हा दसरा आणि हे वर्ष कायम स्मरणात राहील,

आणि दरम्यान झालेले सण, वार, कार्य अन छोटेखानी किंवा ऑनलाइन सोहळे .... आपल्यातल आपल्यालाच दिलं , काही सुख, दुःख ओरबाडून नेलं , किंबहुना दुःख ही कोरड पडलं,

 या  शल्याची ही  आठवण आणि त्यात साठवून ठेवलेली ही विजयादशमी,


स्वावलंबी, प्राप्त परिस्थितीत जगणं शिकवणारी

जगण्याचे छोटे छोटे क्षण वेचणारी

अन वेचलेल्या क्षणातच

आनंद शोधून दाखवणारी


भौतिक सुखाच्या पलीकडे ही

जगणं आहे ही शिकवणारी

धन दौलत ऐशो आराम सब हराम

याची प्रचिती वेळोवेळी देणारी


झोपलेल्याना जागं करणारी

जगण्याची न जीवाची किंमत करणारी

आत आत दडून बसवणारी

एकटेपणात खूप शिकवणारी



राम अन रावण उकलून सांगणारी

वर्दीतले राम अन गर्दीतले रावण हेरणारी

मी माझ्याशीच अन तू तुझ्याशिच

लढ, जिंक नाहीतर मर सांगणारी


आयुष्याच्या या काटेरी वळणावर

त्याला कलाई करून चकाकणारी


ही विजयादशमी  आयुष्याचा खरा अर्थ समजावून सांगणारी .....


ही विजयादशमी पुन्हा नको रे बा

सुखी राहा, सुरक्षित राहा


गळाभेट अन चरणस्पर्श नाहीत

हे शब्दच आपट्याची पानं 

जिथे असाल तिथे 

मी आहे इथे सुखी, सुरक्षित



आईच भेटली नाही लेकरांना

कसला हो तो दिवाळी दसरा


तरी ही 

शुभेच्छा 🙏🏻🙏🏻💐🙏🏻🙏🏻



शरद पुराणिक आणि परिवार

Comments

Popular posts from this blog

How do I say a Good Bye once for all Harish Sir !!

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी