दोन वर्षे जुनी आठवण ....repost

 दोन वर्षे जुनी आठवण ....repost 


काल परवा पुण्यात एका कार्या साठी जाण्याचा योग आला.  कार्यक्रम 2 दिवसाचा होता आणि बरीच पाहुणे मंडळी जमली होती.     आणि सर्व एकत्र आले की बऱ्याच गमती जमती होतात... हल्ली मंगल कार्यालय घेणं म्हणजे दिव्य झाले आहे. लक्षावधी भाडं देऊन ही वर त्यांची नियमावली सांभाळायला जमत नाही... त्या मूळे हा ही कार्यक्रम घर आणि आसपाची जागा यातच होता... कारण सुट्ट्या वगैरे चा काळ नसल्याने थोडीच मंडळी जमली होती. आता घरीच म्हणजे बर्याच अडचणी चा सामना करावा लागतो... बर येणारी मंडळी हे माहीत असून ही मुद्दाम काही खास सोय करण्याचा खटाटोप करत असतात... घर म्हणलं की एक किंवा फार तर 2 टिव्ही असणार ...त्यात हल्ली हे मालिकांची कल्लोळ . ह्याला ती पहायची तर त्याला ती .. हे अगदी बाल गोपाळ ते जखं म्हातार्या पर्यंत लागू होत ..कार्य म्हणून आधीच सामान आवरून ठेवलेले, त्यात आलेल्या लोकांच्या बॅगा,कार्याचं सामान वेगळं,घराचं पार गोदाम झालेलं, त्यात टप्प्या टप्प्यावर माणसांचे जथे.  एक आवर्जून पाहायला मिळते ती गोष्ट म्हणजे प्रत्येक समूह हा एकमेका पासून वेगळा असतो, मुख्यत्वे सासर आणि माहेर अशी एक मोठी विभागणी असते, आणि या LOC च्या भोवताली चालताना त्या घरातल्या कुटुंबाची चांगली तारांबळ उडते. एक सामान्य पणे पाहायला मिळते ती गोष्ट म्हणजे या सर्व कार्यात सर्व ठिकाणी त्या घरची लग्न झालेली मुलगी जावई तिची मुलं आणि तिच्या सासरची मंडळी म्हणजे अगदी VVIP. आहा काय त्यांचा थाट आणि आदरातिथ्य... सगळं एकदम खास...त्या नंतर उतरत्या क्रमाने त्या बाईंच्या माहेर ची मंडळी , भाऊ बहीण भाचे आणि तत्सम..इकडे बुवांच्या घरची तशीच मंडळी.मग त्या त्या नातेवाईकांची मुलगी आणि तिचा नवरा अर्थात जावई..हे आलेले नसतील तर त्या आई  बापां कडे बघवत नाही .==सारखे आपलं कधी दारात कधी खिडकीत वाकून पाहणार.. इतक्यात एक कोणीतरी ओरडतो ताई आली ..ताई आली... वाट पाहणाऱ्या त्या काकू आणि काका वयाचं शरीराचं सर्व भान हरपून पळत सुटतात..आणि मग त्या आलेल्या बाईंचे हाव भाव बघण्या सारखे असतात...म्हणजे अगदी आटपाट नगरातील राजाच्या राजकन्ये सारखी..त्याच आविर्भावात ते जावई ही प्रकट होतात ...मग मधल्या पोरा सोराना काम ।। बॅगा उचला चहा द्या. त्या वेळी त्या मुलांच्या भावना काय असतात हे फोडून सांगायला नको... मग ती आई म्हणणारी लगेच मुलीला गोंजारणार मुके घेणार आणि अस दाखवणार की कित्येक वर्षातून ती हिला भेटलीच नाही... खर तर तस नसतं... मग त्या घरची सून म्हणणारी जिची कामाने आणि जबाबदारी सांभाळून पार मोलकरीण झालेली असते तिची यांची सोय करता करता तारांबळ उडते... आता तुम्ही म्हणणार हल्ली सगळं outsource  केलेलं असत..तरीही सगळी व्यवस्था पाहावीच लागते...या सगळ्या धावपळीत तिला बिचारीला तिच्या माहेरच्या लोकां कडे पाहायला वेळच नसतो ..ते आपली आपली व्यवस्था जिथे जशी होईल तशी करून घेतात...हे सगळं होत असताना त्या घरच्या माणसाची तारांबळ वेगळीच ।। प्रमुख म्हणून सर्व व्यवस्था होत की नाही या काळजीत पार बुडून गेलेला असतो ।। धावपळ तर विचारूच नका... यात अनेक संधी साधू पाहुणे असतात जे स्वतः कधी कोणाची व्यवस्था ठेवतील की नाही पण अशा ठिकाणी एकदम रूबाब गाजवणारे असतात... मिळेल ती गोष्ट येवू द्या या धर्तीवर त्यांचा कार्यक्रम चालू असतो... रोज उशिरा झोपणारे अगदी संध्याकाळी च अंथरून घालून जागा बाळकवणार ...नाष्टा ते निद्रा सर्व ठिकाणी यथेच्च कार्यक्रम.. कसलीही तमा न ठेवता...सर्व पंगतीला यांची हजरी क्रमप्राप्त... सकाळच्या चहा  पासून ते रात्री शेवटच्या पंगती पर्यंत  आणि एवढंच नाही तर कार्य झाल्यावर उरलेल्या चिवडा लाडू ते गोड धोड संपेपर्यंत ते हक्क सोडत नाहीत... निघताना ही थोडं असलं तर घेऊन जायची ही तयारी असते. इकडे कार्यक्रम चालू असतो आणि दुसऱ्या बाजूला घोळके आपापल्या समूहात प्रत्येक कोपऱ्यात सामावतात ...परवा एक अशीच प्रेमळ आई मुलीला काही नाही तर पाण्याचा आग्रह करत होती ...वर काय बाई या पोरी जरा लक्ष देत नाहीत स्वतः कडे ..आणि लेकीची मुलं बाळ सांभाळत त्यांना इतकं लाडाने आणि प्रेमाने गोंजारणार ...तिकडे त्या घरच्या सुनेची मुलं कुठे तरी कोपऱ्यात आपलं आपलं खेळत असतात ..त्यांना ना कोणी खान पान विचारात ना कोणी जवळ घेत....आश्चर्य कुतूहल आणि दया असे सगळे भाव जमतात माझ्या समोर... काही तरुण मुलं आपली कुठं काही दाळ शिजते का या प्रयत्नात असतात ...विशेष मुली आणी त्यांचा मेकअप म्हणजे असं वाटतं की यांचं फोटो शूट चालू आहे की काय... इकडे वेग वेगळे विधी चालु असतात आणि इकडे यांचं वेशभूषा बदलणं...कधीं कधी प्रश्न पडतो हे खरंच या कार्यासाठीच आलेत का नाही. परवा एक 65 च्या आजी स्वतः च इन्सुलिन घेत होत्या अगदी दुपारच्या 3 वाजता..मी सहज विचारले आता का .अहो मला माहीतच नाही 2 स्वीट आहेत एक खायचं राहिलय..कारण  त्यांना जास्तीचं गोड अजून खायचं होत.. आहे ना गम्मत. या वर न थांबता त्यांनी मला ते आणायला ही सांगितलं...शेवटची पंगत बसली इकडे ही विभागणी होतीच ..ते तिकडे हे इकडे ...अगदी वाढण्यारा महीला ही फक्त त्यांचं त्यांनाच वाढत होत्या।।।धन्य धन्य ..हे असं सर्व ठिकाणी असतंच नाही पण काही ठिकाणी  बर्या पैकी आहे हो...स्वानुभवातून ।। शरद पुराणिक 🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती