एक होतं आटपाट राज्य
एक होतं आटपाट राज्य
ज्याला आहे शौर्याचा इतिहास
संतांचा आशीर्वाद अध्यात्मिक वारसा
निसर्गाची साथ, सांस्कृतिक वारसा
काय घडलं अचानक माहीत नाही
सत्तापिसाट खूर्चीसम्राट अवतरले
साध्या सरळ राजकीय पटलावर
द्वेष क्लेश संघर्षाची घाण पडली
रातोरात बदलले आदर्श अन श्रद्धा
आज इकडे उद्या तीथे, परवा कुठे
म्हणतात ना जिभेला रक्त लागलं
यांच्या बुडाला खुर्चीची गर्मी लागली
कोणीच कोणाचा वाली नाही
जनतेचे कैवारी वगैरे अंधश्रद्धा
इथे फ़क्त माझी खुर्ची अन सत्ता
सोयीनुसार त्याला विविध रंग
एरवी फक्त खायच्या कोंबड्या
विविध रुपात अवतरल्या
यांनी त्यांना दाना घातला
सत्ता अमिषाला ते पडले बळी
ज्यांनी घातला दाना ते सरडे
विविध रंग घेत फिरत आहेत
कोंबड्यांच्या झुंजी मजेत पाहत
याचं कोणाला भान ही नाही
कठपुतळीचा हा अघोरी खेळ
मोफत पाहायला काढा वेळ ..
अहो बिहार, आंध्र इकडे तिकडे नाही
याच आमच्या आटपाट राज्यात ...
जमुरे चल घुमा टोपी और दिखा खेल
लोग चुपचाप देखेंगे..तू बस दिखा !!
शरद पुराणिक
250821
Comments