सत्ता पिपासु खुर्ची पिसाट हे अन ते ही
छत्रपती अन सिंहासना ची तमा नाही
चोर लुटेरे बलात्कारी भ्रष्ट राज्य द्वेष्टे
तुमचे खरे लालसी चेहेरे आज दिसले
ज्याच्या नावावर सर्व गिळंकृत केलंत
त्यांच्या पुतळ्यावर हार, भाषणं फ़क्त
त्यांचे स्वराज्य वचन मात्र गाडून टाकलत
मोह माया मत्सर घरभराई च्या खड्ड्यात
अनाजी चा निषेध आहेच पण तुम्ही कोण?
जातीची गरळ ओकत तोंड पुशे आश्वासन
भेद घरफोड्या लावा लावी हीच कौशल्ये
गनिमी कावा मात्र वापरला स्वार्थासाठी सतत
महाराज काय होतंय हो हे या स्वराज्यात
जशी माझी छाती तुमच्या जयघोषाने स्फुरते
त्याच निनादात, रक्त सळसळते आवेशाने
मग या साऱ्यांना हा कुठला आजार झालाय ?
हजारो लढाया केल्या व्याप्त स्वराज्यासाठी
हे मात्र तडफडतायत काही तुकड्यांसाठी
तुम्ही बलीदान दिले, हे मात्र बळी घेत आहेत
असुरी लढाईत राज्यालाच पोखरत आहात...
महाराज
तुमच्याच राज्यात तुमच्या संस्कारांचा
रोज निर्घृण खूण होत आहे क्षणोक्षणी !!
पुतळ्यातून, तसविरीतून बाहेर या हो आता
उडवा यांची बोटं अन कोथळे बाहेर काढा..
शरद पुराणिक
270522
Comments