बंध मैत्रीचे

 बंध मैत्रीचे 


पाळण्यात पाय हलवत हलवत

जीवन होतं सुरु नंतर रांगत


झोका हलका होतो अन 

जाणीव होते नात्याची 

डोळा लागताच ती निसटते

कामाचा ढीग पडलेला असतो

पण याची मैत्रीण दिसली नाही

की हा भोंगा पसरतो 

ती अलगद येऊन पुन्हा झोका देते

तसा तो किंवा ती रमते त्यात

पहिली मैत्री


अडखळणारे पाय सुसाट होतात

अन घराचा कोपरा व्यस्त होतो

आता इतर सदस्य ही त्याचे मित्र

चेहेरे न आवाज ओळखीचे 

हीच त्या मैत्रीची ओळख

दुसरी मैत्री


नवा कोरा गणवेश घातलेला

आई बाबांच्या मधोमध तो

एका दुसऱ्या विश्वात निघतो

तिथे याच्या सारखे शेकडो 

स्वतःच हरवतो अन पकडतो

आईचा पदर न बाबांचे बोट

इतके घट्ट की सुटत नाही


त्याच गर्दीत एखादा चेहेरा

आपलासा वाटून जातो

हा त्याच चेहेऱ्याच्या बाजुला

असतो रोज रोज त्या जगात

तिसरी मैत्री वेलासारखी वाढते


बोबड्या बोलानी गुंजारते विश्व

त्या चेहऱ्याची ओढ लागते

ती ओढ वाढत जाते वयानुसार

अन खऱ्या मैत्रीचा बोध होतो


हळूहळू आईला सांगायच्या गोष्टी

आता हा कृष्ण सुदम्याला किंवा

सुदामा कृष्णाला किंवा कोणाला

सांगत राहतो अंतर्मनात ल्या गोष्टी


अचानक कोणी तरी ती किंवा तो

या मध्ये नेमके येतात अन ....

नाते एका वेगळ्या वळणावर जाते

बेसावध असतो हा अन ...

इकडची ओढ कमी होऊन 

तिकडे आकर्षित होत जातो


सुरुवातीला काही सांगत नाही

पण तिकडची व्यथा, आनंद

सांगायला, ऐकायला परत इकडे

चौथी मैत्री 


आता अचानक आलेला तो / ती

आणि इकडचे मित्र असा एक बंध

सर्वच होतात एक संघ

दोनाचे चार, चाराचे आठ होतात


नात्यांचा परीघ वाढत जातो

तो त्याच्या परिघात न हा याच्या

इथे ही पाळणे हलतात 

अन याला आपलंच रूप 

त्यात दिसतो तिथे रमतो

पाचवी मैत्री


याचा चलचित्रपट पून्हा सुरू

या चक्रात थोडासा अडकून

पुन्हा निसटतो अन शाळेतल्या

त्या चेहऱ्याकडे पुन्हा ओढ घेतो


मैत्रीच्या या चक्रात अनेक येतात

येउन राहतात, जातात, येतात


 एक धागा कायम सोबत राहतो

 प्रथम क्षणी आपला झालेला

क्षणोक्षणी साथ देणारा

शाळेतल्या दप्तरापासून ते

Ambulance मध्ये आपलं 

शरीराचं, जगण्याचं ओझं घेऊन

सावलीसारखा अन खंबीर आधार

पैसा, स्वार्थ याची होळी करून

निःस्वार्थी हळवा, निःशब्द खांदा

आसवांची एक हक्काची जागा

ती मैत्री, मैत्री आणि मैत्री

बाकी सर्व नश्वर आहे


💐मैत्री दिनाच्या शुभेच्छा 💐


शरद पुराणिक

2 ऑगस्ट 2020

(पुनःप्रसारण)

Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....