Nishant Birthday

 तळहाती अलगद घेऊन मिरवलं

कधी रडताना शांत होण्यासाठी

घेत कडेवर जग दाखवण्यासाठी

कामात व्यस्त तिला मदतीसाठी


तेच कोकरू घरभर रांगत राहते

कडेवरून उडी मारून खेळते

खेळता खेळता मोठं होत जातं

घर दार अस्तित्वाने व्यापून टाकते


भांग पट्टी करून ती पाठवणी करते

आई बापा ची पार तारांबळ उडते 

चड्डीतुन तो विजारीत ही जातो

भुर्रर्र गाडी घेऊन कॉलेजात जातो .. 


त्याच तळहातावर आज पगार देतो ...

पण मी  वेडा त्याच मिरवण्यात ..


Happy Birthday Nishant Puranik 


कुलदेवता, कुलस्वामिनी, गुरू या सर्वांची अखंड कृपादृष्टी तुझ्यावर राहो ....आम्ही माय बाप आणि Harshal प्रेम, शुभेच्छा उधळत राहूच ... 


यशवंत हो जयवंत हो !!


जीवेत शरद: शतम

Comments

Popular posts from this blog

How do I say a Good Bye once for all Harish Sir !!

ओढ लावती अशी जीवाला गावाकडची होळी