Posts

Showing posts from 2023

जन्मदिन शुभकांक्षा आदरणीय मोदी जी

Image
 जन्मदिन शुभकांक्षा आदरणीय मोदी जी कुछ साल पाहिले देखा था आप को मोम से भरा एक पुतला था कोने मे कइ और हस्तिया भी थी वहा इर्दगीर्द हम ने चुन के तस्वीरे खिची आप की आज आपके नेतृत्व के प्रभाव से इर्दगीर्द का मोम पिघल ही गया जैसे बनी बनाई तसबिर पुतले ही नही कही चारो ओर बस आप, आप, आप हो भारत की प्रभावशाली परंपरा को लगन से आप सवर, सजा रहे हो खिल उठी उसकी खूबसुरती हर पल आज है देश स्वाभिमान की उंचाई पर  बाल बच्चे, नौजवा, बुढे, हर कोई हर शक्स की दिल मे जगह बनाई  प्यार ज्यादा और तो कही नफरत है घर परिवार गली राज्य मे  बसे हो आज हम सब देशवासीयो का गुरुर, अभिमान, गौरव, निष्ठा, श्रद्धा सन्मान, गर्व, चाहत, ईबादत और  भारत भु का रोशन सीतारा हो .... सजा दो गुलशन को रोशन  मोदीजी का जन्मदिन है आज... ढेर सारिया बधाईया नमो नमो जी !! शरद पुराणिक 170923

उठ कृष्णा .. आज तुला उठावं लागेल

 उठ कृष्णा .. आज तुला उठावं लागेल बस कर तुझ्या त्या खोड्या, दंगा, मस्ती घरातलं लोणी दही आज मिळणार नाही सुदामा ही आज खुप व्यस्त आहे चौकात त्यांना आवरण्यासाठी तुला उठावं लागेल शाळांमध्ये तू कालच गेला होतास म्हणे कुठे नृत्य केलेस, हंडी ही फोडलीस म्हणे माता भगिनी तुला सजवण्यात व्यस्त होत्या घाईघाईने तुला घेऊन पोचल्या ना तिथे आज मात्र तुझी दमछाक होणार आहे रे कुठे कुठे जाणार आहेस आणि कसं रे गावोगाव गल्लोगल्ली हंड्या सजल्यात रे तुझे गोविंदा सारे आज बेभान आहेत रे गोपिका आज कुठेही येणार नाहीत बरं का आखूड कपड्यात ललना तिथे नाचनार ना कर्णकर्कश आवाजात तूला ऐकु येईल ना गर्द दिव्यात कान्हा तू दर्शन देशील काय गोवर्धन पर्वत नाही तर नाही, चालतंय की इमारती अन वस्त्या डोक्यावर घेतील आज भले आवाजाने छाती फुटून जाऊ दे ना तुला आज गेलंच पाहिजे त्या व्यासपीठावर रस्ते तुंबतील, वाहनांच्या रांगा लागतील कामगार खोळंबतील माता अडकतील त्यांचा कान्हा त्यांची वाट पाहत असेल घरी पण तू थांबु नकोस, ते सर्व होत राहील लाखोंच्या हंड्या अन विविध कुरुक्षेत्रावर आज गितोपदेश मात्र करू नकोस रे बाबा अर्जुन नसतील कोणी  तुझं ...

आज सोहळा बहीण भावांच्या प्रेमाचा .....

 आज सोहळा बहीण भावांच्या प्रेमाचा ..... नात्यांच्या वेटोळ्यात एक घट्ट धागा सतत तुमच्यात गुंतलेला प्रत्येक टप्प्यात ती मात्र कायमच असते साथ, सोबत तुम्हाला सावरत स्वतःच विसरुन  असतात ना त्या गोड आठवणी भांडण्याच्या छोट्या कारणावरून पण ती रागावलेली ही सहन होत नाही तिची कट्टी फु त्रासदायक वाटते डब्यातले पदार्थ हिसकावून घेणारी तोच घास प्रेमाने भरवुन सुखावणारी तुम्ही शाळेत विसरलेल्या गोष्टी तिच्या बॅगेत आठवणीने घेऊन येणारी तुमच्या खोड्या अन प्रताप लपवणारी गमतीने सांगू का म्हणत, न सांगणारी आपल्यासमोर मोठी मोठी होत जाते अन एक दिवस ती सासरी निघते फुलांनी सजलेली गाडी निघुन जाते घरातली बाग हिरमसून सुकते  वृंदावणातली तुळस ही मान टाकते ती घराच्या प्रत्येक कोपऱ्यात वसते कर्तव्य, धाक, आठवणी, आधार  या रूपातून सतत मात्र सोबत असते नसलेल्यांची आई तर  होतेच होते  असलेल्यांची ही छोटी आई असते सख्खी, चुलत, मावस, आत्ये बहीण वहिनी, मेहुनी, मित्राची बायको  कोणत्या ना कोणत्या ऋणानुबंधात आपल्याला घट्ट  विणत असते  प्रेमाचे चार शब्द, आपुलकी, सहवास एवढी  माफक तिची ओवाळ...

जावयाच्या वाणाच ताट हाती

Image
 आमचे मित्र गुणवंत सराफ यांनी एक सुलेखन चित्र काल पाठवले, त्यावर एका मराठी गाण्याचं विडंबन करून हे पाठवत आहे ....हे फक्त एक गंमत म्हणून वाचावे... भावना दुखावने हा हेतू नाही... किंवा संस्कृती चा अपमान अजिबात नाहीच.... (ज्वाणीच्या आगीची मशाल हाती ....दिसला गं बाई दिसला या गीताचा आधार घेउन) ओहो ~~ जावयाच्या वाणाच ताट हाती आला हा योग धोंड्याच्या मासी येतो तो दर तीन तीन वर्षांनी जावइ खुष कधी इकडं कधी तिकडं जाती एकुलते एक, अनेक जावई लाडके हो  काही मिळणा मला हो कुठं दिसंना मला कुठं मिळणा तिथं मिळना मागु कोणाला मागू कोणाला संपला  न राव   संपला मला न देताच संपला धोंडा संपला सासू सासऱ्यात खूप खूप गोडवा त्याच्या वानात धोंडा, करंजी, अनारसा  हो कडक धोंडा अन ठिसूळ अनारसा  तोंडामध्ये विरला न राव साहेब तोंडामध्ये विरला डब्ब्यामध्ये, ताटामध्ये, ओट्यावर  संपला  ना राव संपला, संपला ना राव संपला कुणाला न देता तर कुणाला अति देता संपला धोंडा संपला ना राव संपला या जावयाचा न्यारा च डौल कधी खुष कधी वेगळाच कौल लहरी पटका मानेला झटका ओ आला घरी रुसला  ना  राव स...

My Fitness Journey - Herbalife and Shreyas

Image
 My Fitness Journey - Herbalife and Shreyas “Success is walking from failure to failure with no loss of enthusiasm.” ~ Winston Churchill “Once you learn to quit, it becomes a habit. ... The quote explains the message that you should learn from your failures and never give up.  It was in April this year when I was struggling to get ready to office as no shirts, trousers fitting in and getting irritated looking self in the mirror.  The reason - I was working away from home in Karnataka  and morning tea to dinner, was dependent on the availability that too whole rice based foods. In a process put on loads of weight.  Prior to that was in Hyderabad for over 4 years where again hostel stay, food and weekly travel. But my office then had a facility for cycling, treadmill so could control it in a way. But here I could not do so.   I heard of Herbalife as wife did it for some time and stopped. Then came to know Shreyas - a son of friend is doing this full time...

अधिकमास - क्षण भाग्याचा साक्षात भगवान श्री विष्णु दर्शनाचा

Image
 अधिकमास - क्षण भाग्याचा साक्षात भगवान श्री विष्णु दर्शनाचा उजळलें भाग्य आतां । अवघी चिंता वारली  संतदर्शनें हा लाभ । पद्मनाभ जोडला  संपुष्ट हे हृदयपेटी । करूनि पोटीं सांठवूं  तुका म्हणे होता ठेवा । तो या भावा सांपडला  काही घटना, प्रसंग इतके भारावून टाकतात की तुम्ही स्वतःचे राहत नाहीत. ती अनुभूती घेण्यासाठी एकरूप, एकचित्त झालं की आपोआप मिळते. परवा 8 तारखेला असंच झालं. अधिकमास नैमित्तिक गुरूपूजन, अपुपदान सोहळा आम्ही अनुभवला. गेले एक दोन महिने चर्चा, फोन, व्हाट्सअप्प मेसेज असं करत करत तो क्षण आला.  आता अधिकमास य विषयी फार उहापोह न करता पुढे जातो.  दानेन भूतानि वशी भवन्ति दानेन वैराण्यपि यान्ति नाशम् । परोऽपि बन्धुत्वभुपैति दानैर् दानं हि सर्वेव्यसनानि हन्ति ॥ पण आपण कोण गुरूला दान देणार, जे त्यांचंच आहे, किंबहुना ते त्यांच्या कृपाशीर्वादाने प्राप्त झालेलं आहे. पण या व्यावसायिक आणि स्पर्धात्मक युगात या गोष्टी जरी मागे राहत असतील तरी ज्यांना ज्यांना अनूभव आहे त्यांनी तो आठवुन पहावा... एखाद्या गरजवंताला मदत केल्यानंतर जे आत्मिक समाधान आपण प्राप्त करतो ती भा...

My bosses – Mentors, Guides, Moral Support, Parents, Guardians – Strong Threads in life !! Part 2 – Shri Rajesh Kochhar Sir….

Image
 My bosses – Mentors, Guides, Moral Support, Parents, Guardians – Strong Threads in life !! Part 2 – Shri Rajesh Kochhar Sir…. As mentioned in my earlier write up :   There are some personalities which make impact in your personal and professional life and Shri Rajesh Kochhar sir is another one of them at the top who really touched our lives including our families inside out and we still carry that impact.  In 1993, I joined Wipro Limited – Lighting Division @ their Corporate Office in Tulsi Chambers, Aurangabad as Executive Secretary to him and in the very first meeting itself he clearly mentioned that you are not just the secretary to me but there are other responsibilities in the department that you will be doing in your tenure. Not only that he also immediately attached me to Product Management Group, Product Design Group and Lighting Solutions group.  We were a part of C&I Sales (Commercial and Institutional sales team).  A6+ feet height tall boss ...

....अधिकस्य अधिकं फलम ...धोंडा झाला बरं का :)

Image
सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे शपु (शरद पुराणिक) मात्र म्हणतो फ़क्त आणि फ़क्त प्रेमाची सावली दे  ....अधिकस्य अधिकं फलम ...धोंडा झाला बरं का :) सध्या अधिकमास सुरू आहे ..आणि विविध ठिकाणी विविध रुपात तो साजरा होत आहे.  धार्मिक, कौटुंबिक आणि पारमार्थिक असे अनंत सोहळे होताना दिसतंय.   या महिन्यात प्रत्येक जावई हा खुष असतो. विष्णु ची उपासना हे या महिन्याचे विशेषत्व आहे.  जावयाला महत्व का ? लेक जावयाला लक्ष्मीनारायण जोडा असं संबोधन आणि धारना आहे, म्हणून जावयाला विष्णुरूपात दान केल्याने प्रत्यक्ष विष्णु ला दान केल्याचे पुण्य मिळते.   मी जसं नेहेमीच प्रत्येक सणवार आणि त्यात कालानुरूप होणारे बदल या विषयी कायम लिहितो. तसंच या ही बाबतीत झालंय. यालाही खूप भव्यदिव्य स्वरूप आलंय त्याविषयी फार जास्त न लिहिता, मुख्य विषयाकडे वळतो.  तर झालं असं दोन महिण्यापूर्वी म्हणजे 17 मे रोजी लग्नाच्या वाढदिवशी संजू (हा माझ्या बायकोचा मामे भाऊ...संजय वैद्य-पालकर) चा फोन आला होता आणि त्याच दिवशी त्याने अधिकमासाचं आमंत्रण देऊ केलं.  लगेच हो म्हणुन टाकलं आणि बघता बघता तो...

मुशाफिरी - मनोरंजनाची साग्रसंगीत मेजवानी अन चोखंदळ रसिकांची तृप्ती

 मुशाफिरी - मनोरंजनाची साग्रसंगीत मेजवानी अन चोखंदळ रसिकांची तृप्ती रोजच्या त्या घड्याळाच्या चक्रव्यूहातुन कशी बशी सुटका करून घेत माझी गाडी  भरधाव निघाली होती चाकण ते कोथरूड दिशेने. गाड्यांचे किचकट वेटोळे अन मुंग्यांची रांग असावी या प्रकारे वाहने, त्यात माझी घालमेल होती ती केंव्हा एकदा पोचतो या साठी. कारण ही तसंच होतं - मुशाफिरी या कार्यक्रमाची आवर्जुन तिकिटं online विकत घेऊन ठेवली होती. कार्यक्रम 9 चा होता, आणि 8.30 ला मी अजून रस्त्यावर गाडी हाकत की ढकलत पण चाललो होतो. माझी भाची सुस्मिरता डवाळकर ही याचा गायिका म्हणून भाग होती. अनायासे शुक्रवार ही होता ...पण आज शनिवारीही ऑफिस होतेच त्यामुळे त्याचं काही कौतुक नव्हतं पण निदान हा कार्यक्रम तरी पाहून जरासा आनंद घ्यावा ही सुप्त इच्छा.  असे विचाराचे जाळे डोक्याभोवती घोंघावत आणि आडव्या येणाऱ्या गाड्यांना माझं न ऐकु जाणारं स्फूट अर्पण करत , 9 वा घरी पोचलो.  "मी वाऱ्याच्या वेगानं आलो" या अविर्भावात घरात, फटाफट तयार होत दुचाकी काढली अन जोडी "भरत नाट्य मंदिर" ला पोचली. आधीचा प्रयोग उशिरा संपल्याने आता आम्ही वेळेत पोचलो. आसन ग्...

आता तरी वडा मला पावशील का

 आता तरी वडा मला पावशील का खरं प्रेम करणारा नवरा  दावशील का पगार आणून तो करी फ़क्त दादागिरी कधी कधी कशाची मदत म्हणून नाही त्याला जरा सुबुद्धी माया देशील का खरं प्रेम करणारा नवरा  दावशील का डबा घेऊन रोज ऑफिसला पळतो साऱ्या जगाला फोन मेसेज करतो एखादा फोन घरी कर सांगशील का  खरं प्रेम करणारा नवरा  दावशील का हार घालून सात जन्माची शपथ घेतली मी आज ही वटपौर्णिमा करते त्यासाठी त्यालाही काही करण्यास सांगशील का खरं प्रेम करणारा नवरा  दावशील का आता तरी वडा मला पावशील का खरं प्रेम करणारा नवरा  दावशील का ....वटपौर्णिमा स्पेशल....  शरद पुराणिक 030623

विविधतेने नटलेला कार्यक्षेत्र मार्ग माझा ....

 विविधतेने नटलेला कार्यक्षेत्र मार्ग माझा .... महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आशिर्वादाने सुरू होतो किर्लोस्करांची पुरातन उद्योग नगरी मग मला भेटते  थोडे गल्ली बोळ पार करत मी मार्गस्थ होत राहतो स्थापत्य विश्वाचा आविष्कार चांदणी चौक लागतो रुंद जलदगती महामार्गावर  पोचतो, सुसाट निघतो डुक्कर खिंड मागे राहते पण थोडंस दर्शन देते वेद भवनच्या मंत्र लहरी ही हवेत असाव्यात बहुधा अशी ऊर्जा घेऊन गाडी आता वेगाला जवळ करते वळणं, बोगदे, उंच इमारती वळणदार रस्त्याने शहरिकरणात कात टाकलेले डोंगर दिसतात बाहेर खाण्यास सोकलेल्या असंख्य खाणावळी   अस्मिता झुगारून पंजाबी, दक्षिणी, बरंच काही पाषाणच  छोटंसं तळं अन विविधरंगी पक्षी  असंख्य गावे कवेत घेऊन आहे हा महामार्ग त्यांच्या कमानी, पाट्या, शिलेदार ही आहेत रस्त्यात माझ्या अनेकांचं बलिदान ही आहेच एका डोंगरावर गौतम बुद्ध ही आहेत बसलेले अनेक पुलांचे वेटोळे आता दिसू लागतात  बालेवाडीची क्रीडानगरी ही थाटात उभी आहेच खेळा पेक्षा जास्त लग्न वरातीची आरास आहे पुढे भरजरी (?) संगणक नगरी हिंजवडी  जी  भरते लाखोंची पोटं धष्ट पुष्...

The International HR Day – May 20, 2023 – a weekend filled in loads of knowledge !!

 The International HR Day – May 20, 2023 – a weekend filled in loads of knowledge !! Annual HR Conclave @ Neville Wadia Institute of Management Studies and Research  Over the week-end you tend to lie on the beds – a lazy morning, waking up late, getting ready late and kill the time to your own vims and fancy.  Some weekends you need to get ready for office as that’s the first priority to finish some pending tasks or push the committed targets to meet deadlines. It was the same case but soon I touched my phone which is a routine these days – gone are the days of saying Karagre Vasate Lakshmi, Kar madhye saraswati.  These days we see the phones – changed times.  I realised that have registered for an event – with dual mind and slow pace started getting ready but then pushed me hard to get ready and reached the venue just in time.  Kind welcome by the well-dressed in business attire management students right from parking to the registration and then to the ven...

शेकडो गाड्यांची रांग खिडकीतून पहा....बघ आजतरी वेळेत पोचशील का ??

 सध्या पुणे शहराच्या विविविध भागात संध्याकाळी होणाऱ्या ट्रॅफिक जॅम वर  एक व्यथा .. सौमित्र - आपली माफी मागून ... बघ माझी आठवण येते का ?  शेकडो गाड्यांची रांग खिडकीतून पहा बघ आजतरी वेळेत पोचशील का ?? डोळे बंद करून अलगद मान टाकून पड झोपण्याच्या प्रयत्न कर, नाही लागत ना? बघ ट्राफिक आडलंय का ? बाहेरून येणाऱ्या अशुध्द हवेचा आनंद घे डोळे मिटून घे, तल्लीन हो बघ लक्ष लागतंय का ? नाहीच जाणवलं काही तर , हेडफोन काढ तो बॅगेत असेलच, कानात घाल काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करा बघ ट्राफिक कमी होतंय का ? तसंच गाणे ऎकत रहा, मॅच पहा, विडिओ पहा ऐकत रहा कान बधिर होईपर्यंत, ते सुरूच ठेऊन फोन बंद करू नकोस, आवाज वाढवू नकोस आता व्हाट्सएप वर मेसेज ची वाट बघ,  बघ बाहेर ट्राफिक कमी झालंय का ? फोन वर मेसेज अलर्ट येईल, मेसेज असेल तो उघडून पहा, attachment असेल Download कर, पहात रहा त्याकडे Forward कर याला, त्याला सर्वांना बघ बाहेर गर्दी ओसरलीये का?  पाणी पिऊ नकोस, कोरड पडली तरी पोट फुगू देऊ नकोस, आवर घाल आलेल्या pressure वर, दुर्लक्ष कर बघ किती वेळ तग धरशील ते ?  आता रात्र होईल, तुला भूक लाग...

My bosses – Mentors, Guides, Moral Support, Parents, Guardians – Strong Threads in life !!

 My bosses – Mentors, Guides, Moral Support, Parents, Guardians – Strong Threads in life !! Today happens to be the birthday of one of my bosses in my professional journey of over 32 years.  His name is Dr. Mahesh Patel.  Its just the coincidence, today is his birthday and I thought of expressing my association and how he has touched our lives internally. Of course, there are some more who equally overtone the same.  But today its only about Patel sir as an emotional souvenir being gifted to him.  In fact he deserves more and more but at this juncture, this is the pertinent thing I can do.  There are some personalities which make impact in your personal and professional life and Dr. Patel sir is one of them at the top who really touched our lives including our families inside out and we still carry that impact.  In 1999, I joined Wockhardt Research Centre as a Secretary to him and in the very first meeting itself he clearly mentioned that you are not j...

माझा केश कर्तन प्रवास ...जगण्याचे बदलते रंग

Image
 माझा केश कर्तन प्रवास ...जगण्याचे बदलते रंग आयुष्य जगताना तुम्ही अनेक मित्र, मैत्रिणी, सगे, सोयरे, आप्त, इष्ट अशा ऋणानुबंधाच्या वेटोळ्यात गुंडाळलेले असता...याच सभोवताली अजून  काही धागे  सतत समोर येतात आणि त्या वेटोळ्यात गुंफली जातात... ती म्हणजे तुमचा इस्त्रीवाला, पानवाला, किराणा दुकानदार, काही वेळा औषधीवाले, भाजीवाले, कोपऱ्यावरचा चहावाला, नेहेमीचा रिक्षावाला आणि कोण कोण.... काल रविवार होता म्हणून सकाळीच शरद ला फोन केला, हो त्याचं नाव ही शरद आहे. नेहेमीप्रमाणे तो व्यस्त होताच, हातात एक काम आहे ते झालं की तुम्हाला फोन करतो म्हणून फोन ठेवला. जरावेळ त्याच्या फोन ची वाट पाहुन मी चालत तिथे गेलो तर एक मोठी ऑर्डर सुरूच होती, कटिंग, दाढी, रंगरंगोटी, आणि facial ...मग मी बाहेर खुर्चीवर बसून होतो.  बसल्या बसल्या लहानपणी पासून आजपर्यंत चा केश कर्तन प्रवास डोळ्यासमोर येत गेला.... आम्ही एकत्र कुटुंबात राहायचो अगदी चुलत, आत्ये, मावस अशी 20 एक टाळकी एकाच बिऱ्हाडी नांदायची. सर्व वयोगट होते आणि रविवार हा आमचा सखाराम दिवस होता. सखाराम म्हणजे आमची अगदी कॉलेजात येऊ पर्यंत कटिंग करणारा ए...

माझी चिऊ ताई गेली कुठे ??

 माझी चिऊ ताई गेली कुठे ?? एक घास चिऊ ताईचा रोजच्या जेवणातली  ताई गेली कुठे  माझं ताट कोरडं पडलंय ग ताई  गोष्टीतली चिऊ ताई गेली कुठे चिमणे चिमणे दार उघड ..मी साद घालतो पण तीच आता म्हणते तू दार उघड जाळीदार खिडक्या, सज्जे मोकळे कर तुझ्या आसपासच्या इमारतीची भीती वाटते त्यावर उभ्या त्या तारांची भीती वाटते  तसं तडफडून मारण्यापेक्षा मी येतच नाही... उंच इमारतींनि घरटी माझी उद्धवस्त केली माझा आधार असलेली झाडं तोडली  तान्हुल्या बाळांना घेऊन मी जाऊ कुठे ...माझी चिऊ ताई गेली कुठे ... पण आज ही आहेत तिचे काही सगे ठेवतात पाणी भरुन वाडगे, भांडी  त्यांना आवर्जून भेटतेस की नाही  का तिथेही दशक्रियेसारखी वाट पहावी तू येशील, दोन घोट पाणी घेशील ते समाधान तरी देशील की नाही ग ताई गुलेर मारता उडणारा तुझा थवा गेला कुठे सकाळचा मधुर चिवचिवाट ही गेला कुठे ...माझी चिऊ ताई गेली कुठे..  एकदा ये तुला चित्रात बंदिस्त करतो तुझी चिवचिव ही साठवून घेतो  पुढच्या पिढीला ओळख व्हावी म्हणून... ये, ये येना ग चिऊताई ... शरद पुराणिक जागतिक चिमणी दिवस 200323

Nishant Birthday

 तळहाती अलगद घेऊन मिरवलं कधी रडताना शांत होण्यासाठी घेत कडेवर जग दाखवण्यासाठी कामात व्यस्त तिला मदतीसाठी तेच कोकरू घरभर रांगत राहते कडेवरून उडी मारून खेळते खेळता खेळता मोठं होत जातं घर दार अस्तित्वाने व्यापून टाकते भांग पट्टी करून ती पाठवणी करते आई बापा ची पार तारांबळ उडते  चड्डीतुन तो विजारीत ही जातो भुर्रर्र गाडी घेऊन कॉलेजात जातो ..  त्याच तळहातावर आज पगार देतो ... पण मी  वेडा त्याच मिरवण्यात .. Happy Birthday Nishant Puranik  कुलदेवता, कुलस्वामिनी, गुरू या सर्वांची अखंड कृपादृष्टी तुझ्यावर राहो ....आम्ही माय बाप आणि Harshal प्रेम, शुभेच्छा उधळत राहूच ...  यशवंत हो जयवंत हो !! जीवेत शरद: शतम

नित्य आचरणात "अग्निहोत्र"

 💥🔥🌈🔥💥 नित्य आचरणात "अग्निहोत्र" ॐ अग्निमीले पुरोहितं यज्ञस्य देवमृत्विजम्। होतारं रत्नधातमम्।। अग्निहोत्र हा दैनंदिन केला जाणारा एक यज्ञ आहे. सूर्योदय व सूर्यास्तावेळी घरामधील वातावरण पवित्र करण्यासाठी अग्निहोत्र यज्ञ केला जातो. हिंदू धर्मातल्या विविध परंपरांपैकी एक म्हणजे अग्निहोत्र. अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक. अग्नीला अत्यंत पवित्र मानलं जातं. अग्निहोत्राच्या माध्यमातून सूर्य आणि चंद्राद्वारे प्राप्त होणार्‍या उच्च शक्तीयुक्त ब्रह्मांड ऊर्जेला योग्य पद्धतीने ग्रहण करता येऊ शकतं. अग्निहोत्राशी संबंधित बरंच संशोधनही करण्यात आलं आहे. अग्निहोत्र सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी करायला हवं. अग्निहोत्र हा मानवी शरीरासाठी, उत्तम आयुरारोग्य आणि परिपूर्ण जीवनशैली साठी एक रामबाण व्रत, उपाय, पद्धत आहे. त्याचं आचरण आपल्या दिनचर्येत नित्य, प्रातः, आणि सायंकाळी करावे. दीर्घायुष्य आणि निरोगी सौष्ठव या साठी हे अत्यंत लाभप्रद असे आचरण आहे. सृष्टीची जी पाच तत्व आहेत - अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश - या सर्वां मध्ये अग्नीचा उल्लेख प्रथम आहे कारण तो श्रेष्ठ आहे.  तसे अग्निहोत्र आचरण आणि...

गुरू माझा यज्ञ मार्तंण्ड, बहु सोमयाजी, कर्मयोगी, ज्ञानयोगी, निघाला घेऊन यज्ञध्वज करण्या यज्ञीय कार्यास राजयोगी

Image
 गुरू माझा यज्ञ मार्तंण्ड, बहु सोमयाजी, कर्मयोगी, ज्ञानयोगी, निघाला घेऊन यज्ञध्वज करण्या यज्ञीय कार्यास राजयोगी देवपुर्व दशरात्र ममहासोमयाग - 21 जानेवारी ते 4 फेब्रुवारी 2023 जयपूर मंदीर, वृंदावन, उत्तर प्रदेश इवलेसे रोप लावियेले द्वारी | त्याचा वेलू गेला गगनावरी || प्रवर्ग्य फुलला सोमयाग बहरला | वाहता आहुती प्रेमभावें, अग्नी गगनी भिडला || वसुंधरे चे प्रेमे यज्ञीय सेवे देह अर्पियेला |! सृष्टीयेचे रक्षणी याग योजियेला || प्रवर्ग्य फुलला ...सोमयाग बहरला !!  माझ्या या पूर्वीच्या अनेक लेख मालिकेतून मी या कार्याविषयी भरपुर लिहिलं आहे. अगदीच ताजे संदर्भ द्यायचे झाल्यास खडकी (बीड) येथे पार पडलेला द्विरात्र अंगिरस सोमयाग,  SVYASA विद्यापीठ बेंगलुरु इथे पार पडलेला पशुकाम महासोमयाग यज्ञ सोहळा आणि  नंतर लगेच पुणे येथे सतत महिनाभर पार पडलेला दिव्य शिवपूजन सोहळा. त्यात ही त्रिशताब्दी  असा अमृतयोग या वर्षी होता ..मोठ्या महाराजांच जन्मशताब्दी वर्ष, सेलूकर घराण्याच्या अग्निहोत्र दीक्षेला ही 100 वर्ष आणि पार्थिव शिवपूजन सोहळ्याची ही 100 वर्ष.  या प्रत्येक यज्ञीय आणि इतर अनुष...