शेकडो गाड्यांची रांग खिडकीतून पहा....बघ आजतरी वेळेत पोचशील का ??
सध्या पुणे शहराच्या विविविध भागात संध्याकाळी होणाऱ्या ट्रॅफिक जॅम वर एक व्यथा ..
सौमित्र - आपली माफी मागून ... बघ माझी आठवण येते का ?
शेकडो गाड्यांची रांग खिडकीतून पहा
बघ आजतरी वेळेत पोचशील का ??
डोळे बंद करून अलगद मान टाकून पड
झोपण्याच्या प्रयत्न कर, नाही लागत ना?
बघ ट्राफिक आडलंय का ?
बाहेरून येणाऱ्या अशुध्द हवेचा आनंद घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
बघ लक्ष लागतंय का ?
नाहीच जाणवलं काही तर , हेडफोन काढ
तो बॅगेत असेलच, कानात घाल
काहीतरी ऐकण्याचा प्रयत्न करा
बघ ट्राफिक कमी होतंय का ?
तसंच गाणे ऎकत रहा, मॅच पहा, विडिओ पहा
ऐकत रहा कान बधिर होईपर्यंत, ते सुरूच ठेऊन
फोन बंद करू नकोस, आवाज वाढवू नकोस
आता व्हाट्सएप वर मेसेज ची वाट बघ,
बघ बाहेर ट्राफिक कमी झालंय का ?
फोन वर मेसेज अलर्ट येईल, मेसेज असेल
तो उघडून पहा, attachment असेल
Download कर, पहात रहा त्याकडे
Forward कर याला, त्याला सर्वांना
बघ बाहेर गर्दी ओसरलीये का?
पाणी पिऊ नकोस, कोरड पडली तरी
पोट फुगू देऊ नकोस, आवर घाल
आलेल्या pressure वर, दुर्लक्ष कर
बघ किती वेळ तग धरशील ते ?
आता रात्र होईल, तुला भूक लागेल
पोटात कावळे ओरडतील, खड्डा ही पडेल
पिशवी उघडु का नको याच अवस्थेत
बघ घर जवळ आलंय का
या नंतर सताड डोळ्यांनी गर्दी पहायला विसरू नको
कर्कश हॉर्न, गाड्याचे आवाज सहन करत रहा
या नंतर एक शिवी हासड, अन डोळे मिटून घे
बघ या महिन्यात एकदा तरी
बघ तू घरी वेळेत पोचशील का ?
ट्राफिक जॅम च्या असंख्य पीडितांना समर्पित
शरद पुराणिक
200423
Comments