जावयाच्या वाणाच ताट हाती

 आमचे मित्र गुणवंत सराफ यांनी एक सुलेखन चित्र काल पाठवले, त्यावर एका मराठी गाण्याचं विडंबन करून हे पाठवत आहे ....हे फक्त एक गंमत म्हणून वाचावे... भावना दुखावने हा हेतू नाही... किंवा संस्कृती चा अपमान अजिबात नाहीच....


(ज्वाणीच्या आगीची मशाल हाती ....दिसला गं बाई दिसला या गीताचा आधार घेउन)


ओहो ~~


जावयाच्या वाणाच ताट हाती

आला हा योग धोंड्याच्या मासी

येतो तो दर तीन तीन वर्षांनी

जावइ खुष कधी इकडं कधी तिकडं जाती

एकुलते एक, अनेक जावई लाडके हो 

काही मिळणा मला हो कुठं दिसंना मला

कुठं मिळणा तिथं मिळना

मागु कोणाला मागू कोणाला

संपला  न राव   संपला

मला न देताच संपला धोंडा संपला


सासू सासऱ्यात खूप खूप गोडवा

त्याच्या वानात धोंडा, करंजी, अनारसा  हो

कडक धोंडा अन ठिसूळ अनारसा 

तोंडामध्ये विरला न राव साहेब तोंडामध्ये विरला

डब्ब्यामध्ये, ताटामध्ये, ओट्यावर 

संपला  ना राव संपला, संपला ना राव संपला

कुणाला न देता तर कुणाला अति देता संपला

धोंडा संपला ना राव संपला


या जावयाचा न्यारा च डौल

कधी खुष कधी वेगळाच कौल

लहरी पटका मानेला झटका ओ

आला घरी रुसला  ना  राव साहेब आला घरी रुसला

रुसला घरी, रुसला घरी

संपला  ना राव संपला, संपला ना राव संपला

कुणाला न देता तर कुणाला अति देता संपला

धोंडा संपला ना राव संपला


कपडे, अंगठी, आभूषणे वानात

जावई झाला एकदम फिदा

हो ना राव जावई झाला फ़िदा

जीव भांड्यात पडला यांचा हो जीव भांड्यात पडला

भांड्यामध्ये पडला, भांड्यामध्ये पडला

संपला  ना राव  संपला, संपला ना राव संपला

कुणाला न देता तर कुणाला अति देता संपला

धोंडा संपला ना राव संपला


शरद पुराणिक

150823

Comments

Popular posts from this blog

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी

गौरी गणपती