2 years old memory ....


परवाच ऑफिसचे खेळ सत्र संपले ...प्रचंड धुमधाम .उत्साह ..जय पराजयाची उत्कंठा ...खेळाडूंची गंमत ऊर्जा हे सगळं प्रति वर्षा प्रमाणे या ही वर्षी अनुभवल...परंपरे पुणे सांघिक पातळीवर उच्च ठरले .प्रथम युनिट पातळीवर सर्व सामने झाले ज्यात टेबल टेनिस बॅडमिंटन क्रिकेट कॅरम चेस हॉलीबॉल इत्यादी खेळांचा समावेश होता... नंतर सर्व विजयी खेळाडू अंतीम सामन्यासाठी जमले ज्यात सर्वोत्कृष्ट संघ निवडले गेले...असो हे सगळं आटोपून मी पुण्याच्या संघासोबत पूणे प्रवासासाठी निघालो... काही क्षणातच सर्व वातावरण चैतन्य पूर्ण झालं... खर तर 3 दिवस खेळून आणि त्या नंतर आनंदाने नाचून प्रचंड थकलेली होती ..पण म्हणतात ना सहप्रवासाचा आंनद वेगळाच असतो याला ना कुठल्याही मर्यादा नसतात ना बंधन असत..सर्व अगदी मनमुराद आणि स्वच्छंदी असतं.. तसच काहीतरी होऊ घातलं होत.. क्षणार्धात सर्व जण आपली पद प्रतिष्ठा आणि वय विसरून एका विलक्षण आनंदात रममाण झाले ..सुरुवात कशी करावी या वर काथ्याकूट करून शेवटी दमशाराज (चुकभुल माफ) ने सुरुवात झाली... बऱ्याच वेळानंतर पुन्हा पारंपारिक अंताक्षरी सुरु झाली .मी पुन्हा काळा मागे आढलो गेलो..खर तर बराच काळ मागे पडलेल्या या प्रकाराला मैने प्यार किया या चित्रपट मुळे नवं संजीवनी मिळाली ...आणि त्या काळी दाखवलेल्या संदर्भाने हा प्रकार फारच प्रकाश झोतात आला...झालेल्या आणि न झालेल्या अनेक प्रेमप्रकरणा साठी अंताक्षरी हे एक प्रभावी माध्यम होतं तुमचं प्रेम व्यक्त करण्यासाठी... मी पून्हा महाविद्यालयीन जीवनात गेलो आणि युवक महोत्सव एकांकिका स्पर्धा या दरम्यानचा प्रवास आठवला... जेंव्हा माझ्या अनेक मित्रांनी या माध्यमातून त्यांच झालेलं न झालेलं प्रेम आकर्षण व्यक्त केलं ..अश्या सर्व स्पर्धा बाहेरगावी असायच्या आणि प्रवास ठरलेला.. मोबाईल नसलेल्या त्या युगात ती एकमेव मनोरंजक गोष्ट होती...रात्र रात्र चाललेल्या भेंड्या ...आपलं आवडीचं किंवा संदर्भिक् गीत म्हणताना चोरून शोधणारी नजर ..कुणाचं लाजून हसणं अन काही न कळलेले इशारे...अनेक जोड्या लावणारी मंडळी मुद्दाम असे प्रसंग घडवून आणायची ...अनेक मित्रांची अशी पक्की झालेली जोडी ...आणि हे संपल्यावर खाजगीत सगळी वजाबाकी दबक्या सुरात चर्चिल्या जायची... असे एक ना अनेक प्रसंग डोळयात भरले ..आणि माझ्या या प्रवासात मी तो काळ पुन्हा काल्पनीक आणी आठवत जगलो.... खर तर या प्रवासात सर्व तरुण होते ..मी आणि एक दोन याला अपवाद होता... आणि मोबाईल च्या या जमान्यात ते ही याचा आनंद लुटत होते हे पाहून बर वाटलं... अर्थात हे सर्व कार्यालयीन मित्र असल्याने ते सर्व क्षणिक आणि तात्पुरत आणि वयक्तिक संदर्भ नसणार होत पण प्रामाणिक पणे सांगतो ..गेल्या कित्येक दिवसात असा प्रवास जगलो नव्हतो...हल्ली ची पीढी आणी त्या विषयी बोललं जाणार सर्व धादांत खोटं आहे हे मी याची देही याची डोळा अनुभवलं... हे सर्व करत असताना त्यांचा उत्साह ऊर्जा आणि आनंद पाहून मी भारावून गेलो..हे सर्व स्वच्छ आणी तितकच निखळ निरागस होत। .४५० की मी प्रवास कधी संपला कळलंच नाही...जगलेले ते क्षण आत राहायला तयार नव्हते म्हणून हा प्रपंच... शपु..


26 December 2018

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती