खाऊगिरी - पदार्थ करण्याची आवड ते यशस्वी व्यवसाय





 खाऊगिरी  - पदार्थ करण्याची आवड ते  यशस्वी व्यवसाय

आस्वाद क्लाऊड किचन 


ये मानसी काय चाललंय ...काही नाही अगं आज जरा जास्तच ऑर्डर आहेत. सकाळच्या ऑर्डर ची डिलीव्हरी झालीये आणि आता संध्याकाळ ची तयारी. एरवी निवांत फोन वर गप्पा, टप्पा मारणारी मानसी हल्ली इतकी व्यस्त झालीये. याचा एक मैत्रीण म्हणुन आनंद वाटावं की दुःख ..असो पण त्यांनी नुकताच सुरू केलेला हा खाद्य व्यवसाय छान आकार घेत हळूहळू भरारी घेत आहे याचा मनस्वी आनंद आहेच - असं आमची बायको म्हणते.


मानसी आणि मनोज या दोघांविषयी मी या पुर्वीही लिहिलं आहे, त्याच ग्रंथाचा हा दुसरा अध्याय आहे. पण इथे अजून एक उल्लेख आहे तो  राहूल आणि अर्चना जोगळेकर. जसे आमची मुलं आणि मनोज/मानसी च्या मुली सोबत शाळेत होते, तसेच राहुल/अर्चना यांची ही मुलगी हर्षल च्या वर्गात होती आणि हे ही आमच्या या  मैत्रीच्या धाग्यात आहेतच. 


अर्चना आणि मानसी तश्या पदार्थ बनवण्यात तरबेज ..

खूप दिवस  त्यांच्या मनात काहीतरी घोळत होतं.... की काहीतरी करायला हवं, पण नक्की काय हे कळत नव्हतं. तस अर्चना कधीतरी डबे...फराळाचे काही पदार्थ याचा व्यवसाय करत असे आणि मानसी ऑनलाईन कपड्यांचा छोटासा व्यवसाय. पण काहीतरी मोठा विचार करायला पाहिजे आणि त्यांच्या  मावस  दिरा ने  ( राजेश कुंटे ) यांनी तुम्ही  दोघी मिळून आउटलेट चालू करा असं सुचवल. आता या वर बैठकी,चर्चा झाल्या हो नाही करत गाडी ने वेग घेतला आणि धावपळ सुरू झाली. तशी धावपळ, पळापळ ते ही अगदी चुटकीसरशी करणे यात मानसीचा हातखंडा आहे. दोघीहि सुसाट निघाल्य, माहिती गोळा केली, दुकाना चे भाडं किती? काय काय समान लागेल?मदतीला माणसं किती लागतील ? परवाने किती आणी कुठले ? खूप गोष्टी होत्या.


दरम्यान च्या काळात "cloud kitchen" ही संकल्पना आकार घेत होती आणि तीच संकल्पना  डोक्यात ठेऊन त्यांचा  निर्णय थोडा बदलला आणि क्लाऊड किचन करू असं ठरवलं. पण इथेही अनेक प्रश्न होतेच मग त्या साठी जागा, 2 खोल्या  की 1bhk, जिकडे ओटा आणि 24 तास पाणी असेल, स्वच्छ जागा. एक दोन ठिकाणं  थोडीफार अंतिम टप्प्यात ठरवुन पण झाली. जशा सर्वच व्यवसायाला "कोरोना" चं ग्रहण होतें तसेच इथेही ...पहिल्या लॉकडॉवून चे चटके शमले होते, तोच दुसऱ्या च्या चर्चा सुरू झाल्या. 

अन गाडी परत दुसऱ्या वळणावर घ्यावी लागली कारण

भाड्या नि घेतलं की त्याच भाडं भरावच लागलं असतं.... या किचन ला किती रिस्पॉन्स मिळेल? असे असंख्य भेडसावणारे प्रश्न .. राहुल नी सारासार विचार करून मग सुचविले की सध्या घरातून सुरू करा. शुभस्य शीघ्रम, पुढचं पुढे बघू !!  ,एकदाचं घरीच या वर शिक्का मोर्तब झाला.

नामकरण  वर काथ्याकूट होऊन अनेक नावं सुचली. अन  "आस्वाद क्लाऊड किचन"  हे ठरलं एकदाचं. या दरम्यान घरातील प्रत्येक सदस्य या प्रक्रियेचा भाग झाले अन भाया सरसावून सुरू झाले. अजूनही अनेक गोष्टी होत्याच


मेनू कार्ड, लोगो , खर्च, मार्केटिंग, खाद्य परवाने, बिलिंग, पुरवठा, व्यवस्थापन , यात राहुल ..मनोज.अस्मिता ..अनुष्का..सानिका ..नील.... यांचं मोलाचं योगदान आहे. एक एक करत सर्वच ठरलं..आणि 15 फेब्रुवारी 2021 ला  म्हणजे valentine day च्या दुसऱ्या दिवशी ...

आस्वाद क्लाऊड किचन ची पहिलीच आणि मोठी ऑर्डर त्यांनी दिली...(सोबत फोटो जोडलेले आहेत).


मुळात दोघीही सुगरण, त्यांच्या हातचे पदार्थ आवडणार होतेच यात शंका नाही. मुळात हेतु स्वच्छ होता आणि अतिशय प्रामाणिकपणे केलेल्या सर्व गोष्टी. मुळातच स्वतः संपूर्ण  जोगळेकर कुटुंब एक सधन, सुसंस्कृत कौटुंबिक वारसा असलेलं. पण आवड ही व्यवसायात गुंतवून माझ्या सारख्या खादाड लोकांना चविष्ट पदार्थ देऊन त्यांना त्या चवीचा आनंद देणे एवढाच त्यांचा हेतु. त्याचं प्रतिबिंब त्या चवीत आलीच आहेच आणि सर्वांना सर्वच पदार्थ आवडू लागले.  उगाच भरमसाठ पदार्थ न देता अगदी मोजकेच पदार्थ ते ही न्याहारी चे ...मानसीच्या भाषेत सांगायचं तर "डाव्या हातचे पदार्थ" (सोबत मेनु कार्ड आहे). 


एक दोन करत अनेक लहान मोठया ऑर्डर सुरू झाल्या. राहुल चा सातत्याने पाठिंबा, मनोज चा मजबुत आधार म्हणजे No Discussion Only Action हा त्याचा स्थायी भाव ! राहूल सतत ह्या मागावर असतो ...की हे आपण आजून मोठं कसं करू शकतो आणि त्या दिशेने त्याचं मार्गक्रमण सुरूच आहे. 


खरं तर घरगुती व्यवसाय म्हणजे अनंत समस्या असतात.  घरातल्या प्रत्येकाचीच त्यांना खूप मदत होत आहे आणि राहणार आहेच. वेळ प्रसंगी पदार्थ करायला, कधी त्याची डिलिव्हरी द्यायला, कधी प्रत्यक्ष कधी अप्रत्यक्ष.  मनोज आणि राहुल हे दोन भाऊ अगदी मित्रासारखे राहतात, तसेच त्यांची  मुलंही. व्यवसाय सुरू असतो पण  घरातले सणवार येतात तर कधी इतर घरगुती समारंभ असतात तेव्हा घरात थोडं दुर्लक्ष होतं....पण घरातल्या सगळ्यांनी आम्हाला  ( मला आणि अर्चना ) सांगितलं आहे....की तुम्ही आत्ता फक्त  आस्वाद क्लाऊड किचन कडे लक्ष द्या....बाकी गोष्टी कमी जास्त झाल्या तरी चालतील....असं मानसी आवर्जुन सांगते.  आणि म्हणूनच त्या हे बिनधास्त पणे करू शकत आहेत आणि ही गगनभरारी घेतली आहे. दोघीही हे सतत सांगतात की : 

घरचा सपोर्ट खूप महत्त्वाचा असतो ...

अजुन खूप गोष्टी आहेत आमच्या डोक्यात प्रत्येक्षात उतरायला वेळ लागेल....

पण प्रयत्न चालू ठेवणार आहोत.

 

!! या त्यांच्या ध्येयपूर्तीसाठी त्यांना शुभेच्छा !! 

ही खाद्य जत्रा अशीच  सुरू राहो,  भरभराटीला जावो, अन माझ्या सारख्या असंख्य खादाड लोकांना चविष्ट पदार्थांची अनुभूती देत राहो. 


एक विशेष उल्लेख मी मुंबईला पहिल्यांदा "पियुष" हे पेय अनुभवल आणि ते यांच्या यादीत आहे. बाकी सर्वच पदार्थ रुचकर, चवदार आहेतच.


अशा या दोन दुर्गा  आणि शक्ती रुपाला नवरात्रीची ही शब्दांची माळा. त्यांच्या धैर्याला, कष्टाला, जिद्दीला सलाम. 


अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक पहावी 


https://www.facebook.com/aaswaadcloudkitchen/


शरद पुराणिक

111021

Comments

Popular posts from this blog

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....