ऐका हो ऐका
आटपाटनगराच्या "पिग टॉस" खेळामध्ये
संस्कृतीचा, सभ्यतेचा ऱ्हास आहे
तू केलं ? मी करतो या जीवघेण्या स्पर्धेत
सर्वच विपरीत अन विपर्यास आहे
संत तुकोबा अन इतर सर्वच संत श्रेष्ठ
या पवित्र भूमीत ही कुठली आरास आहे
होय आम्हाला कळतंय हे सर्व केवळ खेळ
पण मग संस्करांचा निर्दयी खून होत आहे
समाजप्रबोधन करणाऱ्यांनी फेटे सोडले
अन पवित्र कीर्तनाच्या नावाला तडे गेले
ज्यांनी घडवलं समाजाला ही चूक होती
त्यांची पिलावळ अशी असेल, कल्पना नव्हती
अपयशी की यशस्वी माहीत नाही यांचं
पण प्रसिद्धीसाठी केलेला अट्टहास आहे
आमची नळावरची भांडण बरीच होती
निदान ती खरी होती... त्यासाठी एवढं ??
ओढून ताणून माथी मारलेला हा घाट
कस म्हणू माझ्या राज्याची मान ताठ ?
सुबुद्धीच्या देवाने यांना बुद्धी द्यावी
असली नसली इज्जत अब्रु वाचवावी ..
व्हय महाराजा
शरद पुराणिक
230921
Comments