इतिहास पाहून घ्या

खुर्ची साठी

इह ब्रँड कोलमडले

एकच पक्ष

ज्याचा ब्रँड (घराणेशाही)नाही

तो मात्र तळपतोय


इतिहास पाहून घ्या 


रक्ताची नाती तोडली

घरं ही फोडली

आता वाघ ही घायाळ 

स्वतः च्या जखमेने


पिलं दिशाहीन फिरतायेत

त्यांना आवरणं नाही

उलट अंधारात तेल 

भडकत ठेवलय राज्य


फोटोत , टीव्ही वर 

त्रिमूर्ती दत्तात्रय अवतार

अन वास्तवात विलग चेहेरे

पुर्णतः भिन्न एक दुसऱ्याशी


एक गोळा त्याच आगीचा

उगाच टाकला दूरवर

पेटलं मिळालेलं आरक्षण

विझलेली आग चेतवली


खिडकीतुन पाहतोय तर

सर्वत्र धुराळा अन धूर


काही माकडांचा रंगलाय

कठपुतली चा खेळ 

आत्महत्या, नशा, बांगडी

नाचवणारे दोर कुठे आहेत ??


अजून शोधतोय मी

पण एक जाणकार बोलले

अहो खरे दोर लपवणे

हाच खरा खेळ आहे


राज्यपाल एवढे उपलब्ध

कोणालाही भेटायला

हातात कमळ घेऊन

टीव्ही वर चमकणाऱ्याला


मी मात्र विसरलो आजार

ताप, सर्दी, खोकला पाहायला

वेळच उरला नाही

हाल मृतांचे वाचताना


आज थांबतो ....


शरद पुराणिक 

एक व्याकूळ आणि चिंतीत महाराष्ट्रीयन

जाऊ का उद्या राज्यपालांना भेटायला ??

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती