!! अरे मला ही द्या रे ते रसायन !!
!! अरे मला ही द्या रे ते रसायन !!
कुठे हो मिळतं हे जालीम औषध
जरा सांगा ना हो मला
महिनो न महिने पेटलेला वनवा
क्षणार्धात शमतो कसा
खून दरोडे दंगली आंदोलन
आत्महत्या पळवापळवी जाळपोळ
वस्त्या विद्यापीठ गल्ली दिल्ली
सर्वच होरपळत असतं अनंत काळ
हजारो बैठकीत के निष्फळ चर्चा
सुटता सुटत नाही तो पीळ
करोडो अब्जो घेऊन पळालेले, लपललेले
कुठे कसे जगत असतील हो बिनधास्त
मला ही पाहिजे हे रसायन लगेच
शमवण्यासाठी आतल्याआत ली वादळं
मला ही विसरायचं आहे हो
अफजल, कसाब, रोहिंगे असे अनेक
माझं ही मत परिवर्तन होऊ देत
जात जात नाही अन येत नाही
ती असते सवडीने वापरायची
कधी धप्पा, कधी राज्य देण्यासाठी
तत्व, निष्ठा, संवेदना, चांगलं सार
गाठोड्यात अडगळीत टाकायचंय
अन माझ्याच देशात होणारी ससेहोलपट
अन बरंच काही सोसण्यासाठी
मला ही हवं आहे हे रसायन
सांगता का कुठे मिळेल
अगदी पिलाच मी गांजा कधी
तो निवळून, अमृत घेतलं असं वाटण्यासाठी..
सांगाल को हो मला ???
शरद पुराणिक
291021
Comments