व्हाट्सएप न भावकी
व्हाट्सएप न भावकी
काही वर्षांपासून माणसं दुरावली होती
आता म्हणे सोशल मीडिया मुळे पुन्हा जोडली गेली
इतकी की ती सतत तांदुळ निवडत राहतात
त्या अतिहुशार यंत्राने माणसाला पुन्हा दूर दूर केलं
प्रत्यक्ष जरी बाजूला असला तरी
बोलत नाही
आणि तिकडे फार दूर असणाऱ्याला पिंग करतो
सकाळी उठून देवाला नमस्कार न करता साऱ्या जगाला GM करतो
घरातली आई बायको चहा हातात घेवुन येते
तर हा किंवा ही यंत्रात गुंग असतो
अन मानेने इशारा करतो
थोबाड वर करून पाहात नाही
कराग्रे वसते लक्ष्मी पार बुडुन गेलं
अन भल्या पाहाटे या करा ना फक्त ते यंत्र दिसतंय
एवढं माञ सोप्प झालंय पूर्वी पेक्षा
की कुणाच्या घरात जाऊन डोकावून चौकशीची गरज उरली नाही
आता स्टेटस ला सगळं कळतं नाही तर चेहेरा पुस्तिकेत दिसतं
भावकी किंवा भोचक प्रपंच आज ही चालूच आहे
त्याचं माध्यम फ़क्त बदलले आहे
कशाला लाईक करायचं आणि मत मांडायचं याचे ही निर्बंध आहेत इथे
घरच्या ला सोडून दारच आवडायची जुनीच परंपरा आज ही आहे
बायकोच्या फोटो उघडुन ही न पाहता
शेजारणीचे फोटो झुंम करून पाहणारे महाभाग ही आहेत
जशास तसे असा पक्का नियम इथे ही कटाक्षाने आहे
तू मला तरच मी तुला लाईक नाही तर , वाचा आणि सोडा हा नियम
अगदी देवाला नमस्कार करताना ही हा धर्म पाळणारी पिलावळ आहे आज ही
देव तो देव असतो तो तुमच्या किंवा माझ्या मुळे मोठा किंवा लहान होत नसतो
मधला काळ बरा होता निदान ही
इर्षा आणि खोटी स्पर्धा नव्हती
आता आम्ही आमचा संसार उघड्यावर ठेवलाय
मदतीची अन आपुलकी ची दारं बंद ठेवून
तिरस्कार आणि इर्षेची दारं उघडली आहेत
तंत्रज्ञान कितीही बदललं तरी माणूस अजून तशीच आहेत
संकुचित कुत्सित स्वार्थी न स्वतः च्या च वलयात मग्न
कुठल्या कलेला दाद देताना ही त्याला व्यक्तिविशेष म्हणुन पाहणार
अगदी एखादी प्रतिक्रिया देताना
पन स्पर्धात्मक विचारात देतात
माझी सर्वोत्तम असावी म्हणून
नको तिथे मुद्दाम किंवा इच्छा नसताना
फक्त विरोधाला विरोध म्हनुन
देणार
निखळ निस्वार्थ स्वच्छंदी आतून आपली वाटावीत आणि निरागस चेहरे मी शोधतो आहे ।।
शरद पुराणिक ।।
Comments