@@ महाकवी @@
आज (आषाढ शुद्ध प्रतिपदा) महाकवी कालिदास दिन
त्यांच्या सारखं काव्य आम्ही या जन्मात आणि पुढील अनंत जन्मात लिहु तर शकणार नाहीच, पण पूर्ण वाचू ही शकू की नाही.. हे वास्तव स्वीकारून त्या महाकविला निदान चार शब्द फुलांसारखे त्यांच्या प्रतिभेवर वाहतो ...आज हीच पुजा ..
@@ महाकवी @@
तुम्हीच लिहिलेत अनंत महाकाव्य
रामचंद्र आणि त्यांचा आदर्श वर्णविला
रघुवंश आणि मेघदूत या महान खंडात
शिव महिमा आणि स्तुती ही रचलीत
सबंध निसर्ग आणि सृष्टीचा महिमा
ऋतुचक्र आणि निसर्गाच्या प्रेमाचे काव्य
शिव पार्वती चं प्रेम ही दाखवल तुम्हीच
शृंगारिक प्रेम, भक्ती असे रस दर्शन दिलेत
तरुणाईला मोहित करणाऱ्या कविता
मेघ, मेघ गर्जना हे प्रेम दूत तुम्हीच दिलेत
असंख्य कवी, लेखक आणि साहित्यिकांना
किती किती म्हणून हे देणं तुमचं अनमोल
त्या भिक्षावळीने आम्ही सर्व तृप्त आहोत
अन ती ही जन्मोजन्मी पुरून उरेल इतकी
एक मात्र करा अर्पण करण्याची वृत्ती
त्याग, उपासना आणि धर्म शिष्टाचार ही द्या ..
!!अस्ति कश्चित् वाग्विशेषः !! ???
आज ही पुजा स्वीकारा
शरद पुराणिक
आषाढ शुद्ध प्रतिपदा
10072021
Comments