" ॐ पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते I पूर्णस्य पूर्णमादाय , पूर्णमेवावशिष्यते II
" ॐ पूर्णमदः पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते I
पूर्णस्य पूर्णमादाय , पूर्णमेवावशिष्यते II
न भूतो न भविष्यती ।।
एकमेवाद्वितीय ।।
नाही नाही या सर्व उक्ती पलीकडे आहे, जे 5 ऑगस्ट ला घडलं.
492 वर्ष ते आज ही चाललेल्या या संघर्षाचा एक मोठा अध्याय सत्याच्या बाजूने उकलून वचनातीत झाला. फलश्रुती पुढील अध्याय आणि उर्वरित धर्मकर्म उरकून होतील यात शंका नाही. पण अगदी अनादिकालापासून जे घडले ते इथे ही घडलेच. विघ्नसंतोषी, असुरी वृत्ती, या विचार धारेने पछाडलेले, किंवा मंथरा प्रभावामुळे, राजकीय, वयक्तिक स्वार्थासाठी या योजनांना सुरुंग लावणारे अनेक शुक्राचार्य आणि त्यांचे तमाम शिष्य गण हे इतकं सहजा सहजी घडू देतील या वर शंका आहे.
डाळ निवडुन, पाण्यात स्वच्छ धुऊन, तिला पुर्ण शिजवुन सालंकृत फोडणी घालून खायला घेताना त्यात संधी मिळताच मूठभर मिठ किंवा तिखट घालून भोजनाचा आनंद हिरावून घेणारे अनंत "पाक" विद्या निपुन आहेतच.
प्रत्येक श्रेष्ठ आणि वंदनीय, पुजनीय, आदर्श व्यक्ती मग ती धार्मिक, ऐतिहासिक, किंवा अन्य कुठल्याही प्रांतातील असो, त्यांच्या अस्तित्वावरून वादंग निर्माण करायचे, खोटे दाखले देऊन त्यांच्या आस्थेवाईक समूहात संभ्रम निर्माण करायचा. या "असुरी, विद्रोही" प्रवासातून कोणी कोणी सुटलेच नाही. ते मर्यादा पुरुषोत्तम राम, छत्रपती शिवाजी महाराज, शंभुराजें ....ही यादी खूप मोठी आहे. तेंव्हा तुम्ही आम्ही तर या वादात न जाता फक्त आहे ते स्वीकारून गप्प राहायचं. पण यात ही काही छेद देऊन "अशक्य ते शक्य" करतील असे अनेक लोक आहेत. यांच्या संयम, शक्ती, संघर्ष, प्राण, धर्मप्रेमी लोकांनी आहुत्यावर आहुत्या देऊन हा "अश्वमेध" याग सतत सुरू ठेवला.
या यज्ञात ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली ते तर दिव्य होतेच, पण जे कारसेवा करून स्वयंसिद्ध योद्धे जे "हिंदू हृदय सम्राटाच्या" एका हाकेवर गेले. तर हजारो, लाखो "नमस्ते सदा वत्सले मातृभूमे' या प्रार्थनेला जागले. काही रक्तात उसळणाऱ्या धर्म भावाने गेले. आज अनेक हयात आहेत, काही नाहीत. आदरणीय पंतप्रधान मोदी जी यांनी परवा मुहुर्त साधला अन मग फेसबुक, वाहिन्या वर, वृत्तपत्रे यांत खऱ्या कारसेवकांच्या सत्यकथा समोर आल्या. तसं मी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या लढ्यात, संघर्षात होतोच. जसा प्रत्येक हिंदू आणि रामभक्त होता, तसंच काही. (माझ्या लढ्याविषयी सविस्तरपणे लिहणार आहेच पुढे कधीतरी).
प्रत्येकाची कहाणी वेगळी होती पण स्फुरण देणारी होती. कित्येक अगदी प्रतिकुल परिस्थितीत यात सहभागी होते. अनेक पक्ष, संघटना आणि छोटे मोठे समूह याचा भाग होतेच.
अनेक सत्तांतर झाली, नेते आले गेले पण हा प्रश्न तसाच धगधगत होता.
आणि परवा तो सूर्य उगवला. ज्या रामाने जन्म ते पुनर्वतार या अखंड "रामायण" मालिकेत भगवान सतत संघर्ष, अडचणी, धर्मसंकट, राष्ट्रप्रेम किंवा राष्ट्रासाठी सर्वस्व पणाला लाऊन ही जनतेचा अकारण असंतोष याचा सामना केला. समस्त परिवार ही त्यात अक्षरशः होरपळून गेला, अनेक दिव्यातून अन सर्वार्थाने "अग्नी परीक्षा" द्याव्या लागल्या. अगदी स्वतः च्या पत्नी आणि मुला बाळांना ही अंतर द्यावे लागले. पुढच्या पिढीला आपल्या पित्याला भेटण्यासाठी युद्ध सदृश परिस्थिती निर्माण करून, त्यांच्याच महाली मातेची कैफियत मांडावी लागली. सीता मातेला ही धरणीमातेकडे जावे लागले.
त्याच श्रीरामाला त्याचीच जन्मभूमी आपली आहे हे पटवून देण्यासाठी स्वतः ला न्यायालयात जावे लागले, ही केवढी शोकांतिका. एका जाणकार ब्राम्हण वकीलाने हा खटला लढला. शुचिर्भूत शुभ्र धोतरावर, भाळी टिळा लावून यज्ञोपवित धारी तो रामावतार काल संकल्प पूर्ती चे समाधान आनंदत होता. किती सुखावला तो ..जय श्रीराम...
Nostradamus या शास्त्रज्ञाने फार पूर्वी एक भाकीत केलं होतं की एक व्यक्ती हिंदुस्थानात येईल आणि हिंदु धर्माचा खऱ्या अर्थाने जीर्णोद्धार होईल. आता ती कदाचित दंतकथा ही असेल, पण मोदी जी यांच्या रूपाने एक अद्भुत शक्ती आणि अजब रसायनातुन तावून सुलाखून निघालेलं एक मजबूत नेतृत्व या देशाला मिळालं. एक संघसेवक ते पंतप्रधान हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. हे कोणीहि कितीही आगपाखड केली तरी न डावलता फक्त स्वीकारणार सत्य आणि वास्तव आहे. अडगळीत पडून वाळवी लागून अन त्यावरची अक्षर मिटून, त्या वाळवी सदृश कूर्म संक्रमनाने निर्मित व्याधीने सर्व कुजून गेलं. त्याला नवसंजीवनी दिलीत, प्रत्येक टीकेला पुरून उरलात, आजही ती होत आहेच. त्याला संपूर्णत: दुर्लक्ष करून ज्या वेगाने तुम्ही निर्णय घेऊन सत्यात उतरवत आहात ते केवळ आणि केवळ आपल्या अगाध अनुभव, संस्कार आणि गाढा अभ्यास याचे द्योतक आहेत. परवाच्या भाषणात तुम्ही ते परत पटवून दिले आहेच. संकल्प ते मंत्रपुष्पांजली हे मंत्र आणि इतर अनेक धर्म ग्रंथातील श्लोक मुखोद्गत म्हणणं , हे एका पंतप्रधान व्यक्ती कडून ऐकताना छाती अभिमानाने फुलते. तुम्हाला तुम्ही रामलला घातला तसा साष्टांग दंडवत.
या आणि यांच्या सारख्या, इतर सर्व प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या रामसेवका दारी शब्दांची विजय पताका लावून, आणि भावनांच ध्वजारोहण करून...थांबतो... जय श्रीराम
शरद पुराणिक
060820
Comments