बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....
बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....
*!! आढ् यतो वापि दरिद्रो वा दुःखित सुखितोऽपिवा ।
निर्दोषश्च सदोषश्च व्यस्यः परमा गतिः ॥*
अर्थ ::
धनाढ्य असो वा निर्धन, दुःखी असो वा सुखी, निर्दोष असो या सदोष – मित्र हाच माणसाचा सर्वात मोठा आधार असतो.
*!! माता मित्रं पिता चेती स्वभावात् त्रतयं हितम्।
कार्यकारणतश्चान्ये भवन्ति हितबुद्धयः।।*
माता पिता आणि मित्र हेच तुमचं हित पाहतात, सतत सोबत असतात...बाकी सर्व स्वार्थ आहे...सब मोह माया है...
मित्र आणि मैत्रीवर असंख्य गीत, कविता आणि quotes आहेत ते सर्व अनिता आणि मानसीच्या मैत्रीवर असे काही सजतात की विचारू नका. जणू देवपूजा झाल्यावर देवावर जाई जुई पारिजातक आणि जास्वंदी ची फुलं वाहिल्यानंतर जे भाव पूजा करणाऱ्याच्या आणि दर्शन घेणाऱ्याचा मनात येतात अगदी तेच भाव. खरतर या विषयावर मी पूर्वी एकदा व्यक्त झालो आहे ते आमच्या कौटुंबिक जिव्हाळ्याची गोष्ट होती...पण आजचा हा विषय आहे या दोघींच्या घट्ट मैत्रीचा. ती सुरुवात कुठे झाली या विषयीही मी लिहिलं होतच....थोडासा संदर्भ घेऊन पुढे जाऊ...
आम्ही पुण्यात 2004 साली आलो आणि 2006 साली मानसी ची अनिताशी ओळख झाली. निमित्त होते आमच्या मुलांच्या शाळा. एकच शाळा, एकच बस स्टॉप, तिथे अनिता अन मानसीच मैत्रीचं बीज रोवल ...आणी तो आता या नात्याचा वटवृक्ष झालाय त्या सावलीत असंख्य सुख दुःखाचे क्षण गोंजारत, कुरवाळत ती मैत्री अजून अजून समृध्द करत आहेत.. काही कळण्याच्या आत ही मैत्री दर कोस दर मजल अधिक अधिक घट्ट झालिये.
आज त्याच मानसीचा वाढदिवस आहे... खरतर गेली काही महिने अनेक कठीण प्रसंगातून मानसी आत्ताशी जरा बाहेर पडलिये.... काहितरी छोट्या मोठ्या शारीरिक कुरबुरी, त्यावर उपचार असे अनेक आघात तीच्या वर होत होते. आज जरा बरी झाली की पुन्हा काहीतरी नवीन अशी अनेकवेळा ती दवाखाना आणीं घर असा तो प्रवास. या दरम्यान अनिताची होणारी घालमेल मी पाहू शकत नव्हतो. तिच्या प्रत्येक चाचणी, तपासणी असेल त्या दिवशी ती सकाळपासून काळजीत असायची, मला ही त्या काळजीत सहभागी व्हाव लागायचं कारण ती भावनिक दोर अशी नाजूक आहे. या दोघींनी सुखदुःखात एवढ गुंफून घेतलय ... त्याच्या सहवेदना आणि आनंद ही आमच्या दोन्हीही घरात नांदत राहतात.
अगदी ICU मध्येही एकमेकींना भेटण्याची त्यांची ती ओढ पाहिली मी दोन चार वेळा.... या दरम्यान तिचं कशा कशात लक्ष लागायचं नाही.... मूल लगेच म्हणायचे चल तुला मानसी कडे सोडतो. जो वर हि तीला डोळ्यांनी पाहत नाही तोवर तिचा चेहेरा पाहण्यासारखा व्हायचा.
अनिता तिच्या फोन न पाहण्याच्या आणीं तो न वापरण्याच्या सवयीमुळे तिच्या सर्व मैत्रिणी तक्रार करतात. बाकी मैत्रिणींचा ही उल्लेख झालाच पाहिजे. तसा या पाच सहा जनीचा घट्ट समूह आहे. सगळ्याजणी एकमेकात तितक्याच रंगून गेल्या आहेत. त्यांचाही उल्लेख व्हायलाच पाहिजे .... तशा त्या सर्वच समजूतदार आहेत...तर त्यांनी कधी अनिताला मेसेज केला तर ही बाई ते तास न तास पाहत नाही...मग मानसी मला मेसेज करते आणि अनिताला मेसेज पाहायला सांगा अस कळवते. ती फोन ही करते एका मागे एक असे दोन चार फोन करते...आणि हिने नाही उचलला तर पुन्हा मला फोन करते ...मी नाही घेतला मुलांना केतेव...ते काळजी पोटी, जोवर तिचा संपर्क होत नाही तो वर ती बेचैन होते....वेळ पडलीच तर गाडी घेऊन थेट घरी पोचते...आणि मग काळजी हक्काचं रूप घेऊन तिच्यावर मग शब्दांचा असा काही मारा करते ..ते क्षण पाहण्यासारखे असतात....
या नंतर दोघींचे गप्पांचे फड एकदा रंगले की तास न तास न थांबणारे. मानसी ची गोष्टच निराळी. खूप बोलका स्वभाव , तितकीच मदतीला धाऊन येणारी, अन प्रचंड मायाळू. किसीं को एक बार अपना कहा , तो फिर बाकी सब कुछ नही, असंच काहीतरी.
खरं तर एका बस स्टॉप वर बायकोची झालेली मैत्रीण ते आजचे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध या मध्ये अनेक घटनाक्रम आहेत जीथे तिने कायम एक खंबीर आधार, मानसिक, कष्टाचा आणि मदतीचा एक अदृश्य हात दिला... अदृश्य एवढ्यासाठी म्हणतो की ते करताना ते कधीही दाखवत नाहीत, दिसू देत नाहीत आणि तो घेऊन मिरवत ही नाहीत आणि त्याचे मिरे वाटत ही फिरत नाहीत. नाही तर काही लोक काहीही न करता, किंबहुना फ़क्त द्वेष, अनादर करून आम्ही यांना कशी मदत केली ते दाखवत फिरतात, एक सफेद झूठ, स्वार्थी, खट्याळ आणि नाठाळ मंडळी. पण अळीमिळी गुपचीळी 🤐.
खरतर या मैत्रीच्या बंधास जी मजबूत विण आहे ती आहे निरपेक्ष प्रेमाची... निस्वार्थ भावनेची ... कोणीही कोणाला काही उंची बक्षिसी दिलेली नाहीत...कोणाच्या हि कोणाकडून कसल्याही अपेक्षा नाहीत .. फक्त आणि फक्त निखळ मैत्री आणि प्रेम असल्याने तो मैत्रीचा सच्चा रंग या नात्यात दिसतो..... कधी कधी या मैत्रीवर मी ही jealous होतो अर्थात चांगल्या अर्थाने.... दोघी एकमेकींना इतक्या ओळखून आहेत .... त्यांचे दोघींचे अनेक गोष्टींवर मत ही वेगळे असतात ... पण म्हणून यांच्या मैत्रीला काहीच फरक पडत नाही.... त्यांच्या भिंती पक्क्या आहेत...त्या इमारतीची भव्यता वाढवणाऱ्या इतर मैत्रिणी ही त्याची अजून शोभा वाढवतात...
आज ही मानसी घरी आली तर तिचा चहाचा कप धुतेच, पण सोबत तिथे जे काही असेल ते आवरून सावरून जाणार. अनेकदा गौरी च्या जेवणानंतर चार चा चहा तीच करते. अन दुपारी जेवणासाठी भरलेली मैफल संध्याकाळी चहा नंतर समाप्त होते. तसंच आम्ही ही तिकडे गेलो तर हाच दिनक्रम असतो.
सुख, दुःख, आनंद, धमाल अशा प्रत्येक क्षणात मनःपूर्वक सहभाग, मदत, आणि केवळ निर्भीळ आनंद उधळत इतरांना आनंद देणाऱ्या अन काही क्षणी अश्रू ना मोकळी करण्याची एक हक्काची जागा अश्या या मानसी विषयी लिहावं तेवढं थोडं आहे.
आमची मुलं ही त्याच रंगाच्या धाग्यात विणली आहेत, तशीच घट्ट एक रंगी. तिच्यामुली ही अनिता दिसली की अक्षरशः गळ्यात पडतात आणि सर्व गोष्टी शेर करतात. इकडचा न तिकडचा प्रत्येक पदार्थ दोनीही कडे वाटला जातो, ते अगदी भाजी चटणी लोणचे आणि सर्व काही.
अनेकांनी याला भेगा पाडून ते कमकुवत करण्याचा अयशस्वी प्रयोग केला, करतील ही, पण ही घट्ट वीण अशी तुटणार नाही...
त्या मैत्रीला आज शब्दांचा काळा दोर त्याची दृष्टावन म्हणून आणि मानसीला जन्मदिनाच्या शुभेच्छांचा एक गुलदस्ता म्हणून पाठवतो....
*जन्मदिनाच्या अनंत शुभेच्छा मानसी !!
जीवेत शरद: शतम !!*
शरद - अनिता
निशांत - हर्षल
पुराणिक
१५०४२४
Comments