म्हणतात ना आईचं काळीज आई झाल्या शिवाय कळत नाही !! मुलांच्या आनंदात स्वत: चा आनंद शोधणारी आई ।। त्या साठी आपली सारी स्वप्नं गुंडाळून ठेवून त्याचं गाठोडं कोणालाही न दिसू देणारी ।। मुलां साठी राब राब राबणारी पहाटे उठून त्यांचे डबे त्यांच्या आवडी निवडी सहित तयार ठेवणारी ।। त्यांनी खाऊन झालेले डबे स्वतः च त्यांच्या बॅग मधून काढून स्वच्छ धुवून ठेवणारी आई ।। काळ बदलला जगण्याची रीत बदलली पण आई आईच आहे ।। आजची आधुनिक आई ही तितकेच कष्ट करते ।। तिला सोइ सुविधा आहेत पण घरातलं अन बाहेरच अस दोनीही जग संभाळणारी ।। मुलांच्या ऍडमिशन ते ओपन हाऊस ला जातीनं हजर राहणारी ।। ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता मुलांची ने आन करणारी ।। हे करत असताना शेजारच्या लोकांचे टोमणे - काय फिरते ही बाई - असे सहन करणारी आई ।। स्वतः घरात गॅस चालू न करणाऱ्या इतर बायकांच्या चौकशीला  ( आज काय डब्यात ।। पोळी की नुसता भात इत्यादी) तितकेच हळुवार उत्तर देणारी..आणि रोज चवदार चारी ठाव जेवण देणारी ।। तरी काही मुलं बाहेर पिझ्झा बर्गर खाणारी आणि त्यांच्या उरलेल्या पोळ्या दुसरे दिवशी स्वतः खाणारी आई ।।  पुर्वी आई फक्त घरांत होती पण आज आईचा वावर अस्तित्व आणि गरज घराबाहेर आहे ।। मुलांचे कलासेस शोधणं त्यांच्या शैक्षणिक अभ्यासात लक्ष देवून त्याचा पाठलाग करणं ।। सर्व कागदपत्र आणि त्यांची पूर्तता वेळेत करणं ।। ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सांभाळणं ।। कामांची  भली मोठी यादी जी दिवसाभर सरता सरत नाही ( धुनी भांडी केर कचरा  भाजी आणणे चिरणे निवडणे कपड्यांच्या घड्या चप्पल बूट व्यवस्थित लावणं ही रोजची घरातली न संपणारी कामं वेगळी) ।। ही आई त्यातून वेळ काढुन कस सगळं सांभाळते हे त्या माऊलीला च माहीत ।। स्वतः साठी थोडा वेळ घे ग माऊली ।। कधी आरशात स्वतः ला बघ आणि थोडी स्वतः साठी जग ग बाई ।।  आशा समस्त आयांना माझा साष्टांग दंडवत ।। नमस्कार आणि शुभेछा 🙏🏻🙏🏻🙏🏻 शरद पुराणिक ।।

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती