चला काकु चला अयोध्येला चला
चला काकु चला अयोध्येला चला
कशाला आवतन धाडलंस रे रामा
रामनवमी ला कोणी नमस्कार न केला
सोम्या गोम्या चिल्ले पिल्ले सारेच न बाबा
निघाले आहेत आता तुझ्या दर्शनाला
यांची चालीसा एवढी पावली तुला
आम्ही नित्य शुचिर्भूत वाचुन न पावली
रामरक्षा मारुती स्तोत्र ही रोज म्हणली
तुझ्या भेटीला साहेबानं रजा नाकारली
आता तुला ही हेच आवडू लागले काय
पिढ्यानपिढ्या भक्ती आमची गेली वाया
यांना क्षणार्धात कसं हो म्हणालास रे रामा
तुझं अस्तित्व नाकारतात काका न मामा
जन्मभूमी तुझी खुली केली ज्यांनी
त्याच डोळ्यांनी हे पाहावं त्या साऱ्यानी
त्या जखमा अजून गोंजारून ठेवल्यात
रक्ताचे डाग विरले असतील त्या मातीत
या निमित्ताने एक मात्र उत्तम झालंय
तुझ्या नामाची सहस्त्र, लक्ष आवर्तन झाली
माझ्या सारख्याला ही पर्वणीच झाली
तुझ्या अस्तित्वाची जाणीव पुनरुज्जीवित झाली
काही दिवस तुझ्या भूमीत होऊ दे आता
राडा, टोले, टोमणे, पलटवार, कोथळे....
परत आहेतच आमचे महापुरुष मोकळे
छत्रपती, टिळक, आगरकर, फुले, आंबेडकर ...
!! जय श्रीराम जय भवानी जय शिवाजी !!
शरद पुराणिक
100522
Comments