To be or not to be that is the question
सोशल मिडीयाच्या या आभासी दुनियेत
जगावं की मरावं हा एकच सवाल आहे
रोज प्रसूत होतात नव नवीन समूह
बुड ना शेंडा अन फक्त फोटोंचा राडा
क्षणाक्षणाला प्रसवणाऱ्या व्हाट्सअप्प ग्रुपचे
सदस्य व्हावे की नाही हा ही आहे प्रश्नच
की द्यावा नकार सदस्यत्वासाठी सपशेल
अन राहावं आपलं नामानिराळे दूर दूर
हजारो संदेश अन छायाचित्रे यांच्या गर्दीत
रद्दीतल्या कागदासारखं जगावं की नाही
की द्याव्या सर्व विनंत्या फेटाळुन
याच्या त्याच्या ओळखी अनोळखी सर्वच
इथेच मेख आहे
सदस्य व्हावं ही वाटतं आणि नकोही
खोट्या चेहेऱ्यांच्या गर्दीत गुदमरून जगावं
वैचारिक दिवाळखोरी आणि असंबद्ध संदेश
अहंकाराणी होत राहनारे बलात्कार पाहावेत
एकीकडे आम्ही स्वतः आणि आमचे समुह
गल्ली, दिल्ली, शाळा, महाविद्यालय, अन काय
छंद, आवड, निवड, खेळ मांडलेले समूह
दुसरिकडे ज्यांना आम्ही जन्म दिला त्यांचेही
मग हजारो GB ने भरभरून येणाऱ्या फोनला
वाचन संस्कृती, आपसी संवाद, स्नेह, माया
यांचा खून केलेल्या या भ्रष्ट बरबाद पिढीला
घेऊन आम्ही काय करावं, कुठे जावं ...
तूच सांग रे विधात्या ...
शरद पुराणिक
12082021
Comments