आताच एक बातमी वाचली शिर्डी मध्ये प्रचार सभेत व्यासपीठावर आदरणीय नितीन जी गडकरींना भोवळ आली . आत्ता त्यांची प्रकृति स्थीर असल्याची ही बातमी आली. खरं तर कुठल्याही पक्ष जात पात आणि धर्म विचार धारेच्या पलीकडे जाऊन या घटनेचा मी जेंव्हा विचार केला आणि लक्षात आलं की कॉर्पोरेट क्षेत्रातही प्रचंड धावपळ कष्ट आहेत पण ते करताना सगळ्या सुख सुविधांची चोख व्यवस्था असते आणि कल्पने पलीकडे जाऊन विचार करून त्याची अंमलबजावणी ही होते. पण निवडणुकीच्या या सगळ्या धावपळीत सर्व पक्षांच्या नेत्यांची मान्यवरांची विषेश करुन जे वक्ते आहेत त्यांची अक्षरशः फरफट होते,. इकडे सूर्य आग ओकत आहे आणि उन्हाच्या त्या चटक्यात हजारो मैल प्रवास. विमान हेलिकॉप्टर चारचाकी गाडी तर कधी खाजगी प्रचारासाठी तयार केलेल्यां गाड्या. सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अश्या वेग वेगळ्या वातावरणात होणाऱ्या सभा..तास न तास बोलणं. कुठे आच्छादित व्यासपीठावर तर कुठे मोकळ्या जागेत मैदानावर गल्ली बोळात असणारी सभा स्थान. कशाचा कशाशी मेळ नसतो. झोप नाही धड जेवणाची नाश्त्याची वेळ नाही. वेगवेगळ्या तापमानात फिरायचं. बोलायचं ते ही मुद्देसूद लोकांना पटेल...
Posts
Showing posts from November, 2021
- Get link
- X
- Other Apps
म्हणतात ना आईचं काळीज आई झाल्या शिवाय कळत नाही !! मुलांच्या आनंदात स्वत: चा आनंद शोधणारी आई ।। त्या साठी आपली सारी स्वप्नं गुंडाळून ठेवून त्याचं गाठोडं कोणालाही न दिसू देणारी ।। मुलां साठी राब राब राबणारी पहाटे उठून त्यांचे डबे त्यांच्या आवडी निवडी सहित तयार ठेवणारी ।। त्यांनी खाऊन झालेले डबे स्वतः च त्यांच्या बॅग मधून काढून स्वच्छ धुवून ठेवणारी आई ।। काळ बदलला जगण्याची रीत बदलली पण आई आईच आहे ।। आजची आधुनिक आई ही तितकेच कष्ट करते ।। तिला सोइ सुविधा आहेत पण घरातलं अन बाहेरच अस दोनीही जग संभाळणारी ।। मुलांच्या ऍडमिशन ते ओपन हाऊस ला जातीनं हजर राहणारी ।। ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता मुलांची ने आन करणारी ।। हे करत असताना शेजारच्या लोकांचे टोमणे - काय फिरते ही बाई - असे सहन करणारी आई ।। स्वतः घरात गॅस चालू न करणाऱ्या इतर बायकांच्या चौकशीला ( आज काय डब्यात ।। पोळी की नुसता भात इत्यादी) तितकेच हळुवार उत्तर देणारी..आणि रोज चवदार चारी ठाव जेवण देणारी ।। तरी काही मुलं बाहेर पिझ्झा बर्गर खाणारी आणि त्यांच्या उरलेल्या पोळ्या दुसरे दिवशी स्वतः खाणारी आई ।। पुर्वी आई फक्त घरांत ह...
एका चिमुकल्याचं अस्तित्व
- Get link
- X
- Other Apps
सत्य घटनेवर आधारीत ।।। एका चिमुकल्याचं अस्तित्व मुलगा, आनंद. पहिला मुलगा होता अन दुसरी सुंदर मुलगी , आता तिसऱ्या वेळेस पुन्हा मुलगा झाला. तसा संसार त्यांचा छोटाच होता. पण घरची परिस्थिती एकदम व्यवस्थित होती. स्वतः ची 2 घरं, वास्तवात बंगले, चांगले बांधलेले, पैकीं एक किरायाने दिलेलं, बँकेत नोकरी होती दादाची. उत्साहाला आणि आनंदाला पारावार उरला नव्हता. घरात एक गोंडस बाळसं वावरत होतं. मोहित करत होत सर्वानाच. लोक येणार भेटून जाणार, तसं बाळ सुंदर दिसतात पण सोनू खरंच सुंदर होता. आईवर गेला असावा पितवर्णीय अर्थात गोरापान, त्यात योग्य बाळसं लाभलेले. दृष्ट होऊ नये म्हणून त्याच्या गळ्यात काळ्या दोऱ्यातले चार सोन्याचे मणी घातले होते दादाने हौसेने, त्याला काय त्याचं पण आनंद असतो. सोनू आता घरातील एक अविभाज्य घटक झाला, प्रत्येक जण दिवसातून वेळोवेळी त्याला खेळवण्यात, बोलण्यात मग्न, त्याच्या भाषेत, आपल्याला न समजणारी ती भाषा, खुदकन हसणं, तोंडाचा ,ऑ, करून, गालावर खळी पडते त्या क्षणीच तो आवडायचा सर्वाना. तसा तो जायचा ही सगळ्यांच्या कडेवर, गल्लीत आता तो सर्वांचा सोनू होता. 2 महिने झाले अर्थात सोनू 2 महि...
एका दिमाखदार विवाह सोहळ्या साठी आपणा सर्वांचे अभिनंदन
- Get link
- X
- Other Apps

आदरणीय काका, काकु आणि आशुतोष व केतकी प्रथम एका दिमाखदार विवाह सोहळ्या साठी आपणा सर्वांचे अभिनंदन !!$$!! अश्या या दैदिप्यमान सोहळ्याला आम्ही होतो हे आमचे भाग्य. खरं तर साखरपुडाच इतका अवर्णनीय होता, त्या धरतीवर मुख्य सोहळा निश्चितच चांगला होणार यात कुठलीही शंका नव्हतीच. गेली चार दिवस हा सोहळा टप्प्या टप्प्याने संपन्न होत होता आणि त्या समस्त सोहळ्याचे याची देही याची डोळा वर्णन अनिता करून करून थकत नाहीये, प्रत्येक क्षणाला तिला काही ना काही आठवत राहतं आणि आनंदी चेहेऱ्याने ते ती सांगतेय. मेहेंदी आणि बांगड्या हा तसा फार घरगुती पद्धतीचा कार्यक्रम पण आपण सर्व रसिक, दर्दी आणि आनंद उधळणारे आणि त्यात समरस होवून स्वतः ही तो जगणारे आहात. त्या नंतर झाला तो संगीत रजनी चा कार्यक्रम. मी पुन्हा नमूद करू इच्छितो मी जरी यास उपस्थित राहू शकलो नाही तरी त्याचे वर्णनं करताना अनिताच्या चमकणाऱ्या डोळ्यातुन आणि आतून येणारे भावच सर्व सांगुन गेले. आपण सर्व जण कलावंत आहातच पण त्यात ही आशुतोष सारखा कलेचा, सुस्वभावी, प्रेमळ, मायाळू आणि स्वच्छ असा कोहिनूर हिरा आपल्याला लाभला हे ही भाग्य. हे असं इ...
व्हाट्सएप न भावकी
- Get link
- X
- Other Apps
व्हाट्सएप न भावकी काही वर्षांपासून माणसं दुरावली होती आता म्हणे सोशल मीडिया मुळे पुन्हा जोडली गेली इतकी की ती सतत तांदुळ निवडत राहतात त्या अतिहुशार यंत्राने माणसाला पुन्हा दूर दूर केलं प्रत्यक्ष जरी बाजूला असला तरी बोलत नाही आणि तिकडे फार दूर असणाऱ्याला पिंग करतो सकाळी उठून देवाला नमस्कार न करता साऱ्या जगाला GM करतो घरातली आई बायको चहा हातात घेवुन येते तर हा किंवा ही यंत्रात गुंग असतो अन मानेने इशारा करतो थोबाड वर करून पाहात नाही कराग्रे वसते लक्ष्मी पार बुडुन गेलं अन भल्या पाहाटे या करा ना फक्त ते यंत्र दिसतंय एवढं माञ सोप्प झालंय पूर्वी पेक्षा की कुणाच्या घरात जाऊन डोकावून चौकशीची गरज उरली नाही आता स्टेटस ला सगळं कळतं नाही तर चेहेरा पुस्तिकेत दिसतं भावकी किंवा भोचक प्रपंच आज ही चालूच आहे त्याचं माध्यम फ़क्त बदलले आहे कशाला लाईक करायचं आणि मत मांडायचं याचे ही निर्बंध आहेत इथे घरच्या ला सोडून दारच आवडायची जुनीच परंपरा आज ही आहे बायकोच्या फोटो उघडुन ही न पाहता शेजारणीचे फोटो झुंम करून पाहणारे महाभाग ही आहेत जशास तसे असा पक्का नियम इथे ही कटाक्षाने आहे तू मला ...
लादनी
- Get link
- X
- Other Apps
लादनी अनुभवाचे धडे शिकताना माणुस स्वतःला हरवतो. एका कोंदटलेल्या लादणीतल्या जीवनाला असंख्य मजली इमारतीच्या दुनियेत पंचतारांकित हॉटेलातलं जीवन दाखवावं तेंव्हा लादनी डोळ्याआड होते. किंबहूना ती नकोशी वाटु लागते. लादनी खरंच इतिहासजमा झाली आहे. गढीतल्या बैठकी खालच्या लादणीत मांडलेला संसार, डबलडेकर चाकं नसलेली न हलणारी फक्त थरथरनारी येता जाता, सत्तर वर्षे वयाच्या म्हाताऱ्यांचे हात पाय कापतात तसं, लादनीच आयुष्य संपत आलं. ती म्हातारी झाली. हीच लादनी तिच्या जवाणीत मस्तवाल होती. एक पिढ्या न पिढ्या चालत आलेली बत्ती, जर्मन कंपनी चा एक जुनाट रेडिओ , आताच्या टी व्ही सारखा, वेगळा असा दिवाणखाना नव्हता, नाटकात असतं तसं सिम्बॉलीक. एका बाजूला जून्या सुताराकडून खास तयार करून घेतलेले 4 दिवाण. तशी लादनी मोठी होती बैठकी पेक्षा. लाल कपड्यात सोंगट्यांचा डाव खुंटीला बांधलेला, रात्री बत्तीच्या झोतात जगणारा आणि रंगणारा डाव. चिरेबंदी छताला खिळ्यावर लाल पिवळ्या कापडात काही तरी बांधलेले आजवर कोणीही उघडण्याची हिंमत केली नाही. अंधारलं होताच बत्ती इमान जागायची, गुरांना बांधून गडी येणार बत्त...
आज मी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे
- Get link
- X
- Other Apps
आज मी जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे वाढदिवस तसे दरवर्षीच येतात, साजरे होतात आणि निघुन जातात पुढच्या वर्षी फिरून येण्यासाठी. पण हा वाढदिवस इतकी अफाट संपत्ती सुबत्ता आनंद समाधान आश्चर्य प्रेमाचा महापूर भावनांचा खळाळता सागर माया आपुलकी देऊन गेला की जगातल्या सर्व बँकेच्या तिजोरीत मावणार नाही , इतकं प्रचंड देऊन गेला. तसही रविवार असल्यामुळे मी हैदराबाद हुन इथे पुण्यात असणार होतोच. तसा मी आधीच आलो काही कामासाठी, थोडंफार काम उरकून घरच्यांना जरा बाहेर जेवायला जाऊन हा साजरा करण्याचा माझा मानस होता. सकाळी औक्षण वगैरे करून मी पूजा पाठ करे पर्यंत अनिता ने पंच पक्वान्न तयार केले त्याचा देवाला नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला बसलो, तशी घरात येणाऱ्यांची संख्या वाढत गेली, पण हिने मला अगोदर काही कहाण्या सांगून माझ्या प्रश्नांना पूर्णविराम दिला. जेवणानंतर सर्व मंडळी त्यांच्या विविध कामांसाठी बाहेर पडली. संध्याकाळी मी बाहेर जेवायला जाण्यासाठी घाई करत होतो तसे ही लोकं जरा निवांत होते. आम्ही तयार झालो, इच्छे विरुद्ध मला सूट घालावा लागला. निशांत ने आज कधी नव्हे ते गाडी मी चालवतो अस सांगून गा...
- Get link
- X
- Other Apps
आज पुन्हा एक जुना कागद हाती आला ।। ज्यात विशिष्ट विषयांवर लिहायचं होत ।। वर्ष आठवत नाहीये ।। कवी आणि गरिबी हे नातं अस अतूट असतं कवितेत गरिबी असते पण कवी गरीब नसतो समाजानं केलेली अवस्था असते कवींना केविलवाणे वागवण्याची कवी आणि राजकारण कवींच्या रचनेत राजकारणी राहतात अन तो व्यक्त होताच ते चपापतात उघड्या डोळ्यांनी चाललेला लपंडाव कवीला अस्वस्थ करतो अन त्याची लेखणी पेटून उठते कवी आणि परमात्मा आता परमात्मा कोण इथं साहित्यालाही जात न धर्म लागला तसा परमात्म्याचा अर्थ बदलला ज्याचा त्याचा आपला आपला सवडीचा परमात्मा प्रेमात पडलेला कवी इथे सारखी पडझड असते प्रेमाची भरती ओहोटी अखंड कवितेततच रेंगाळलेलं प्रेम प्रेमात तरंगणारा कवी आमची शाळा अन आम्ही स्वच्छंद आम्ही पाट्या न पॅंटी च्या शिवलेल्या दप्तरांनीशी गाव गल्लीतल्या शाळेच्या दारात बसायचो शाळेचं कुलूप उघडायच तसा क्षणार्धात किलबिलाट गलबळाट गडबड गोंधळ भरल्या भरल्या सारखं वाटायचं काका काकू सारखे वाटणारे बाई न गुरुजी आताच्या युगात इंग्रज आल्यासारखे वाटतात, गो बँक सायमन शरद पुराणिक एक अति जुनी आठवण
पहिला पाऊस झाला
- Get link
- X
- Other Apps
उन्हाची धग वाढत चाललेली मृगाची वाट पाहात बसलेले लोक त्या उन्हाच्या धगीत तसं उन्हाचे चटके तापत चाललेले अचानक शिराळ पडत ढग येतात पावसाची काळवंडून चार थेंब पडतात पहिला पाऊस झाला इकडे अंदाज बांधले जातात होणाऱ्या पावसाचे, पलीकडच्या राज्यात पाऊस अमुक इतका झाला, तिकडे यंदा पाऊस नाही म्हणे, आपल्याकडे भरपुर होणार, उन्हाच्या धगीत लावलेले पावसाचे अंदाज. मृग नक्षत्र निघून जातं, पाऊस येतो संथ वाऱ्याच्या झुळकी सारखा अन निघून जातो विजेच्या ही अधीक वेगाने, पण ती झुळूक आल्हाददायक असते , आशा वाढवते पावसाच्या. इकडे कवी लोकांच्या लेखण्या ताठकळून बसलेल्या लिहिण्यासाठी, शेत मजूर त्यांच्या दिवाळीची वाट पाहतात अन स्वप्नांचे मनोरे रचतात. शेत मालकाची लगीन घाई असते, या वर्षी पलीकडल्या उमाटात ज्वारी टाकायची, विहिरीलगत भाज्या लावायच्या, ऊस तोडनी वर पुन्हा ऊस घ्यायचा. गेल्यासाली चांगले धान्य साठलेले होत, यंदा दुप्पट घेऊ. इकडे खतांच्या दुकानावर ट्रक येऊन थबकले असतात. बी बियाणांची उतारणी होत असते दुकानात. गावातला गण्या चावडीवर यंदा नवीन खत आलंय हे रंगवून सांगत असतो अस की जणु त्यानेच ते तयार केलंय. गण्याची ...
गौरी गणपती
- Get link
- X
- Other Apps
गौरी गणपती सण म्हटलं की धावपळ, उत्साहाला उधाण, माणुसकीचा ओलावा, गर्दी, पैशांची उधळण, खायची चंगळ अन कौटुंबिक कुंभमेळा. तसे वर्षभरात अनेक सण येतात. प्रत्येक सण काही तरी वेगळी आठवण साठवून जातो खोलवर मनात... आणि जुन्या आठवणींना उजाळा देतात. मन भूतकाळात तरंगायला लागतं.. अन एक एक प्रसंग डोळयांसमोर उभे राहतात. महालक्ष्मी चा सण आता काही आठ्वड्यावर आहे, श्रावण आला की तो सणांची एक मोठी मालिका सोबत घेऊन येतो, म्हणून आज ही आठवण झाली. मराठवाड्यात या सणाला महालक्ष्मी, लक्ष्मया, गौरी अशी अनेक विविध प्रांतनुरुप नावं आहेत. हा सण म्हणजे खूप धावपळ विशेषतः स्त्री वर्गाची, पुरुषांसाठी सामानाची ने आन, घर आवरणे, इत्यादी. पण षोडशोपचार पूजा त्या सोबत षोडश पक्वान्न आणि त्या साठीची तयारी या साठी स्त्री वर्गाची पार तारांबळ उडते एवढी तयारी. आमच्या लहानपणी सगळी काका मंडळी दूर दूर गावावरून गावी यायची, आजही अनेक ठिकाणी ते आहेच पण अनेक ठिकाणी ते काळाच्या आड गेलंय. असो, सर्व अगदी सह कुटूंब सह परिवार यायचे. पाहुण्यांशिवाय हा सण तो कसला? सगळ्या जावा जावा, सुना, नातसुना, इत्यादी एकत्र यायच्या अन कामाची चढा ओढ,...
- Get link
- X
- Other Apps
ठिणगी कुणीतरी टाकावी ठिणगी तापलेल्या कुंपणावर कुणीतरी टाकावं आगीत तेल आगच ती वाऱ्यासरशी पेटायची आग वाढायची तेंव्हा आम्हीच पाहायचो तिला सहज म्हणुन आग जेंव्हा बोकाळायची तेंव्हा आम्ही घरात लापायचो सोसत आम्हीच लावलेल्या आगीच्या झळी अन चटके अन जेंव्हा आग थंड व्हायची तेंव्हा आम्हीच काढले कॅमेरे टाकले फोटो आणि बातम्या याच अपराधी कलेतून साकारायची झालेली हानी, लूटमार, हिंसाचार लोकांच्या चर्चे साठी एक विषय एवढाच हेतु शरद पुराणिक (पुनःश्च एक जुनी डायरीतील पान)
- Get link
- X
- Other Apps
चक्र अन्याय अत्याचार अवमानाच्या झुंडीत पिंगा घालतंय तुमचं माझं जीवन दारिद्रय, महागाई, बेकारीच्या समुद्राची भरती वाढत चाललीये या संगम अन प्रवाहाच्या पुरात वाहत चाललंय हेच जीवन पूर ओसरला, पंच वार्षिक योजना, वीस कलमी कार्यक्रम अन गरिबी हटाव च्या विमानातून फेकल्या जाणाऱ्या शिळ्या पावांवर आज ही आम्ही तग धरून तसेच घट्ट पण विखुरलेले पण कोरड पडलेल्या नरड्याला साधं पाणी नाही दिलं तुम्ही काल आकाशवाणी झाली म्हणे आता निवडणुकांचा पूर येतोय लगेच नदीकाठी वसली आमची घरं काही कष्टातून काही मदतीतुन पण आलेल्या पावसात पुन्हा पूर, पाव, दुष्काळ, अन्याय, अत्याचार, अवमान एक न थांबणार चक्र शरद पुराणिक (पुनः तेच, डायरीतील एक जुनं पण नवीन पान)
देव आहे हे पुन्हा एकदा अनुभवलं
- Get link
- X
- Other Apps

देव आहे हे पुन्हा एकदा अनुभवलं मागे पाठवलेल्या गौरी महालक्ष्मी च्या लेखाचा हा एक अजून भाग, संदर्भ जरा खासगी आहे पण लिहावं असं कटाक्षाने वाटलं, कृपया याला आत्मस्तुती, किंवा सहचारिणीचे अतीव प्रेम किंवा दिखावा असं न समजता एक अनुभव म्हणून वाचावं ही विनंती. परवाच ऑफिसचा एक मेगा इव्हेंट करून अख्या पुणे टीम सोबत परतलो कारण 2 दिवसांनी गणपती येणार होते, त्याची तयारी म्हणून आधीच आलो. हा सण दरवर्षी येत असला तरी त्याची तयारी करण्याचा एक विलक्षण आनंद उत्साह दर वर्षी असतोच. त्याच भरात सगळं होत होतं. प्रथे प्रमाणे 2 मूर्तींची स्थापना, त्या नंतर मी आणि अनिता पुण्यातील 5 मानाचे गणपती दर्शन घेऊन आलो, आमच्या कडे गणपतीची तशी उपासना फार किंवा अगदी नाहीच असं म्हणा, फक्त हे दीड दिवस ते आमच्या घरात असतात. त्यामुळे या दिवसात आम्ही जेवढे शक्य तेवढे गणेश दर्शन इत्यादी करतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी विसर्जन तत्पूर्वी वळीव लाडु, मोदक आणि इतर पक्वान्ने यांचा नैवेद्य करून मी पूजा आटोपून सकाळीच ऑफिसला गेलो. मूर्तींचे विसर्जन मुलांनीच केले, कामा मुळे मला ते शक्य नव्हते. लगेच गौरी चे आगमन होणार होते, ऋषी पंचमी चा ...
एक ढगाळलेली संध्याकाळ
- Get link
- X
- Other Apps
एक ढगाळलेली संध्याकाळ उजेडातही अंधारल्यासारखं वाटावं, पलीकडे भिंती कोसळतायेत, घर कोसळतायेत अशा स्वरूपाच्या मेघ गर्जना अधून मधून, प्रत्येक जन घर जवळ करतोय, क्षणात सुरू होणारा पाऊस भिजवत राहतो सृष्टीला. तापलेली मनं शांत होतात पावसाच्या भिजण्याने, सर्द होतात. सृष्टी ही सर्द झालेली, मातीनं ही भरवून घेतलं स्वतः ला पावसाच्या पाण्यात, झाडं न्हाऊन निघाली अन आता हुडहुडी भरली झाडांना, तसं पुन्हा त्यांच्यातलं पाणी झटकुन देतात आपण ओले केस झटकतो तसेच, एक छोटा पाऊस. घराघरातले स्टोव्ह न गॅस पेटलेले, प्रत्येकावर चहाचे आधण ठेवलेले सुंठ टाकून, बाहेर तो बरसतोच आहे, आत चहा उकळत आहे, पवसासोबत येणाऱ्या गारव्याच्या त्या लहरींच्या सोबत चहा प्यायचा तो परमानंद, आह हा. तिकडे चहाच्या टपऱ्यांवर, हॉटेल मध्ये लोकांची गर्दी, भिजत जायचं थोडंसं अन गरम कडक चहा प्यायचा, ज्यांचे गॅस, स्टोव्ह चालत नाहीत किंबहुना नाहीतच असा वर्ग. उन्हाळ्यात बिअर पिऊन आंबलेली जीभ आता व्हिस्की चा धसका घेते, तसं बिअर बार वर गर्दी होते, खप वाढतो, आता आशा या मैफिलीत सिगारेट असणं वावगं नाही , ती हवीच असते ज्याला हवी त्याला. दोन रजया अं...
मंत्र जागर आणि घंटा नाद
- Get link
- X
- Other Apps
आमच्या घरचे नवरात्र आताच नवरात्र उत्सव संपन्न झाला. या वर्षी या उत्सवा अगोदरच आमचे काका हे जग सोडून गेले त्या मुळे आम्ही हा उत्सव साजरा करु शकलो नाही. पहिल्या दिवशी मी जेंव्हा ऑफिस मधून घरी येत होतो तेंव्हा आसपासच्या घरातुन दरवळणारा गुगळ सुगंध, घंटानाद, मंत्र जागर आणि घंटा नाद ऐकताना मी पार आमच्या मूळ गावी बीड ला गेलो आणि त्या काळच्या नवरात्रीची ती धुम एका चित्रफिती प्रमाणे नजरे समोर फिरु लागली. आम्ही ज्या वाड्यात राहतो तो वाडा म्हणजे 26 खण माळवद (लाकडी स्लॅब म्हणा). ज्यात साधारण 10 ते 12 खण आमची ओसरी होती, त्यातच एका कोपऱ्यात आमचे देवघर होते. भिंतीतच काढलेले ते देवघर होते ज्याला एक कमान, आत 4 ते 5 पायऱ्या आणि त्यावर क्रमाने राहणारे आमचे देव. देवीचा एक मोठा तांदळा म्हणजे आमची प्रमुख देवता. त्या सोबत वेगवेगळ्या आकाराचे रंगनाथ, शाळीग्राम, गरुड, दीप लक्ष्मी, श्रीयंत्र, अन्नपूर्णा, विष्णूपद, कुबेरयंत्र, गुरू च्या गुरुमंत्र घेतलेल्या डब्या. देव घरा बाहेर उजव्या हाताला एक मारुती मुंजा, शेंदूर लावून लावून फक्त एक चौकोनी आकार दिसतो आता. सोवळ्या साठी एक सीमारेषा म्हणून 2 फुटाचा...
एका युगाचा अंत
- Get link
- X
- Other Apps
एका युगाचा अंत परवा औरंगाबाद ला गेलो होतो, कारण होतं आमच्या सासऱ्यांचं विकलेले घर आणि त्याचा व्यवहार पुर्ण करायचा होता. एक दोन दिवस कागदपत्रे आणि इतर बाबींची पूर्तता करुन आम्ही नोंदणी कार्यालयात पोचलो त्याच घरातून जे काही तासानंतर आपलं अस राहणार नव्हतं. खरं तर हा विक्री व्यवहार अनेक महिन्यापूर्वीच ठरला होता आणि ज्या दिवशी तो ठरला होता त्याच्या काही दिवसातच घराचे मालक म्हणजेच माझे सासरे अनंतात विलीन झाले होते...किंबहुना त्यांना त्यांचं जीवन त्याच घरात पुर्णतः व्यतीत व्हावा ही त्यांची इच्छा असेल...असो त्या नंतर हा अर्धवट व्यवहार पूर्णत्वाला जाण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. मी माझ्या सासऱ्यांसोबत (अण्णा) अनेक वेळा केलेल्या चर्चेतून अस कळालं होतं की त्यांनी अनेक हाल, अपेष्टा, कष्ट, त्रास यांचा सामना करून हे घर उभं केलं होतं. त्यांच्या शिक्षणा नंतर लगेच त्यांचं राहतं गाव सोडुन तालुक्याच्या ठिकाणी एका व्यापाऱ्याकडे कामाला लागले..रोज त्या घरची सर्व घर कामं करून दोन वेळचे जेवण आणि राहण्याची व्यवस्था होती. अण्णांना कुठलही पाठबळ नव्हतं आणि सर्व कुटुंबाची जबाबदारी होती. ६ बह...
माझी लुटुपटू ची नाट्य चळवळ
- Get link
- X
- Other Apps
माझी लुटुपटू ची नाट्य चळवळ परवा संजूचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि मी माझी सांस्कृतिक कारकीर्द कशी सुरू झाली या भूतकाळात जाताना माझ्याच या प्रवासाच्या अंधुक छटा पाहू लागलो. तशी या सांस्कृतिक जीवनाला शाळेत सुरुवात झाली. जिथे प्रार्थना मी आधी म्हणायचो आणो त्या मागून शाळेतील इतर विध्यार्थी, खड्या आवाजात भारत माझा देश आहे असं म्हणायचा तो कालखंड 1 ली ते 7 वी पर्यंत नित्याचा होता. त्या सोबतच प्रत्येक महापुरुषाच्या जयंती आणि पुण्यतिथी निमित्त भाषण देणं हा ही ठरलेला कार्यक्रम होता. फार बौध्दिक पातळी नसताना मास्तरांनी लिहून दिलेलं भाषण पाठांतर करून, दोन्ही हातांची घडी करून सांगण्याची ती मजा औरच होती. टिळक, आगरकर, आंबेडकर, गांधी, चाचाभाई नौरोजी, सरोजिनी नायडू, सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज अशी अनेक मंडळी त्या त्या दिवशी अंगी संचारायची. गल्लीतल्या गणेशोत्सवात मेळा हा हमखास मनोरंजनाचा कार्यकम असायचा. त्याचं आता विविध गुणदर्शन अस नामकरण झालंय. गल्लीतल्याच एका वाड्यात या मेळ्याच्या तालमी व्हायच्या, समूह नृत्य, नाटिका, संगीत असा तो आज ही मनांत घर करून बसलेला मेळा, ...
जीवन एक खळखळता प्रवाह
- Get link
- X
- Other Apps
जीवन एक खळखळता प्रवाह ओढ्याच अन नद्यांचे पाणी जसं बदलत जातं प्रत्येक पावसाळ्यात, नवीन पाणी येतं अन जातं, तसंच नवीन घटना, प्रसंग येतात अन जातात. दिवस तर जातातच पण त्या घटना ही त्यासोबत जातात तशाच. गोष्टी जेंव्हा कळत नसतात तेंव्हाचा तो आनंद किंवा तो आनंद आहे की दुःख हे ही न समजणारी परिस्थिती, अगदीच मजेशीर असते. अन जेंव्हा त्या आठवतात तेंव्हा अलगद हसतो नकळत आपण स्वतःला, कधी पश्चात्ताप होतो, अरे तेंव्हाच कळलं असतं तर, पण तो काळ त्या गोष्टी काळण्याचा नसतो हे समजते आणि हताश होतो आपण. वयात यायला लागल्या नंतर घरच्यां पेक्षा मित्र जवळचे वाटू लागतात. या वयात मित्राला कसं ओळखावं, तो आपला मित्र एवढंच मनात पक्कं केलेलं, पण जेंव्हा तो हात देतो तो होणारा पश्चात्ताप, काय फ़रक वरील स्थितीत आणि याही, अगदी काहीही नाही असं नाही, पण झालेली चूक लक्षात येते. ती पून्हा होणार नाही यासाठी आपण प्रयत्नशील असतो. आता हवे तेच मित्र असतात, जवळीक वाढते, एकमेकांविषयी भावनिक होतो, चर्चेचे विषय वाढतात. घरात न बोलता येणाऱ्या गोष्टी मित्रांपुढे बिनधास्त चर्चिल्या जातात. आर्थिक अडचण, मानसिक त्रास, सुख दुःख सारं सारं भडा...
माझ्या गावी बीड ला चुलत भावाच्या लग्नासाठी
- Get link
- X
- Other Apps

1 डिसेंबर ला माझ्या गावी बीड ला चुलत भावाच्या लग्नासाठी गेलो होतो. तसं आमच्या भावंडांच्या रांगेतील हे तसं शेवटून दुसरं कार्य, अजून एक बाकी आहे. वयाच्या पन्नाशीत असं कार्य पाहायला आणि अनुभवायला आम्ही अत्यंत उत्सुक होतोच. मुलांच्या परीक्षा असल्याने आम्ही उभयतांनी जाण्याचे योजिले. दोघंच होतो त्या मुळे बस ने प्रवास करून पहाटे पोचलो. त्याच दिवशी देव ब्राम्हण असल्याने पहाटेच लगीन घाई सुरू झाली होती. माणसाची नाळ आपल्या मातीचे गुण आणि वाण सोडत नाही. खरं तर हल्ली शहरात राहून बडे जावं आणि चोख व्यवस्था, प्रचंड खर्च, दिखावा असं एक साधारणपणे चित्र असतं कुठल्याही कार्यात, पण ते सारं क्षणिक, दांभिक आणि काही तासांपर्यंत टिकणार असतं. तो झगमगाट मला कधीही आपलंसं करून गेला नाही, ना त्या अति उच्चभ्रू वातावरणात मी कधी रमलोच नाही. इथे उतरताच एक कार्य संचार भिनतो शरीरात, तहान भूक विसरायला होते, इथे असते ती आपलेपणाची, भेटी गाठींची भूक. अगदी तसंच काही झालं. थोडावेळ पडू म्हणून विचार करत असतांनाच डोळा लागला आणि काही वेळाने काकीने आवाज दिला चला रे चहाला, हे सकाळी 6 वाजता. थोडं दु...
Train Journey - Part 2
- Get link
- X
- Other Apps
Travelling in train with RAC ticket, where in no confirmed berth. I realised the pain today of not having a confirmed ticket. My friend Prashant was insisting me to come by bus , but refused as I hate bus journey and just don't get any sleep (though my wife n sons claim that I sleep) whenever we travel together, or I tell them that I did not get a sleep at all, then they all laugh at me and now started ignoring as it is a regular complaint. That's more so a fun part. Sharing a berth with a stranger whole night that too when entire boggie busy in snoring and all are in deep sleep including the person with whom I am sitting. By folding his body whatever way he could he is making different amiba like postures and with rhythmic noise he is also enjoying his sleep. Till now a big group of youngsters (when am writing youngsters, feeling a pain but have to accept it, ) were making all kinds of drama as explained in my earlier train journeys. It was a group of over 20 boys n g...
My Travelogue - train journey Part 1
- Get link
- X
- Other Apps
Off late have been travelling frequently in trains Hyd Pune Hyd...since am alone have nothing to entertain myself than watching the co passengers..various behaviours u come across...let me start from the platform where we keep waiting...few people will walk with strolleys n big suitcases..while walking they always think the entire escalator steps n platform is made available only for them n are not bothered of others....there are few who carry tiny local bags ..they give a stunning look as if only they have those big bags...then comes the coaches..few travel by AC ..few b second class ..depending upon the availability affordability urgency...today I was waiting at B5 where the co passengers waiting for S1 ..some one came asked about my coach ..I deliberately told S3 ..n he said ohhh..mine is AC...Though mine was the same ...he looked at me and went off...as soon as we reach our coach...people think as if they have owned the entire train and start behaving like owners o...
अविस्मरणीय सहल, धार्मिक यात्रा, कुटूंब मेळा आणि बरंच काही
- Get link
- X
- Other Apps

अविस्मरणीय सहल, धार्मिक यात्रा, कुटूंब मेळा आणि बरंच काही गेली साधारण अडीच वर्षे मी हैदराबाद पुणे असं कार्यालयीन दगदग, दर आठवड्याचा प्रवास या साऱ्याला कंटाळून एक मोठी रजा घेण्याच ठरवलं. वर्षाखेर आणि शिल्लक रजा असा आमच्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कामगारांसाठी तसा दुर्मीळ योग जुळून आलाच होता. कुटुंबासोबत राजस्थान दौरा आखला होता, पण मुलांच्या शैक्षणिक अडचणी मुळे तो रद्द केला. अनायासे रजा होतीच, त्यात एका घनिष्ट मित्राच्या लग्नाला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल एक सोहळा औरंगाबाद येथे ठरला होता. मग आमचा मोर्चा औरंगाबाद ला वळला. मित्राच्या त्या सोहळ्या विषयी पून्हा सविस्तर लिहिणार आहेच, कारण तो विषयही अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. खर तर या वेळी फ़क्त मित्रांसाठी वेळ द्यायचा असं ठरवलं होतं. पण आमच्या सासरच्या मंडळींनी आमची कुलदेवता श्री रेणुकामाता च्या दर्शनासाठी माहुरगड दौरा आखला होता. मग त्यांच्या सोबत जायचं ठरलं. सर्व मिळून 55 सदस्य असलेल्या या कबिलयासोबत चा प्रवास म्हणजे एक पर्वणी होती. तयारीचे सर्व संदेश "काय चाललंय" या भ्रमणध्वनी वरील सदरात येतंच होते, फार नियोजन होतं, 2 वर्ष ते 70 वर्षे अ...
लातूर भूकंप
- Get link
- X
- Other Apps
एक खूप जुनी जखम आज खाजवली , अर्थात जुनी आठवण लातूर भूकंप जेवणं खाणं आटोपून थकलेले लोक निद्रिस्त झाले, उद्याची स्वप्नं उराशी घेऊन, उद्याचे कार्यक्रम डोक्यात शिजायला घालतच लागलेली झोप. झोप आता साखर झोप झाली - अचानक सारी स्वप्ने ठेचून निघाली, गाडली गेली त्या काळरात्री. भूकंप का झाला त्यामागची कारणं शोधणं तसं नंतरचं काम, पण तो झालाय, एवढ्या मोठ्या प्रमाणात झालाय की त्याचा व्यास आणि क्षेत्रफळ लक्षात येण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. विज्ञान कितीही पुढे गेले तरी नैसर्गिक आपत्तीला कधीच कोणीही थांबवू शकत नाही. १०००, २०००,....४००० अगदी ठार मेले, चेंगरून मेले, ठेचून गाडले गेले स्वतः बांधलेल्या घरांच्या भिंती अन छताखाली. पै पै जमवून बांधलेली घरच अंगावर कोसळली अन जीव घेऊन गेली मालकाचा. किती कठोर असावी ती नियती अन का हा खेळ खेळावा भोळ्या भावड्या जीवांशी. शहरांना काहीही झालं नाही, नुकसान झालं ते ग्रामीण भागात. रोजंदारीवर काम करणारे शेतमजूर, कारखान्यातले कामगार, आपल्या जमिनीवर थोडंस पीक काढून जगणारे लोक राहायचे या भागात. आता तो भाग म्हणे नकाशात सुद्धा नाही. सांगणं फार सोपं ...
संक्रांत , माझ्या आठवणीतली
- Get link
- X
- Other Apps
संक्रांत , माझ्या आठवणीतली तसं आजकाल सर्वच सणाचं स्वरूप बदलले आहे. अगदी छोट्या छोट्या सनांनाही भव्यदिव्य रूप प्राप्त झालं आहे आणि सर्वांवर एक दिखाव्याची, स्पर्धेची, बरोबरीची चमकती झालर आलेली आहे. त्यात आज साजरा केला जातोय तो संक्रांत हा सण. या एकाच सणाला विविध नाव आहेत आणि प्रांता प्रांतात तो वेगळ्या रूपांनी साजरा केला जातोय. आंध्र प्रदेश मधे संक्रांत, तामिळनाडू केरळमध्ये पोंगल, पंजाब मध्ये लोहरी. तो साजरा करण्याची पध्दत वेगळी असली तरी एक सर्वसमान गोष्ट आहे ती म्हणजे या हंगामातील सर्व पिकणारी धान्य, भाजी पाला, फळे यांची या ना त्या रूपात पूजा होते. निसर्गानं दिलेल्या संपत्तीचा सन्मान म्हणा किंवा त्याची विधीवत पूजा होउन मग ते बाजारात विक्रीला किंवा वयक्तिक वापरासाठी घ्यायचे. त्या सोबतच या थंड हवेत आरोग्यासाठी उष्ण गोष्टींची आवश्यकता असते, त्या म्हणजे तीळ, बाजरी आणि त्याचा समतोल म्हणून थोडा गूळ अशा वस्तू वापरून केलेले पदार्थ आपण सेवन करतो. तसं प्रत्येक सणाला आणी त्या त्या वेळी ग्रहण करतो त्या अन्नाला वैज्ञानिक संदर्भ नक्कीच आहेत. आपल्या कडे संक्रांतिच्या अगोदर धनुर्...
आट पाट नगराची माझी कहाणी
- Get link
- X
- Other Apps
आट पाट नगराची माझी कहाणी जो जो वाचेल तो तो आपली आपली कहाणी आठवून गत काळात नक्की रममाण होईल, हेची माझें सांगणे, उतणार नाही मातणार नाही आणि कधीही या गोष्टी विसरणार नाही. बडेगाव अर्थात बरदापुर नामक एका छोट्या नागरातली ही कहाणी. तुम्ही म्हणाल अरे ते तर खेडं गाव, पण आम्ही ऐकलेल्या कहाण्यात जशा विविध नगरी असायच्या, म्हणजे मिथुला नगरी, अमुक नगरी तमुक नगरी तशीच ही ही. आमचा जन्म तसा शहरी भागातला, अग्निहोत्र, पुराणिक असा धार्मिक आध्यात्मिक वारसा असलेल्या कुटुंबात झाला, अनेक दिव्य घटना जरी शिदोरीत होत्या, तरी त्या नगरी सारखी हिरवी गर्द चादर काही आमच्या कडे नव्हती. म्हणूनच त्या नगरी विषयी एक विशिष्ट आकर्षण होतं, आहे आणि राहील ही. भव्य दिव्य नसला तरी मायेच्या आणि प्रेमाच्या तटभिंती आत, स्नेहाणं आणि आपुलकीने लख्ख असा तो मावशीचा वाडा. बाजूला अजून एक वाडा, समोर गोमाता आणि सर्ज्या राज्या दिमाखात नांदायचे तो गायवाड़ा. तिथल्या गादीवर बाप्पा म्हणजे मावशीचे सासरे यांचं साम्राज्य. हल्ली शेणाचा नुसता वास आला तरी तोंड न नाक मुरडतात. मला मात्र तिथे पाऊल ठेवताच तो सुगंध आकर्षित करायचा. बाप्पा त्यांच्या सिंह...
जरा उशिरच झालाय हे लिहायला ...
- Get link
- X
- Other Apps
जरा उशिरच झालाय हे लिहायला ... गेले काही महिने अनेक कार्यक्रम, सोहळे, भेटी गाठी न सुट्टी असं व्यस्त व्यस्त जगत होतो, पण या व्यस्ततेत एक आल्हाद, सुखद, आंनद लहरी असा अनेक प्रकारच्या तरंग आणि लाटांतून काळ घालवला. काही दुःखद घटना ही घडल्या अन तद्नंतर आज अचानक आठवलं. या सर्व उशिराला एक व्यक्ती जबाबदार आहेत, एरवी प्रचंड गतिमान जगणारे आमचे मित्र, अशा गोष्टींमध्ये थोडे आळशी झाले, कार्यक्रमाचे त्यांनी अति उत्साहात काढलेले फोटो अनेकवेळा आठवण देऊन ही पाठवले नाहीत, हे मुख्य कारण उशिरा लिहिण्यासाठी. आमचे जीवश्च मित्र संजय पिंपळकर यांच्या लग्नाचा 25 वा वाढदिवस औरंगाबाद येथे साजरा झाला. आजकाल आपण मोबाईल ला खूप खूप नावं ठेवतो , अनेक जण बोटं मोडून न कपाळी आठ्या आणून का होऊना वापरतात. पण त्याने माणसं जवळ आली आहेत, कुठल्याही माध्यमात का होईना, संवाद होतोय, सतत होतोय हे खरंय. त्या मुळेच असे सोहळे पटापट आयोजित होत आहेत. सायली, संजूची मुलगी हिनं हा सोहळा एकहाती आखला, नियोजीला अन अत्यंत दिमाखदार पार ही पाडला. C. A. च्या अभ्यासाच्या व्यग्र वेळापत्रकातून तिने हे केलं ही अजुन महत्वा...