देवा धाव रे ...बळीराजाला पाव रे

 देवा धाव रे ...बळीराजाला पाव रे


विस्मरणात गेलेला पाऊस

ज्याने तोडली होती नाळ

मराठवड्याशी, सतत कोरड आभाळ

गेल्या दोन दशकात झाला नाही

इतका की वाहून धुऊन नेलं

डोळ्यातलं स्वप्न अन हिरवं सोनं

इतका बरसतोय तो पाऊस


आधी नाळ तोडायची

मग बळजबरी ने जोडायची

असा कसा रे अघोरी हा खेळ

नाहीच बसत कसला मेळ


संकटातून संकट बिकट 

पिकलेले पेटवून दिलं नव्हतं गिऱ्हाईक 

आता तू वाहून नेलंस किती तऱ्हेवाईक

होतं नव्हतं ते विकून पाकून

जगलो तूच लावलेल्या रोगराईत

आता बसलो वाहून गेल्या मातीत


साचलेली पुंजी दिली दवाखान्याला

वाटलं होतं तू परत करशील सणाला

सण वार आलेत तोंडावर 

काय घालु रे लेकरा बाळांवर

मास्क आहेत झाकायला 

निघणाऱ्या शब्दांना दाबायला

पण डोळ्यांनी दिसतंय ते

तूच आन नवीन काही तरी आता

डोळे, कान, जीव झाकन्या करता


वाटलं  डोकावू  शेजारी

तर तू होऊ दिली नाहीस वारी

गणपती ही असेच घरचे घरी

नवरात्र ही होणार वरचे वरी

वाटलं एकदाचं घेतो भांडून

पण तुम्ही स्वतः ला घेतलंय कोंडून



पुन्हा दिसू लागतात तेच ते 

सुकलेले झाड, फांदी अन दोर

जीवाला लागून राहायला घोर

बाकी सगळे चोरावर मोर


शरद पुराणिक

151020

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती