नाव गाव कोणाचे घेऊ मी
आभार कोणा कोणाचे मानू
प्रेम जिव्हाळा आशीर्वाद माया
ज्येष्ठ, कनिष्ठ सर्वच करतात सदैव
भगिनी भाच्या सुना भावजया
पुतण्या काकू मावशी आत्या
काका भाऊजी बंधु जावई मेहुणे
मामा भाऊ भाचे साडू सोयरे
मित्र मैत्रिणी घट्ट आप्त इष्ट
साहेब, सहकारी, सहायक मालक
शेजारी या गावचे त्या गावचे सारे
ओळखीचे अन अनोळखिही
मी समान वाटला गेलोय सर्वात
भेद कोनात कधी मी न करणार
शुभेच्छाच शाश्वत बाकी सर्व गौण
त्याच उराशी घट्ट ठेवतो बांधुन
पळभर जगण्यात उगाच कशाला
तू मी तुझं माझं गर्व अभिमान
केंव्हाच मागे सोडलंय सारं सारं
अखंड मागतो भिक्षा फक्त प्रेमाची
निखळ खरं प्रेम आशीर्वाद माया
टाकलित झोळीत धन्य जाहलो
वाढदिवस सोहळे येतील जातील
तुम्ही मी इथेच सूर्य चंद्रा सोबत
येणाऱ्या प्रत्येक सुंदर सकाळी
भेटत राहूच जसं जमेल तसं
भोगू उत्तम आरोग्य संपन्न आनंद
तुम्ही तुमच्या मी माझ्या गावा ...
माझ्या जन्मदिनी शुभेच्छा साठी
आपणा सर्वांचा शतश: ऋणी
शरद वसंतराव पुराणिक
300621
मानपरत्वे पायावर डोकं ठेऊन
नमस्कार, धन्यवाद, पाठीवर थाप
गालगुच्चा, टाळी, टाटा हवं ते सर्व
Comments