अव्याहत ती अग्निसेवा
त्यात गुंतला गुरू माझा
द्विसंवत्सर स्तब्ध तो अग्नी
फुलू लागला दिन प्रतिदिन
खडकी संभाजीनगर सोलापूर
दिव्य जाहले अग्नी दर्शन
प्रवर्ग्य आहुती गेली दूर दूर
आता प्रज्वलित हो बेंगळुरू
अतिउत्साह सतत अहोरात्र
माऊली ती न थके दिन रात्र
आज इथे तर उद्या तिथे
राज्य राज्य तो दौरा निघे
हे अग्निनारायणा तुलाच साकडे
तूच लक्ष दे माझ्या गुरुकडे
तुझा आशीर्वाद अन पाठराखण
यज्ञ घडत राहो चहूकडे
आदरणीय वंदनीय पूजनीय प्रात: स्मरनिय बहू सोमयाजी यज्ञ मार्तंड
गुरू माऊलीस साष्टांग दंडवत
यज्ञ नारायण भगवान की जय !!
🙏🙏
शरद पुराणिक
180422
Comments