आटपाट नगर  म्हणावं की

अंधेर नगरी चौपट राजा

की आणखी काय 


अशाच एका नगरीत रंगला

राजपाटाचा भव्य खेळ


सिंहासन तर खुणावत होतं

यांना, त्यांना, त्यांनाही


अन अवतरले "कुटनीती" राजे

जशी मंथरा अन शकुनी


म्हणतात ना जया अंगी मोठे पण

तया यातना कठीण


जया अंगी खोटे पण 

तया क्लृप्त्या अनेक 


घनघोर रंगले सारीपाट

प्रधान, अष्टप्रधान ही सुसाट


या पटावरून त्या पटावर

घर, अन चाली च्या जोरावर


सत्यवचनी अन राजधर्मी

साऱ्यांनीच पाळला धर्म 


तिकडे राम वनवासात गेले

इकडे खुर्चीवरून दूर गेले


राज्या राज्यात हीच परिस्थिती

सोंगट्या एकाच्या अन पट एकाचा


वर्ण, रंग, द्वेष, आवेश, हव्यास

अन बहुरंगी झेंड्याची आरास


यातच हरवला सामान्य माणूस

जाळ्यात रुतत गेला खोल


विसर पडला साऱ्यांचाच

नैतिकता, राजधर्म, कर्तव्याचा


हाच डाव साधला निसर्गाने

अन आधीच ढील, सैल

निखळून खिळ खिळ झालं

सारं सारं गलितगात्र 


उणें धुणे याचे अन त्यांचे

हाच रंगलाय नवा खेळ


तुम्ही आम्ही मात्र कठपुतली

एक दोर याचा, एक त्याचा


नाचून पाय थकले निराशा सर्वत्र

राम, रहीम, येशू सारे नांदु एकत्र


मिसळुन जाऊ रंगारंगात गर्द

शोधूनही सापडणार इतके एकरंग


मग होईल पळता भुई थोडी

अशीच जिरवु यांची खोडी


भारत माता की जय 


शरद पुराणिक

161020

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती