घरच्या बागेत फुलत राहतात

 घरच्या बागेत फुलत राहतात 

बहुरंगी फुलं ही अव्याहत 

देव्हाऱ्याची शोभा वाढवतात 

विठ्ठल रुक्मिणीवर सजतात


घराला उजळून टाकतात

मधुर सुगंध बहरत राहतो

प्रसन्न लहरी उधळतात

नित्य नवचैतन्य देत राहतात


सुबक नाजूक कळ्या त्या

वाऱ्यासवे डोलत राहतात

हलकेच नृत्य करावे तश्या 

खिळवून ठेवतात कित्येकदा


आज त्यांना एकत्र केलं 

का त्यांची ताटातूट उगाच 

राहू दे त्यांनाही धुंद मस्तीत

देव्हारी राहण्या हट्ट कशाला....


शरद पुराणिक

261224

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती