असे ही काही राजयोग...नाही नाही राजकीय योगायोग
असे ही काही राजयोग
नाही नाही राजकीय योगायोग
ज्येष्ठ श्रेष्ठ जन्मले एकाच नक्षत्री
कनिष्ठ ही अवतरले एकाच दिवशी
शरदाचे चांदणे "शरद चंद्र जी"
तर नाथांचे नाथ "गोपीनाथ जी"
ऐन हिवाळ्यात शेवटच्या महीन्यात
12/12 हाच तो दिवस आहे
पुढची पिढी ही तशीच आली
दोन दिगग्ज एकत्र अवतरली
चंद्राला आणि नाथाला पाहत
राजकारण शिकली अन जगली
सतत अजिंक्य, यशस्वी "अजित"
राज्याचं कणखर नेतृत्व "देवेंद्र"
ऐन पावसाळ्यात पवित्र महिन्यात
झेप घेतली या राजकीय युगात
विचारधारा असेल ही निराळी
वचनबद्ध विचारांची मांदीआळी
संस्कार आशिर्वाद दिग्गजांचे
स्वनिर्मित चेहेरा आहे पक्षाचा
कुठल्याही छत्री , काठी शिवाय
विजयस्तंभ रोवले स्वबळावर
तशाच विजयी पताका अन ध्वज
घेऊन चालत राहा अखंड
कुठलीही पहाट नको विघ्न
करणारी राजकीय स्वप्नं भंग
"नांदा सौख्य भरे"
जन्मदिन शुभकांक्षा
....शरद पुराणिक....
... 22072021...
Comments