आता तरी वडा मला पावशील का
आता तरी वडा मला पावशील का
खरं प्रेम करणारा नवरा दावशील का
पगार आणून तो करी फ़क्त दादागिरी
कधी कधी कशाची मदत म्हणून नाही
त्याला जरा सुबुद्धी माया देशील का
खरं प्रेम करणारा नवरा दावशील का
डबा घेऊन रोज ऑफिसला पळतो
साऱ्या जगाला फोन मेसेज करतो
एखादा फोन घरी कर सांगशील का
खरं प्रेम करणारा नवरा दावशील का
हार घालून सात जन्माची शपथ घेतली
मी आज ही वटपौर्णिमा करते त्यासाठी
त्यालाही काही करण्यास सांगशील का
खरं प्रेम करणारा नवरा दावशील का
आता तरी वडा मला पावशील का
खरं प्रेम करणारा नवरा दावशील का
....वटपौर्णिमा स्पेशल....
शरद पुराणिक
030623
Comments