माहीत नाही ही प्रथा कुठे कुठे आहे आणि कुठे नाही...पण आमच्याकडे नागदिवे नावाचा एक उत्सव साजरा केला जातो ...साधारणपणे तो याच दिवसात येतो..म्हणजे जेंव्हा दिवाळीचं फराळ संपलेला असतो ...थंडी जाणवू लागते ...मार्तंड भैरव चे नवरात्र असत तेंव्हा हा उत्सव होतो...काही ठिकाणी याला सट अस ही म्हणतात... ज्यांच कुलदैवत खंडोबा म्हणजेच मल्हारी म्हाळसकांत आहे त्यांच्याकडे हा उत्सव मोठ्या प्रमाणात होतो...असो मला जे विषेश कुतूहल आवड आणी आठवण या सणाची येते ती या कारणाने की नागदिवे म्हणजे घरातील प्रत्येक सदस्याच्या नावाचा एक गोड मधुर पदार्थ त्याचा दिवा म्हणून ठरवायचा आणि अश्या सगळ्या गोड पदार्थांची मेजवानी ही आमच्या काळातील एकमेव भव्य असावी...म्हणजे माझ्या लहानपणी... तेंव्हा जेवणात गोड म्हणजे शिरा ..सुधारस किंवा केळीच शिकरण बाकी काही नसायचं आणि ते ही अगदी पाहुणे आले तरच ..इतर सण वार म्हणजे हमखास पुरण पोळी ...तर आशा या सणाची खूप प्रतीक्षा असायची ...कुणाचा दिवा श्रीखंड करंजी तुपसाखर जिलेबी विवीध प्रकारचे लाडू इत्यादी इत्यादी . आणी हे सर्व घरात केलें जायचे ..बाहेरून विकत वगैरे दुरापास्त होतं।..ते पाहूनच एक श्रीमंतीची भावना जागी व्हायची...या सगळ्यात माझा दिवा अतिशय कठीण होता तो म्हणजे वाटल्या डाळीचा बेसन लाडू ...मला जस कळतंय तस तो फक्त माझी आई करायची आणि आजही करते ...अश्या या सगळया पदार्थांचा देवाला नैवेद्य दाखवायचा ...तो तयार होऊन नैवेद्य आरती आणि जेवण यातलं अंतर खूप दूर वाटायचं... कधी एकदा ते आपण खाऊ आणि संपवू अस व्हायचं... बर आपला दिवा म्हणजे पेटंट ऑल राईट्स रिसर्वड ...खूप मज्जा असायची ..अनेक ठिकाणी अनेक पद्धती आहेत काही ठिकाणी वांगी भरीत भाकरी असतें ..असो हा लिहिण्याचा प्रपंच कारण बायकोने आत्ता एक फोटो पाठवला ज्यात माझी आई माझा दिवा करत आहे ..आणि मी क्षणिक काळा मागे गेलो.... सोबत आदरणीय आईचा फोटो जोडत आहे....


Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती