बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन....

बायकोची जीवश्च कंठश्च मैत्रीण मानसी चा जन्मदिन.... *!! आढ् यतो वापि दरिद्रो वा दुःखित सुखितोऽपिवा । निर्दोषश्च सदोषश्च व्यस्यः परमा गतिः ॥* अर्थ :: धनाढ्य असो वा निर्धन, दुःखी असो वा सुखी, निर्दोष असो या सदोष – मित्र हाच माणसाचा सर्वात मोठा आधार असतो. *!! माता मित्रं पिता चेती स्वभावात् त्रतयं हितम्। कार्यकारणतश्चान्ये भवन्ति हितबुद्धयः।।* माता पिता आणि मित्र हेच तुमचं हित पाहतात, सतत सोबत असतात...बाकी सर्व स्वार्थ आहे...सब मोह माया है... मित्र आणि मैत्रीवर असंख्य गीत, कविता आणि quotes आहेत ते सर्व अनिता आणि मानसीच्या मैत्रीवर असे काही सजतात की विचारू नका. जणू देवपूजा झाल्यावर देवावर जाई जुई पारिजातक आणि जास्वंदी ची फुलं वाहिल्यानंतर जे भाव पूजा करणाऱ्याच्या आणि दर्शन घेणाऱ्याचा मनात येतात अगदी तेच भाव. खरतर या विषयावर मी पूर्वी एकदा व्यक्त झालो आहे ते आमच्या कौटुंबिक जिव्हाळ्याची गोष्ट होती...पण आजचा हा विषय आहे या दोघींच्या घट्ट मैत्रीचा. ती सुरुवात कुठे झाली या विषयीही मी लिहिलं होतच....थोडासा संदर्भ घेऊन पुढे जाऊ... आम्ही पुण्यात 2004 साली ...