येळ आवस सजली थाटात

 आज बडेगावच्या शेतात

येळ आवस सजली थाटात 

हिरव्यागार चादरीवर दिसले 

चवदार खमंग आंबील ताटात 


आत्या सूना भावंडे पिढ्या तीन

आस्वाद घेती होऊन तल्लीन

हे सारं आम्ही करंटे पाहतो दुरून

आत्ताच निघालोय कामावरून


ही आवस असते एक सोहळा 

काळया आईचा ज्यांना लळा 

चार दगडावर रचलेला कोपा 

त्यावर स्वादिष्ट नैवेद्य आगळा 


तीनच दिलेल तिलाच द्यायचे 

हीच तर आमची रीत आहे

तुम्ही आपल सांगत राहा 


we should give back to earth!!


एकरा एकराची आठवण येते

सुपीक नापीक सुकाळ दुष्काळ 

सारं सारं सहन करत जगवते 

जनु आई आपला संसार सजवते 


त्या आईला, आठवणींना अन् हे 

भाग्य प्रत्येक पिढीच्या नशिबात 

देणाऱ्या त्या साऱ्या साऱ्या 

आप्तेष्ट वडीलधाऱ्या ना समर्पित 


शरद पुराणिक 

३०१२२४ येळ आवस

Comments

Popular posts from this blog

How do I say a Good Bye once for all Harish Sir !!

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी