही खास लोकांसाठी), आम्ही शाकाहारी आमची वेगळी व्यवस्था होतीच. अशी अनेक उदाहरणे देता येतील.
संध्याकाळी मनोरंजन, संगीत रजनी, नृत्य असा बहारदार कार्यक्रम, ज्याचा आम्ही खूप आनंद घेतला आहे. आज ही ते बहारदार क्षण आठवतात. असं ते सारंग नियोजन.
पुढे मी पुण्यात आलो आणि दरम्यान सारंग ने ही त्याचे ऑफिस पुण्यात थाटले, आता त्याचा विस्तार देश विदेश समूह दौरे, व्हिसा, foreign currency असं सर्व एकाच छताखाली त्याने सूरु केलं. याच दरम्यान त्याने स्वतः ची corporate trainer म्हणुन ओळख ही निर्माण केली. सोबतच तो tourism trainer म्हणून ही उदयास आला आणि शेकडो असे कार्यक्रम त्याने केले.
मला पुण्याच्या ऑफिसच्या ही सहली आयोजित करण्याचे कार्य मिळाले अन मी पुन्हा सारंग ला संपर्क केला आणि इथेही तीन वर्षे सतत त्यानें आमच्या सहली खोपोली, लोणावळा, आणि इतर अनेक ठिकाणी आयोजील्या. इथे ही मनमुराद आनंद त्याने वाटला. साहसी खेळ, मनोरंजन, rain dance आणि नेहेमी प्रमाणे चवदार जेवण. ही सारंग ची USP आहे. एक वर्षे आम्ही खोपोली ला निघालो अन एक्सप्रेस वे पूर्ण जाम होता. आमच्या 6 बस, मुली, स्त्रिया, मुलं आणि ज्येष्ठ अधिकारी असे सर्व आम्ही त्यात अडकलो. 8 ते 10 किलोमीटर च्या रांगा. आम्ही नाश्त्याला तिथे पोचणार होतो पण सगळं विस्कटल. सारंग डगमगला नाही, तो बस मधून उतरला आणि मिळतील ती बिस्किटे, चोकलेट, वेफर्स असं सर्व विकत घेऊन ते सर्व बस मध्ये स्वतः वाटले. काही बस 2 ते 4 किलोमीटर दुर होत्या पण आम्ही सर्व चालत ते सर्व पोचवलं. तिकडे आमचे अनेक योद्धे तो जाम कमी करण्यासाठी अथक प्रयत्न करत होतो , तिथेही आम्ही योगदान दिले. आणि लोणावळ्याच्या तो घाट आम्ही 3 ते 4 वेळेस चाललो. पण सारंग ने या ही ट्रिप ची मज्जा ढळू दिली नाही, शिल्लक थोड्याच वेळात अतिशय नेटक्या पद्धतीने सर्व खेळ, मनसोक्त पाण्यात नाचून या सहलींचा आनंद घेतला.
मी हैदराबाद ला गेलो आणि तिथेही त्याची मदत मी घेतली. दरम्यान सारंग motivational speaker म्हणून वेगवेगळे प्रयोग करत होतो सोबतच अनेक दिगग्ज लोकांना घेऊन तो कार्यक्रम करु लागला. त्याचा वैश्विक प्रवास ही सुरू होताच. अन एक दिवस एका running स्पर्धेत माझी त्याची भेट झाली अन गुबगूबीत सारंग एकदम fit n fine तंदुरुस्त होता. पण एवढ्यावर थांबला तो सारंग कसला त्याने इथेही छोटे समुह निर्माण करून सायकल, चालणे, पळणे असे विविध कार्यक्रम अगदी विनामूल्य सुरू केले. इथे त्याला आरती चव्हाण हिची खूप मदत झाली अन Pedalwali असा एक सायकल सम्राट समूह तयार झाला. एक तंदुरूस्तीची चळवळ त्याने सुरू केली, आणि इथेही तो यशस्वी झाला.
पण "कोरोना" ग्रहण लागले अन चाकं फिरायची थांबली..
सर्व जण हताश झाले असताना सारंग नि संपुर्ण लोकडाऊन एक मोहीम सुरू केली. रोज 4 ला त्याने एक ऑनलाइन चहा कट्टा सुरू केला अन त्याच्या प्रवास विश्वातील अनुभव कथन तो करू लागला. हळूहळू काही उत्सवमूर्ती येऊन त्यांचे अनुभव कथन करू लागल्या. काश्मीर ते कन्याकुमारी, अगदी लेह, लडाख अशी सर्व ठिकाणं घरबसल्या दाखवून, तिथली संस्कृती, जीवन यावर त्याच्या विषेश शैलीत तो सांगत होता. हे कार्य आज ही सुरूच आहे. विविध विषय अगदी नाटक, सिनेमा, तंदुरुस्ती असे सर्व विषय हाताळले. किती किती तो सकारात्मक विचार आणि त्याला प्रामाणिक राहून जगण्याची उमेद वाढवण्याचं हे अगाध कार्य. खरं तर कोरोना मूळे त्याचा व्यवसाय अगदीच शुन्य होता, पण तो त्यात ही तरला, सोबत fresh भाजी, फळं, खाद्यपदार्थ असं ही सुरू केलं. पुण्याच्या असंख्य ज्ञात अज्ञात स्थळांची माहिती त्याने दिली.
अशा या सर्वअर्थांने हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व सारंग हा अनेकांना कळावा हा प्रामाणिक हेतु. तुम्हाला त्याच्या व्यवयसायाविषयी अधिक माहिती हवी असल्यास प्रत्यक्ष संपर्क करणे.
जय हो सारंग.....मी ही म्हणतो "साईबाबा" "साईबाबा"
शरद पुराणिक
260920
Comments