एका चिमुकल्याचं अस्तित्व

 सत्य घटनेवर आधारीत ।।।


एका चिमुकल्याचं अस्तित्व


मुलगा, आनंद. पहिला मुलगा होता अन दुसरी सुंदर मुलगी , आता तिसऱ्या वेळेस पुन्हा मुलगा झाला. तसा संसार त्यांचा छोटाच होता. पण घरची परिस्थिती एकदम व्यवस्थित होती. स्वतः ची 2 घरं, वास्तवात बंगले, चांगले बांधलेले, पैकीं एक किरायाने दिलेलं, बँकेत नोकरी होती दादाची.


उत्साहाला आणि आनंदाला पारावार उरला नव्हता. घरात एक गोंडस बाळसं वावरत होतं. मोहित करत होत सर्वानाच. लोक येणार भेटून जाणार, तसं बाळ सुंदर दिसतात पण सोनू खरंच सुंदर होता. आईवर गेला असावा पितवर्णीय अर्थात गोरापान, त्यात योग्य बाळसं लाभलेले. दृष्ट होऊ नये म्हणून त्याच्या गळ्यात काळ्या दोऱ्यातले चार सोन्याचे मणी घातले होते दादाने हौसेने, त्याला काय त्याचं पण आनंद असतो.


सोनू आता घरातील एक अविभाज्य घटक झाला, प्रत्येक जण दिवसातून वेळोवेळी त्याला खेळवण्यात, बोलण्यात मग्न, त्याच्या भाषेत, आपल्याला न समजणारी ती भाषा, खुदकन हसणं, तोंडाचा ,ऑ, करून, गालावर खळी पडते त्या क्षणीच तो आवडायचा सर्वाना. तसा तो जायचा ही सगळ्यांच्या कडेवर, गल्लीत आता तो सर्वांचा सोनू होता.


2 महिने झाले अर्थात सोनू 2 महिन्याचा झाला, त्याचं बारसं या ना त्या कारणाने लांबत होतं.  ठरलं एकदाचं बारसं न त्या सोबतच एक केळवणाचा कार्यक्रम.  बारश्याचा कार्यक्रम जंगी करायचा असा कौटुंबिक ठराव पास झाला. 


निमंत्रण पत्रिका छापल्या , त्या बरोबरच सग्या सोयऱ्यांना पत्र पाठवली, घराला लग्न घराचं स्वरूप आले.


एरवी लाडात आपण पिंटू, चिंटू, बबलू, मुन्ना अशी जी नावं ठेवतो तसंच याच्याही बाबतीत. सोनूचं नाव काय ठेवायचं या वर अनेक चर्चा झाल्या, घरात जे नाव नाही अस एक अभिनव नाव ठेवायचं ठरलं आणि 4 ते 5 नाव पक्की झाली, पैकी एक ऐनवेळी ठरणार होतं. 


दादानं पत्रिका वाटायला सुरू केलं. वेळ मिळाला तसे आमंत्रण देत गेला. 2 दिवसापूर्वी घर भर किराणा सामान इत्यादी जमवून ठेवलं, बाळाचे कपडे सोन्याचे दागिने सोनाराला सांगितले.


कार्यक्रम 2 दिवसावर होता घरात पाहुण्यांची रेलचेल कोणी अजून येत होते येणार होत. कोण येणार काय मज्जा होणार असा आनंद उराशी बाळगून जय्यत तयारी चालू होती. 


दुसरेदीवशी सकाळीच दीदी ओरडत ओरडत गल्लीत आली, सकाळची वेळ पाणी आलेलं नळाला तस सगळे बाहेरच होते.  दीदी ओरडली गेला दादांचा मुलगा गेला. उद्या सोनूच बारसं होतें आणि तो आजच या विश्वाला सोडून गेला होता.  झोपेतच गेला सोनू. रात्री खेळला बागडला अन झोपला. सकाळी आई उठवत होती, तसा तो कडक झाला होता, नंतर कळलं त्याला जाऊन काही तास झाले होते.


ना बोलता येत होतं ना समजत होतं. 2 / ४ महिन्यात काय कळलं त्याला जग, आई बापाची माया, त्याला कशाचेच सोयरसुतक नव्हतं. तो गेला तसाच चटका लावून. अगदी नाव ही ठेवलं नव्हतं ज्याचं , त्यानं अमूक एका घरात जन्म घ्यावा काय, आणि काही उमगायच्या आतच तो संपलेला, एक स्वप्नवत. या काळात त्याचा लागकेला लळा, बापानं पाहिलेले स्वप्नं, बहीण भावंडं ते ही लहान त्यांना फारस कळत नव्हतं काय होतंय, अन घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यात ज्यानं आपलं अस्तित्व निर्माण केलं होतं, आज त्यानं असं अचानक निघून जावं हे म्हणजे उघड्या डोळ्यांनी पाहीलेले अतिशय वाईट दुःखद स्वप्नं.



## शरद पुराणिक##

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती