तुझ्या सभा, माझ्या सभा
पुन्हा एकदा श्री भा रा तांबे यांची माफी मागून ....
तुझ्या सभा, माझ्या सभा
भुलवू जनमाणसाचा मेळा
हो हो जनतेला आणखी कोणाला
चल रे दादा, काका, भावा चहाटळा !!धृ!!
तुज पगडी, मज टोपी लाल गमजा
शालीत जोडे कोण कोणाला
खुर्चीचे वेड लागले मोठ्या दादाला
आणि बिघाडीत इतर साऱ्यांना !!१!!
तू मंत्री, मी संत्री
आणखी खुर्च्या कोणा कोणाला
काका, अक्का, ताई अन नानाला
सांग रोम देशाच्या नव मातेला !!२!!
खळ खट्याक, खंजीर, टोले
नित्य अपुले खेळ खेळु
चल निघ तू घरातून नको बसू
जनतेस फसवू अन हसू हसू !!३!!
तू नक्कल, मी नक्कल करू
हसवत वेळ दौडू कसा बसा
मग गट्टी फु कोणा कोणाशी
सवडीने गट्टी वैऱ्याशी !!४!!
तुझ्या सभा ...माझ्या सभा ...☺️☺️
शरद पुराणिक
02062022
Comments