पूर्वपुण्याइ, भक्ती संचय आणि आत्मप्रेरनेचे फलीत
आजचा विषय
पूर्वपुण्याइ, भक्ती संचय आणि आत्मप्रेरनेचे फलीत
मी मागील दोन ते तीन लेखामध्ये माझ्या घराण्याच्या इतिहासाविषयी लिहिले आहे. त्या लेखांचा संदर्भ घेऊन आज चा विषय मांडत आहे. जो माझा खूप दिवसापासून विचार होता, पण ते घडत नव्हते. शेवटी तो योग आज बहुधा गणेश कृपेने आला. मी "पुराणिक" आडनावाचा जो अल्प धार्मिक संदर्भ दिला त्याचा एक मोठा धागा म्हणजे आजचा हा लेख. खरं तर आम्ही पुराणिक आजच्या पिढीत जो वसा उचलून पूर्वजांचे कार्य पुढे नेने हे आवश्यक होते, पण ते आम्ही कोणी जरी करू शकलो नसलो तरी प्रत्येक जण आपल्या जागी त्यावर काही ना काही मनन, चिंतन करून तो ठेवा उराशी ठेवून आहेत. पण सर्वार्थाने ते धर्म कार्य करणारी एक सिद्ध भगिनी आज हे कार्य अत्यंत मनोभावे पुढे घेवून जात आहे. ती आमची भगिनी सौ.वसुंधरा श्रीपादराव पाठक, पूर्वाश्रमीच्या सौ.वसुंधरा लक्ष्मीकांत पुराणिक.
आजच्या या प्रचंड धावपळीच्या युगात दोन मुले, सुना, नातवंड याच सोबत संसार रथाच्या इतर दोऱ्या हातात घेऊन यशस्वीपणे दोनीही पातळीवर म्हणजे अध्यात्मिक आणि सांसारिक पातळीवर ती ज्या दिव्यत्वाने मार्गक्रमन करत आहे याचा मला आत्यंतिक अभिमान ...फ़क्त अभिमान नाही तर गर्व आहे.
तिला लहान पणापासून अध्यात्मिक आवड होती पण नंतर संसारातून थोडा वेळ मिळाला, अस ती म्हणते हा वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो. आणि तो प्रत्येकालाच मिळेल किंवा दिसेल असे नाही. या मिळालेल्या वेळात तो वेद उपनिषदे पौराहित यांचा अभ्यास करू लागली. तिचा हा सर्व कार्यभ्यास पाहून, श्री क्षेत्र दत्त नाम गुंज येथ गुरु छननुभाई नि तिला भागवत कथा करा अशी गुरू आज्ञा दिली दत्त पादुका समोर ही तेच शब्द सतत कानात गुंजत होते आणि विचार केला हे सोपं नाही. परंतु माजलगाव ला गेले ( तिच्या सुनबाई चे माहेर )तीथेच वे शा स गोविंद बुवा भेटले ते अतिशय कडक ते महीला शी बोलत नाहीत परंतु चर्चा करताना त्यांनी हिला माहेर कुठले विचारले पुराणिक सांगताच त्यांनी तत्काळ त्यांच्या पवित्र वाणीतून परवानगी दिली आणि बोलले तुमच्या वंशाची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे. योगायोग असा की तिच्या धार्मिक संपरकातून श्री क्षेत्र पंढरपूर हुन भागवत ग्रंथ आला. आधी तिने स्वतः तो अभ्यासला आणि सततचे मनन, चिंतन करत असताना गुरु कृपा झाली आणि तिची या सदमार्गी दिंडी निघाली. आधी एक ते दोन कथा सुरू झाल्या आणि हळू हळू तिची भागवत सर्वत्र झाली. एकुण ५१ भागवत झाले जगन्नाथ पुरी, शुकताल, नैमिष अरण्य माजलगाव, बीड, अमरावती नगर, महैसा तेलंगणा, मुंबई (कडेकर बंडु) औरंगाबाद येथे वृध्दाश्रम व इतर कथा झाल्या. या दरम्यान ती अनेक क्षेत्री येऊ जाऊ लागली आणि एकदा श्री क्षेत्र, शक्तीपीठ माहुर येथे केदारेगुरूजी नी सांगितले, ताई आता तुम्ही देवी भागवत करा व एक सेवा माहुर गडावर द्या. जगदंब कृपा झाली अभ्यास केला व कथा सुरू झाली एकुण ५५ कथा झाल्या माहुर गडावर एक सहींता पारायण देवी समोर झाले व कथाही झाली नंतर बासर, सप्तशृंगी. कोल्हापूर नासीक काळाराम मंदिर, पंचवटी मोहटादेवी, मळगंगा देवी, गुरु मंदिर कारंजा, लाड येथे संस्थान येथे प्रथम देवी भागवत कथा झाली.(सोबत काही फोटो जोडत आहे).
नर्मदा परिक्रमा करताना प्रवासादरम्यान गाडीत देवी भागवत प्रवचन झाले औरंगाबाद येथे कथा झाल्या. दर महिन्याला माहुर गडावर जगदंब दर्शनासाठी जात होती, परंतु कोरोना मुळे थांबावे लागले. याचं शल्य तिला होतें, मग त्याचा परिपाठ म्हणून ह्या करोना काळात ११० सप्तशती पाठ झाले, आणि पाठात्मक शतचंडी तिच्या पवित्र वाणीतून झाली.
पण म्हणतात ना एकदा तुम्हाला या भक्तिमार्गाची आस लागली ती अशी सहजा सहजी तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. ताई ने दरम्यान शिव पुराण चा अभ्यास केला व यात तिला पार्थिव शिव पूजा महत्व समजले आणि अहो आश्चर्यम, या श्रावण महिन्यात रोज १०८ लिंग पूजा प्रदोष या काळात तिच्या हस्ते निर्विघ्न पार पडली. (सोबत फोटो आहेच)
ताई सध्या अनेक विषयांवर प्रवचन करते सेलु येथे बाबासाहेब मंदिर येथे ज्ञानेशवरी प्रवचन झाले सामाजिक बांधिलकी म्हणून गर्भ संस्कार ही करते इ स १९९१ ला भारतीय जन गणना येथे कार्यरत असताना राष्ट्र पती पदक हा सन्मान मिळाला या सर्व वाटचालीत आमचे भाऊजी श्री श्रीपाद राव पाठक, तिची दोन्ही मुले व सुनांचा खुप मोठा आधार आणि सहायय आहे म्हणून हे शक्य झाले असं ती कायम सांगते आणि सोबत असं ही बोलते की आता मावळतीला एकच ईच्छा जगदंब सेवा सतत घडावी. पण ताई सुर्या सारख्या तेजाने तळपणाऱ्या या साधिकेला मावळण्यासाठी अनंत अवकाश आहे. जे तू कधी विचारात ही आणू शकली नाहीस एवढं दिव्य धार्मिक कार्य तू तुझ्या आणि तुझ्या प्रबळ इच्छाशक्ती द्वारे सिद्ध केलंस ते अगाध, अनंत आणि सर्वव्यापी आहे.
आमची फक्त बहीण अशी साधी ओळख तू आता एवढी मोठी केलीस की असंख्य पदव्या, बिरुदे त्या पुढे फिकी पडतील. दुधात साखर म्हणजे दस्तुरखुद्द दाते पंचांग कर्ते श्री दाते यांनी तिचा यथायोचित सत्कार केलाय (सोबत फोटो जोडत आहे).
तशी ही प्रासादिक आशीर्वादाची यादी खूप मोठी आहे, प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी तिथल्या दिव्य सिद्ध व्यक्तींनी वेळोवेळी तिचा यथोचित आदर सत्कार केलंच आहे, यात प्रामुख्याने नैमिष अरण्यातील श्री गुरू, बीडचे आदरणीय वंदनीय पुजनीय असे श्री धुंडिराज शास्त्री पाटांगणकर यांनी ही तिचा अक्षरशः वंदन करून सत्कार केला. तो क्षण ही अंबेच्या मंदिरात माहुरगड येथे होता जेंव्हा ही देवी भागवत करत होती आणि आदरणीय शास्त्री ही वाचत होते, संपल्यावर त्यांनी विचारले ताई काय वाचताय, तिने पूर्ण परिचय दिल्यावर ते अक्षरशः भक्तीने ओतप्रोत झाले आणि स्तुतीसुमनासाहित योग्य आदर सत्कार केला. असे अनंत प्रसंग आहेत, पण हा क्षण म्हणजे पुराणिक आणि पाटांगणकर घराचा दुवा देणारा होता. त्यांनी या वेळी आवर्जून माझ्या वाडीलांचाही कै. वसंतराव पुराणिक. नामोल्लेख केला.
याच बरोबर माझे काका श्री सुरेश उर्फ गोपाळ पुराणिक हे ही शक्य असेल तेंव्हा तिच्या कार्यक्रमात हजेरी लावतात. ते स्वतः ही एक दिव्य व्यक्ती आहेत, अगाध भगवती सेवा सप्तशती च्या माध्यमातून, त्या सोबत योग साधना आणि प्रगल्भ धार्मिक आचार असं ते मिश्रण आहे. व्यावसायिक पातळीवर उच्च पदस्थ अधिकारी राहून ही त्यांनी अंगिकरलेला विनय स्वभाव आणि तेजपुंज चेहेरा हे त्याचं द्योतक आहे. तर त्यांचेही तिला सतत आशीर्वाद मिळत असतात.
त्या सोबतच आमच्या कुटुंबातील इतर सदस्य ही हजेरी लावतात आणि तिचे मनोबल वाढते. घरच्यांनी केलेले कौतुक हे कायम मोठे बक्षीस असते. खूप नामोल्लेख आहेत तेंव्हा सर्वांचे नाव लिहिणे शक्य नसल्याने मी ते टाळत आहे, तेंव्हा सर्व प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी जणांचे मी ताईच्या वतीने आभार मानतो.
आदरणीय वाचकांना हे आवर्जुन सांगावे वाटते ही कुठल्याही प्रकारची जाहिरात नाही, किंवा हे लिहून अधिकची काही प्रसिद्धी मिळवणे हा हेतू यत्किंचितही नाही. ज्या साठी हे मी लिहिले आहे ते हे की आज जेंव्हा समाजातील इतर स्त्रिया / पुरुष ज्या गृहिणी, काही नोकरी किंवा व्यवसाय यात गुरफटलेले आहेत, आणि एक चाकोरीबद्ध जीवन जगत आहेत, त्या सर्वांसाठी हे एक जिवंत पवित्र उदाहरण आहे. शेवटी तुम्ही आम्ही जगतोय ते ही चांगलं पण ते जगताना आपण निव्वळ स्थूल देह अवस्था जगतो. आपले दुसरे दोन देह ते म्हणजे सुक्ष्म देह आणि कारण देह आपण जगतच नाही.
ज्याला या उर्वरित न दिसणाऱ्या आणि फक्त अनुभवसिद्ध होणाऱ्या सूक्ष्म आणि कारण देहाचे दर्शन घडले तो सर्वार्थाने जीवन जगला असं समजावे. पण या साठी तुमची पुर्व पुण्याई आणि भक्ती संचय यांचे प्रमाण जगण्याच्या पोकळ आसक्ती पेक्षा अधिक असावे लागते, तेंव्हाच हे शक्य आहे.
सौ. वसू ताईला हे सर्व म्हणजेच आत्मप्रेरणा, पूर्व पुण्याई, भक्ती संचय आणि दैवी निष्ठा ही सर्व एकत्रित करून जगण्याचा मार्ग शोधला त्या माझ्या ताईचा मला आदरपूर्वक, अभिमान आहे. पण ही गोष्ट केवळ आमच्या कुटुंबापूर्ती खाजगी न राहता त्याचा प्रत्यय सर्वाना यावा या साठी हा प्रपंच.
तिच्या कार्याला नमन करून तसेच भविष्यात अशीच तिची धर्मकार्य पताका आणि आध्यात्मिक कार्याचा ध्वज अव्याहत फडकत राहण्यासाठी शुभेच्छा देऊन थांबतो.
बोल भवानी की जय ।। जय जगदंब 🙏🏻🌹🙏🏻
शरद पुराणिक
220820 श्री गणेश चतुर्थी
Comments