"" शंभूराजे या "
"" शंभूराजे या "
औरंग्याचा उदो उदो ऐकू येत आहे
तो जय भवानी जय शिवाजी गर्जनेत
बुडवण्यासाठी तुम्ही हवे आहात
आज आपसातच घरात घुसून मारणारे
घरभेदी रोज प्रसवत आहेत इथे तिथे
हा भेदाचा रंग कायम पुसण्यासाठी
सिंहासनाच्या लालसेपोटी हापापलेले
यत्र तत्र सर्वत्र गरळ ओकत निघालेले
या शकुनी मंथरा ना थोपवण्यासाठी
शत्रूच्या गोटात घुसून थेट लढण्यासाठी
गोंधळलेल्या मावळ्यांना दिशा देण्यासाठी
सर्व झेंडे जाळुन स्वराज्य सुराज्यासाठी
नशेत बुडालेल्या युवकांना सुधारण्यासाठी
सीमा छेडणाऱ्या चिनी पाकी कुत्र्यांसाठी
असंख्य समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी
या शंभूराजे पुन्हा एकदा या आमच्यासाठी
तुमच्या बुरख्यात वावरणाऱ्या खोटारड्या
राजांचे तेच चेहेरे ओरबाडून काढण्यासाठी
या हो राजे
शरद पुराणिक
140522
Comments