शंभू महादेवा गाऱ्हाणं ऐक रे .

 शंभू महादेवा गाऱ्हाणं ऐक रे .


आज तुझी शिवरात्र 

 कुलूपबंद याच दिवशी तू मात्र 

अरे निदान तुझ्या पिंडीवर

आवर्तन केलं असतं क्षणभर


पुर्वी उघडायचा तिसरा डोळा

जरी तू भक्तांचा सांभ भोळा

आज तुझं शिव तांडव नाही 

दर्शनाची ही शक्यता नाही 


सरस्वतीचे उपासक रस्त्यावर आले

तू नाही तर त्यांनी तांडव केले

त्यांच्याच रूपातून तूच ते केले

असे या भोळ्या भक्ताला वाटले


रोजी रोटी साठी त्यांची धडपड

अन राजकारणातील पडझड

वर्दीतलेही करतायेत धर पकड

किती ही अवस्था आहे अवघड 

 

कोणी खाऊन  उपवास केला

लेकरांनी उपाशी दिवस काढला

 विनवण्या आक्रोश गगनाला भिडले

सरस्वतीचे उपासक एकाकी पडले


देवा तोड ते कुलूप

घे तुझं त्रिशूळ

घाल शिवतांडव

अन दे एकदा तुझं दर्शन


जय भोले, जय शंभो, शिव शंभो

हर हर महादेव


शरद पुराणिक

शिवरात्र 110321

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती