काम धंदा ...पोट पाणी .. बरंच काही ..पुणे (भाग 4)
काम धंदा ...पोट पाणी .. बरंच काही ..पुणे (भाग 4)
च्या मारी हा माणुस जास्तच ताप देतोय ...
ह्यानंच काय नोकऱ्या केल्यात काय
इथे हजारो लाखो लोक रोज करतात
कष्ट करतात मोठे होतात ..उगाच टीव टीव
आता संकल्प केलाच आहे लिहायचा तर तो सिद्धीस नेलाच पाहिजे. कंटाळवाण वाटलं तर माझं अपयश, नेटाने वाचलं तर ते तुमचं यश.
असो ...ते चकाकणारे, चमकदार, मोहक आणि सर्व भौतिक सुख असलेली नोकरी मी का सोडली ? काय करणार प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा आपण ठरवायची असते किंवा सर्व गोष्टी सकारात्मक असतात तेंव्हाच तुम्ही तो प्रवासाचा मार्ग बदलणे आवश्यक असते... they call it graceful exit ..माझे शिक्षण, अनुभव याच्या समतोल पगार आणि शिक्षणाला पुरक काम हे दोनीही ईथे नव्हतं. त्या मुळे या सर्व बाबी ज्या नोकरीत आहेत अशा संधी मला खुणावत होत्या. खरं तर मधल्या काळात Johnson & Johnson च्या रूपाने आणि आमचे जीवशच कंठश्च मित्र नरेंद्र खैरनार यांच्या प्रयत्नातून मिळाली पण अगदीच सहा महिने ..पण तिथेही Amby Valley ला एक भन्नाट कार्यक्रम आयोजित केला, मुंबई ला सुरक्षा परिषद जिथे जागतिक स्तरावरील सर्व कर्मचारी आले आणि Hyatt मुंबईत 3 ते 4 दिवस मज्जा, मज्जा. केल्या पण मी फार काळ तिथे रमलो नव्हतो.
एक दिवस एक नवीन संधी चालून आली अन एकाच दिवसात मुलाखत, निवड आणि offer घेऊन मी घरी परतलो. Sai Life Sciences हा प्रवास मी फक्त दोन ते तीन वर्ष करणार असं मी माझ्या साहेबांना स्पष्टपणे सांगुन निघालो... पण हा प्रवास जवळपास 9 वर्ष झाला .ठरवुन ही तो मो थांबऊ शकलो नाही आणि पाय घट्ट रोवत गेले.
आता माझ्या आवडीचं, शिक्षणाला पूरक असं हे काम होतं. इथे मी कार्यक्षेत्रात उच्च पद मिळवले Senior Manager, Assistant General Manager ते Deputy General Manager ( Corportate Head - Administration ) असा हा प्रवास व्यावसायिक, वयक्तिक दृष्टीने खूपच यशस्वी होता. नोव्हेंबर 2011 ला सुरू झालेला हा प्रवास प्रचंड रंजक, आवाहनात्मक, कष्टदायी आणि सुखावणारा होता. याचं श्रेय व्यवस्थपणाने ठेवलेला विश्वास, येथील ज्येष्ठ अधिकारी आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे येथील माझे सहकारी ज्यांच्या शिवाय हा प्रवास केवळ अशक्य होता. ज्याची श्रेय नामावली इतकी मोठी आहे आणि ती नावं घेत गेलो तर त्या नावांचाच एक लेख होईल. ते सर्व वाचणार आहेतच आणि योग्य संदर्भात स्वतःला पाहतील, ही विनंती आणि आशा करून पुढे सरकतो.
तसं काम खूपच जबाबदारीचे, जिकरीचे होते ...पहिल्याच दिवशी साहेबांनी मला तोफेच्या तोंडी दिले म्हणजे एका उच्च पदस्थ सरकारी अधिकारी यांच्याशी बातचित करून एक विषय मार्गी लावण्यासाठी मला पुढे केले. आणि तो आवाहनात्मक कामाचा श्रीगणेशा झाला. साधारणपणे सर्वच सरकारी कार्यालय आणि त्यांच्या सर्व विभागाशी संपर्क आला. आठवड्यात एक दोन दिवस याच कामात जायचे, पूर्ण शहर भर फिरायचे, कधी मुंबई अशा अनेक चकरा व्हायच्या. त्या कामांची यादी एवढी मोठी आहे की ती इथे संकलित करणे संयुक्तिक ठरणार नाही. अनेक परवाने मिळवणे, अनेक प्रकारचे भरना आणि त्याची जाच, तडपाळणी करुन घेणे, सर्व सरकारी नियमांचे आणि आदेशांचे पालन, उत्पादन वितरण आणि त्या बाबतची कागद पूर्तता, कच्च्या मालाची आयात आणि त्या साठीच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करणे. एक आवर्जुन सांगतो सर्वच अधिकारी, कार्यलयातील कर्मचारी हे ही स्नेही झाले आणि अनेकांचे आज ही अगदी मजबूत नाते आहेत. हे फक्त चांगल्या विचारांच्या देवाण घेवानीतून शक्य झाले. अनेक अधिकारी निवृत्त झाले तरी ही संपर्कात आहेतच आणि हे फक्त ऋणानुबंध आहेत इतर कुठल्याही व्यवहारामुळे नाही हे महत्वाचे.
एक तर रासायनिक संशोधन आणि औषधी निर्माण या संबंधींचे सर्व काम. अनेक परदेशी उत्पादक त्या साठी भेटी देणार...त्या सर्व बाबींची चोख व्यवस्था, सोबत दिमतीला सर्वच सहकारी, कंत्राटदार आस्थापना, वाहन व्यावसायिक उपहारगृह व्यायसायिक, या आणि अशा असंख्य लोकांचा एक सांप्रदाय त्या यात्रेत सामील असायचा. या सर्वांची एकत्र मोट बांधुन कार्य सिद्धीस नेने यात फार मज्जा यायची. इंग्रजी मध्ये अनेक म्हणी team work या विषयावर आहेत त्या खरंच अनुभवल्या, leadership या वर ही होत्या त्या ही अनुभवल्या सार्थ केल्या आणि एक उत्तम "support department" आकार घेत गेली.
या सर्व विभागांचा मी इथे स्थानिक प्रमुख होतो पण कधी हो तो तोरा मिरवला नाही, पदाचा माज आणि गैरफायदा ही घेतला नाही. Lead by example ..स्वतः एक उदाहरण म्हणुन वागा हे सतत उपयोगी ठरले.
अनेक जागतिक पातळीवरचे, मानद संस्थाचें, परदेशी उच्च औषधी निर्माते, सुरक्षा या विषयीचे परीक्षण, तपासणी या वर युध्द पातळीवर अक्षरशः महिने महिने न सुटी घेता सतत
काम आणि काम असं करवून ते मानाचे मुकूट कंपनीच्या शीर पेचात अभिमानाने मिरवले आहेत मिरवत आहेत..
हा प्रवास पुर्ण 9 वर्षांचा असल्याने तो अशा एका लेखात सामावणे केवळ अशक्य ...ही झाली काम कष्ट याची मालिका ...पण या सोबतच खूप आनंद सोहळे, गमती जमती आणि असंख्य सुखावणारे क्षण त्या माझ्या सहकाऱ्यांसोबत अनुभवले...ते इथे असं थोडक्यात बसवणं शक्य नाही ....आणि अनेकजण म्हणतील अरे हा काय काम बीम करतो की फ़क्त मज्जा, म्हणुन ...
पहिले काम और फिर आराम ...
तो हम आराम फर्मायेंगे.
वैसे आज इतवार है ...
बस जल्द ही लौटेंगे खुशीया लेकर...
शरद पुराणिक
040721
Comments