काल एका ओळखीच्या कुटुंबाच्या घराचा वाढदिवस होता ...त्यांनी ओघात छोटंसं घर असा उल्लेख केला ..आणि त्या नंतर मी ही कविता त्यांना पाठवली ...
सर ..
घर हे घर असतं
लहान मोठं असं काही नसतं
भले मोठे राजवाडे ही आहेत
पण प्रेम, माया, हरवल्या आहेत
भला मोठा दिवाणखाना
पण मालकाला झोप येईना
तसाच आहे भटारखाना
पण अन्नच गोड लागेना
काय करायचं अशा घराचं
तेंव्हा तुम्ही कष्टाने बांधलेलं
हे घर ..
तोच आपला महाल अन राजवाडा
त्या वास्तूचे वाढदिवस अभिष्टचिंतन
शरद पुराणिक
110521
Comments