ठिणगी
ठिणगी
कुणीतरी टाकावी ठिणगी
तापलेल्या कुंपणावर
कुणीतरी टाकावं आगीत तेल
आगच ती वाऱ्यासरशी पेटायची
आग वाढायची तेंव्हा आम्हीच
पाहायचो तिला सहज म्हणुन
आग जेंव्हा बोकाळायची
तेंव्हा आम्ही घरात लापायचो
सोसत आम्हीच लावलेल्या आगीच्या झळी अन चटके
अन जेंव्हा आग थंड व्हायची
तेंव्हा आम्हीच काढले कॅमेरे
टाकले फोटो आणि बातम्या
याच अपराधी कलेतून साकारायची
झालेली हानी, लूटमार, हिंसाचार
लोकांच्या चर्चे साठी एक विषय
एवढाच हेतु
शरद पुराणिक
(पुनःश्च एक जुनी डायरीतील पान)
Comments