आज जागतिक संगीत दिवस
आज जागतिक संगीत दिवस ....एक जुना छोटा लेख या विषयी हाती लागला, तेच औचित्य साधुन पुन्हा पाठवत आहे ...
{{{{{}}}}}}
आज माझ्या भावाने वसंतराव देशपांडे यांच्या संगीत मैफिलीचा विडिओ पाठवला आणि मी तो पाहिल्या बरोबर क्षणार्धात माझ्या किशोरवयीन जीवनात आणि काही बालपणी अनुभवलेल्या मेहफिलींची प्रकर्षाने आठवण झाली... मी साधारण 11 वी ला असेन त्या काळी आमच्या गल्लीत एक डोळे कुटूंब राहायचं ..अतिशय साधारण परिस्थिती असलेल्या त्या कुटुंबातील दोन व्यक्ती अनिल आणि अरूण याना तबला वाजवण्याची प्रचंड आवड होती..दिसेल त्या गोष्टी वर ते ठेका धरत मग ते अगदी भांडी बादली ताट वाटी काहीही...अगदीच काही नसेल तर स्वतः च्या छातीवर ठेका घ्यायचे... अनेकदा टीका व्हायची पण वेडच ते जातंय कुठलं..आज ते यशस्वी आणि मोठे कलावंत आहेत... सोबतच मुळे परीवार होता जीथे अनंत पेटी म्हणजे हार्मोनियम वाजवायचा.. माझा मित्र अरविंद गायचा तबला न पेटी ही वाजवायचा.... अशातच सुलाखे कुटूंब आमच्या ईथे राहायला आलें आणि तिकडे ही दोन कलावंत होते बंडू आणि रमेश... दर गुरुवारी पंचपदी असायची आणि ही सगळी मंडळी एकत्र येऊन भाव भक्ती संगीताची मेहफिल सजायची... लोग आते गये और कारवा बनता गया ..या उक्ती प्रमाणे ते सगळे आपोआप मोठ होत गेलं... शहरातील प्रस्थापित कलावंत ही याचा भाग झाले आणि मेहफिली सजू लागल्या ...पोहणेरकर शिंगवी बुंदेले जोशी अशी त्या काळातील संगीत क्षेत्रातील अग्रगण्य मंडळी एकत्र येऊन दर गुरुवारी क्रमवारीने सगळ्यांच्या घरी भजन भावगीते भक्तिगीते यांची जणू मेजवानीच होऊ लागली.
तस मला संगीत विषयाचं काहीही ज्ञान नव्हतं पण गोडी निर्माण झाली आणि फ़क्त श्रोता म्हणून आवर्जून जायचो ...पंचपदी गुरुपूजन होऊन मग विवीध राग आळवले जायचे ..ठुमरी दादरा ऐकावा वाटायचा.. त्यातल्या त्यात गवळण हा माझा आवडीचा प्रकार होता...कारण त्या गाताना होणारे हावभाव नजाकती आणि शब्द रचना सोबतच उडत्या संगीताने ते अधिक आकर्षक वाटायचं...
अशातच काही फक्त चहा पानावर ताव मारण्यासाठी आलेले कप बश्यांची कुर कुर ऐकू येते का हे चाचपडून घ्यायचे .. उगाचच मध्येच मोठी दाद द्यायचे ...क्या बात है ...लाजवाब..वा व्वा .. मराठी संगीतात दाद हिंदी मध्ये का देतात ते कोड मला अजून उमगलं नाही... एकदाचा चहा यायचा आणि अधाशासरखे वाट पाहणारे श्रोते टीकाकार प्रेक्षक सुखावून जायचे... पाणपूडा ही हे सगळं होण्याची जणु वाट पाहत असायचा आणि मग खूल जा सीम सीम ..पान तंबाखू लवंग विलायची सुपारी कात चुना हे राग आळवत मध्यंतर होऊन कार्यक्रम उत्तरार्धकडे मार्गस्थ व्हायचा... नव्या दमाने मैफल रंग भरायची... हळू हळू कार्यक्रम भैरवी कडे वळायचा... त्या काळी घेई छंद मकरंद हे ऐकण्यासाठी उत्कंठा कायम असायची ...कीशीरसिंग बुंदेले ती फार वेगवेगळ्या तर्हेने गायचे... पोहणेरकर काकांच्या ही वेग वेगवेगळ्या शैलीतील गायकी अनुभवायची... जोशीं चा तबला अप्रतिम मध्येच एखादा सोलो परफॉर्मन्स... गवळणी साठी प्रख्यात लोळगे सर म्हणजे पर्वणी असायची ....अस होत होत कार्यक्रम शेवटच्या टप्य्या वर पोचायचा... तबला दगगा त्यांच्या चुंबळी ..टाळ ..पेटी.. मृडुंग आपापल्या पिशवीत शिरायचे ...अशी ही भैरवी ...काही नामोल्लेख आहेत ते वाचून आपोआप येतील।।।।
शरद पुराणिक ....
संदर्भ - जटा शंकर गल्ली बीड
Comments